Jump to content

"विद्या बाळ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ ५१: ओळ ५१:
* कमलाकी (डॊ. कमलाबाई देशपांडे यांचे चरित्र)
* कमलाकी (डॊ. कमलाबाई देशपांडे यांचे चरित्र)


=स्फुट लेखांचे संकलन=
===स्फुट लेखांचे संकलन===
* अपराजितांचे निःश्वास
* कथा गौरीची (सहलेखिका - गीताली वि.मं. आणि वंदना भागवत)
* डॉटर्स ऑफ महाराष्ट्र
* तुमच्यामाझ्यासाठी
* शोध स्वतःचा
* शोध स्वतःचा
* संवाद
* संवाद
* तुमच्यामाझ्यासाठी
* अपराजितांचे निःश्वास
* साकव
* साकव

* डॉटर्स ऑफ महाराष्ट्र
===विद्या बाळ यांच्या विषयीची पुस्तके===
* कथा गौरीची (सहलेखिका - गीताली वि.मं. आणि वंदना भागवत)
* विद्याताई आणि.....(अंजली मुळे आणि आशा साठे)

==पुरस्कार==
* आगरकर पत्रकारिता पुरस्कार
* कै. कमल प्रभाकर पाध्ये ट्रस्टचा पुरस्कार
* कै. शंकरराव किर्लोस्कर पुरस्कार
* सामाजिक कृतज्ञता निधीतर्फे देण्यात येणारा ‘सामाजिक कृतज्ञता जीवनगौरव पुरस्कार’
* स्त्री-समस्यांविषयक कार्य व पत्रकारिता यांबद्दल फाय फाउंडेशनचा पुरस्कार.


== बाह्य दुवे ==
== बाह्य दुवे ==

२३:१६, २१ मार्च २०१४ ची आवृत्ती

विद्या बाळ
जन्म १२ जानेवारी, १९३७
कार्यक्षेत्र साहित्य, पत्रकारिता
भाषा मराठी
विषय महिलाहक्क
पती कै दत्तात्रय बाळ
अपत्ये विनीता, यथोधन आणि अनिकेत

विद्या बाळ (१२ जानेवारी, १९३७ - हयात) या मराठी लेखिका व संपादक आहेत. त्यांनी १९५८ साली पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजमधून बी.ए. (अर्थशास्त्र) ही पदवी घेतली. महाराष्ट्रामधीलभारतामधील स्त्रियांच्या पुरुषांबरोबरच्या समान हक्कांविषयीच्या सामाजिक चळवळींमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग आहे.

कारकीर्द

पुणे आकाशवाणीवर कार्यक्रम सादरकर्त्या म्हणून विद्या बाळ यांनी दोन वर्षे नोकरी केली. त्यानंतर, १९६४ ते १९८३ या काळात 'स्त्री' मासिकाच्या त्या साहाय्यक-संपादक झाल्या आणि १९८३ ते १९८६ या काळात मुख्य संपादक. तेथून बाहेर पडल्यावर विद्या बाळ यांनी १९८९ साली 'मिळून सार्‍याजणी' हे मासिक सुरू केले.. या मासिकाच्या त्या संस्थापक-संपादक आहेत.

स्त्रियांच्या समस्यांबाबत विद्या बाळ यांना विशेष आस्था आहे. १९८१ साली त्यांनी ’नारी समता मंच’ या संस्थेची स्थापना केली. ग्रामीण स्त्रियांमध्ये आत्मभान जागृत करणाऱ्या ’ग्रोइंग टुगेदर’ या प्रकल्पाच्या प्रकल्प-प्रमुख म्हणून त्यांनी काम केले आहे.

विद्या बाळ यांनी दोन अनुवादित आणि एक रूपांतरित कादंबरी लिहिली आहे. त्यांच्या लेखणीतून अनेक स्फुट लेख उतरले आहेत..

प्रकाशित साहित्य

कादंबरी

  • वाळवंटातील वाट
  • तेजस्विनी

अनुवादित कांदबरी

  • जीवन हे असं आहे
  • रात्र अर्ध्या चंचाची

चरित्र

  • कमलाकी (डॊ. कमलाबाई देशपांडे यांचे चरित्र)

स्फुट लेखांचे संकलन

  • अपराजितांचे निःश्वास
  • कथा गौरीची (सहलेखिका - गीताली वि.मं. आणि वंदना भागवत)
  • डॉटर्स ऑफ महाराष्ट्र
  • तुमच्यामाझ्यासाठी
  • शोध स्वतःचा
  • संवाद
  • साकव

विद्या बाळ यांच्या विषयीची पुस्तके

  • विद्याताई आणि.....(अंजली मुळे आणि आशा साठे)

पुरस्कार

  • आगरकर पत्रकारिता पुरस्कार
  • कै. कमल प्रभाकर पाध्ये ट्रस्टचा पुरस्कार
  • कै. शंकरराव किर्लोस्कर पुरस्कार
  • सामाजिक कृतज्ञता निधीतर्फे देण्यात येणारा ‘सामाजिक कृतज्ञता जीवनगौरव पुरस्कार’
  • स्त्री-समस्यांविषयक कार्य व पत्रकारिता यांबद्दल फाय फाउंडेशनचा पुरस्कार.

बाह्य दुवे