"प्रतिमा इंगोले" च्या विविध आवृत्यांमधील फरक
ओळ ९९: | ओळ ९९: | ||
==सन्मान== |
==सन्मान== |
||
* सांगलीत झालेल्या ७व्या [[मराठा साहित्य संमेलन|मराठा साहित्य संमेलनाचे]] अध्यक्षपद (१४ नोव्हेंबर २०१०) |
* सांगलीत झालेल्या ७व्या [[मराठा साहित्य संमेलन|मराठा साहित्य संमेलनाचे]] अध्यक्षपद (१४ नोव्हेंबर २०१०) |
||
* २०१२ सालच्या डिसेंबरमध्ये पांढरकवडा (यवतमाळ जिल्हा) येथे झालेल्या [[केशर स्त्री साहित्य संमेलन|केशर स्त्री साहित्य संंमेलनाचे]] अध्यक्षपद. |
* २०१२ सालच्या डिसेंबरमध्ये पांढरकवडा (यवतमाळ जिल्हा) येथे झालेल्या [[केशर स्त्री साहित्य संमेलन|केशर स्त्री साहित्य संंमेलनाचे]] अध्यक्षपद. |
||
* २० ते २२ ऑक्टोबर २०१२ या काळात निपाणीला झालेल्या दुसर्या अखिल भारतीय [[लोकमंगल कृषी साहित्य संमेलन|लोकमंगल कृषी साहित्य संमेलनाचे]]अध्यक्षपद. |
|||
== संदर्भ आणि नोंदी == |
== संदर्भ आणि नोंदी == |
२३:०६, २३ नोव्हेंबर २०१४ ची आवृत्ती
डॉ. प्रतिमा इंगोले या एक मराठी बालसाहित्यकार, कवयित्री आणि वैचारिक लेखन करणार्या लेखिका आहेत. नक्षलवाद, शेतमजूर, पंचमहाभूते, बलुतेदारी यांसारखे विविध विषय़ त्यांनी आपल्या साहित्यातून हाताळले आहेत. डॉ. इंगोले या लोकसाहित्याच्या अभ्यासक आहेत. सतत सहा वर्षे विदर्भामध्ये अभ्यास करून त्यांनी शेतकर्यांच्या प्रश्नांवर लिखाण केले आहे. प्रतिमा इंगोले यांची ८०हून अधिक पुस्तके प्रकाशित झाली आहेत.
डॉ. इंगोले यांनी ग्रामीण स्त्री-पुरुषांचे वास्तव जीवन आपल्या कथांमधून चितारण्याचा प्रयत्न केला. ग्रामीण भागातील समस्या, तेथील जीवघेणा जीवनसंघर्ष मांडणार्या त्या एकमेव कथालेखिका आहेत. समकालीन लेखकांमध्ये अग्रस्थानी असणार्या डॉ. प्रतिमा इंगोले यांनी ग्रामीण भागातील समस्यांवर उपाय सुचवण्याचा प्रयत्नही आपल्या लेखनातून केलेला आहे.
डॉ. प्रतिमा इंगोले यांचे दहा कथासंग्रह प्रकाशित झालेले आहेत. विशेष म्हणजे त्यांच्या दहाही कथासंग्रहांना निरनिराळे पुरस्कार लाभलेले आहेत.
त्यांचा ‘हजारी बेलपान’ हा निखळ वर्हाडी बोलीतील पहिला संग्रह आहे तर ‘जावायाचं पोर’ हा पहिला स्त्रीवादी कथासंग्रह आहे. आज ग्रामीण साहित्य आणि स्त्रियांचे साहित्य या दोन्ही प्रवाहांत या कथा वैशिष्टय़पूर्ण ठरल्या आहेत.
डॉ. प्रतिमा इंगोले या अमरावती जिह्यातील दर्यापूर गावच्या रहिवासी आहेत.
प्रतिमा इंगोले यांचे प्रकाशित साहित्य
- अकसिदीचे दाने (कथासंग्रह). या पुस्तकाला १) महाराष्ट्र सारस्वत पुरस्कार २) संत गोरोबा सामाजिक पुरस्कार आणि ३) महाराष्ट्र राज्य सरकारचा पुरस्कार मिळाले आहेत.
- अंधारपर्व. या कथासंग्रहाला विदर्भ भूषण पुरस्कार मिळाला आहे.
- अमंगल युग (कथासंग्रह). या पुस्तकाला जनसंवाद पुरस्कार आणि महाराष्ट्र सारस्वत पुरस्कार मिळाले आहेत.
- आक्रोश अन्नदात्याचा
- आगळे अनुभविश्व
- आजही स्त्रीचे स्थान दुय्यमच (वैचारिक)
- आत्मघाताचे दशक (वैचारिक)
- आमच्या आयडॉल (स्त्रीविषयक)
- आस्वाद गंध (लेखसंग्रह)
- उजळ आजोबा (बालसाहित्य)
- उजाड अभयारण्य (प्रवासवर्णन). या पुस्तकाला कोल्हापूर येथील करवीर साहित्य परिषदेतर्फे ‘दत्ता डावजेकर स्मृती पुरस्कार’ प्रदान करण्यात आला आहे.
- उदयसोहळा (कवितासंग्रह)
- उद्कार (कवितासंग्रह)
- उलटे झाले पाय. या कथासंग्रहाला आचार्य अत्रे पुरस्कार मिळाला आहे.
- ओविली फुले मोकळी (वैचारिक)
- करारी आजी (बालसाहित्य)
- ग्रामीण साहित्य : लेखिकांची निर्मिती (वैचारिक)
- जावायाचं पोर. या कथासंग्रहाला उत्कृष्ट स्त्री जीवनपर पुरस्कार आणि नागसेन पुरस्कार मिळाले आहेत.
- जिजाऊ (बालसाहित्य)
- झेंडवाईचे दिवे. या कथासंग्रहाला प्रबोधन पुरस्कार आणि छत्रपती शिवाजी पुरस्कार मिळाले आहेत.
- दृष्ट (बालसाहित्य)
- नक्षलग्रस्त
- पारंपरिक स्त्री गाथा (वैचारिक)
- पार्ट टाईम (कादंबरी)
- बाईची कहाणी (स्त्री-कथा)
- बापू गुरुजी (श्यामराव कुकाजी ऊर्फ बापूसाहेब ढाकरे यांची बालकुमारांसाठी संस्कारक्षम कहाणी)
- डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्त्री जागृतीचे कार्य
- बोडखी (कादंबरी)
- बोरंवाली बाई - महाराष्ट्र सरकारचा बालसाहित्याचा पुरस्कार मिळालेले पुस्तक
- भंडार्याचे गाव (कथा)
- भुलाई (कवितासंग्रह)
- भूलोजीची लेख भाग १, २.
- माध्यम (लहान मुलांसाठी भाषणांचा संग्रह)
- मोठ्ठं व्हायचं कसं (मुलांसाठी नाट्यछटांचा संग्रह) - या पुस्तकाला १) शशिकला आगाशे बालवाङ्मय पुरस्कार २) गिरिजा कीर पुरस्कार मिळाले आहेत.
- लाजाळू (बालकविता) - ’ग्रंथोत्तेजक’ पुरस्कार मिळालेले पुस्तक
- लोकसंस्कृती आणि स्त्रीजीवन - 'जिजामाता' पुरस्कार प्राप्त पुस्तक
- लेक भुईची (कथासंग्रह). या पुस्तकाला कृष्णाबाई मोटे पुरस्कार आणि रोहमारे पुरस्कार मिळाले आहेत.
- वर्हाडी लोकगाथा (कथासंग्रह)
- वर्हाडी लोकभाषा (भाषाविषयक)
- वाघाचं घर मेळघाट - या पुस्तकाला लोकमत दैनिकाचा पुरस्कार मिळाला आहे.
- वैदर्भीय (माहितीपर)
- शेतकरी व्यथा (कथासंग्रह)
- शेतकर्याच्या नारी (कवितासंग्रह)
- सख्यांच्या गोष्टी (बालसाहित्य)
- सावित्रीबाई फुले (बालसाहित्य)
- सिपनेचे स्वप्न (बालनाटिका)
- सुगरनचा खोपा (कथासंग्रह). या पुस्तकाला शकुंतला जोग पुरस्कार आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेचा पुरस्कार मिळाला आहे.
- सोन्याचं बाळ (बालकविता)
- स्त्रीचे भावविश्व आणि आधुनिकता - या पुस्तकास महाराष्ट्र साहित्य परिषदेचा विश्वनाथ पार्वती पुरस्कार मिळालेला आहे.
- स्वप्नातील राजा (बालकादंबरी) - बालसाहित्याचा पुरस्कारप्राप्त
- हजारी बेलपान. या कथासंग्रहाला यशवंतराव चव्हाण पुरस्कार मिळाला आहे.
- हिरवा मेळ मेळघाट (माहितीपर)- शब्दगंध पुरस्कारप्राप्त पुस्तक
- हिरवे स्वप्न (कथासंग्रह). या पुस्तकाला लोकमित्र सरदार पुरस्कार मिळाला आहे.
प्रतिमा इंगोले यांच्यावरील ग्रंथ
- डॉ. प्रतिमा इंगोले-साहित्यसूची (१९८१ ते २०००) - संपादक प्राचार्य रामदास मुगुटराव देवके.
डॉ. प्रतिमा इंगोले यांना मिळालेले पुरस्कार
- आचार्य अत्रे पुरस्कार
- उत्कृष्ट स्त्रीजीवनपर पुरस्कार
- कृष्णाबाई मोटे पुरस्कार
- गिरिजा कीर पुरस्कार
- ग्रंथोत्तेजक पुरस्कार
- जनसंवाद पुरस्कार
- जिजामाता पुरस्कार
- दत्ता डावजेकर स्मृती पुरस्कार
- नागसेन पुरस्कार
- प्रबोधन पुरस्कार
- बहिणाबाई पुरस्कार[१]
- महाराष्ट्र सरकारचे बालसाहित्य पुरस्कार (एकाहून जास्त वेळा)
- महाराष्ट्र सारस्वत पुरस्कार
- महाराष्ट्र साहित्य परिषदेचा विश्वनाथ पार्वती पुरस्कार
- यशवंतराव चव्हाण पुरस्कार
- राजरत्न पुरस्कार[२]
- रोहमारे पुरस्कार
- लोकमत दैनिकाचा पुरस्कार
- लोकमित्र सरदार पुरस्कार
- विदर्भ भूषण पुरस्कार
- शकुंतला जोग पुरस्कार
- शब्दगंध पुरस्कार
- शशिकला आगाशे बालवाङ्मय पुरस्कार
- छत्रपती शिवाजी पुरस्कार
- संत गोरोबा सामाजिक पुरस्कार
- सह्याद्री वाहिनीचा नवरत्न पुरस्कार
- पुणे येथील साहित्यप्रेमी भगिनी मंडळाच्या वतीने देण्यात येणारा मालती दांडेकर जीवनगौरव पुरस्कार (२००९)
- स्वयंसिद्धा पुरस्कार[३]
सन्मान
- सांगलीत झालेल्या ७व्या मराठा साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद (१४ नोव्हेंबर २०१०)
- २०१२ सालच्या डिसेंबरमध्ये पांढरकवडा (यवतमाळ जिल्हा) येथे झालेल्या केशर स्त्री साहित्य संंमेलनाचे अध्यक्षपद.
- २० ते २२ ऑक्टोबर २०१२ या काळात निपाणीला झालेल्या दुसर्या अखिल भारतीय लोकमंगल कृषी साहित्य संमेलनाचेअध्यक्षपद.
संदर्भ आणि नोंदी
- ^ http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/nagpur-vidarbha/-/articleshow/29453469.cms?. २३ ऑगस्ट २०१४ रोजी पाहिले. Missing or empty
|title=
(सहाय्य) - ^ http://www.esakal.com/NewsDetails.aspx?NewsId=5151166308400152053&SectionId=17&SectionName=%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0&NewsDate=20130309&NewsTitle=%E0%A4%A1%E0%A5%89.%20%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A4%BE%20%E0%A4%87%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A5%87%20%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A4%BE%20%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A8%20%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%20%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%A8. २३ ऑगस्ट २०१४ रोजी पाहिले. Missing or empty
|title=
(सहाय्य) - ^ http://navshakti.co.in/rajya/48479/. २३ ऑगस्ट २०१४ रोजी पाहिले. Missing or empty
|title=
(सहाय्य)