Jump to content

"रघुनाथ धोंडो कर्वे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ३५: ओळ ३५:

==व्यावसायिक कारकीर्द==
==व्यावसायिक कारकीर्द==

र.धों.कर्वे यांनी गणिताचे प्राध्यापक म्हणून मुंबईच्या विल्सन महाविद्यालयात नोकरी केली, त्यातच त्यांनी कुटुंब नियोजन, लोकसंखेला आळा, आणि लैंगिक सुखाचे स्त्रियांचे अधिकार याचे महत्त्व ते लोकांना सांगत राहिले. तेव्हा महाविद्यालयाच्या रूढीवादी प्राचार्यांनी त्यांना पदाचा राजीनामा देण्यास सांगितले. त्यांनी तो दिला परंतु वरील प्रश्नांसाठी आपले आयुष्य समर्पित केले.

त्यांच्या जन्माच्या वेळी त्यांच्या मातोश्रींचा बाळंतपणातच देहान्त झाल्यामुळे गरोदरपणासंदर्भात स्त्रियांना व्यवस्थित शिक्षण आणि माहिती व्हावी असा त्यांचा आग्रह होता.

==संततिनियमन==
==संततिनियमन==
संततिनियमनाचे भारतातील आद्य प्रवर्तक म्हणून ज्यांची ओळख करून देता येईल असे आधुनिक संत म्हणजे रघुनाथ कर्वे. समाजस्वास्थ्यासाठी संततिनियमन व लैंगिक शिक्षण यांविषयी र. धों. कर्वे यांनी केलेले लोकांचे मत-विचार प्रबोधन, प्रवर्तन व प्रत्यक्ष कार्य फार मोलाचे आहे. ज्या काळात संततिनियमनाविषयी साधा उच्चारही करणे निषिद्ध मानले जायचे, त्या काळात रघुनाथरावांनी या विषयाचा प्रचार करून जनजागृती घडवून आणायचे ठरविले. वाचनाची अफाट गोडी आणि लहानपणापासून जडलेली अवांतर वाचनाची सवय यामुळे कर्वे यांनी अनेक शास्त्रीय पुस्तके वाचनालयांतून आणून वाचली.

स्त्री मुक्ती, स्त्री शिक्षण, स्त्री-पुरुष संबंध याबाबतही त्यांचा दृष्टिकोन अतिशय पुरोगामी होता. वैद्यकीय नवविध संशोधनाने कमी होत चाललेले मृत्यूचे प्रमाण व अनिर्बंध वाढत चाललेली लोकसंख्यामुळे संततिनियमनाची गरज लक्षता घेऊन रघुनाथराव कर्वे यांनी इ.स. १९२१ साली इंग्रजीत एक पुस्तक प्रकाशित केले. ह्या विषयावर संशोधन करून आपल्या राहत्या घरीच संततिनियमनाची साधने बनवून देण्याचा आधुनिक उपक्रम त्यांनी सुरू केला. पत्नी मालतीलाही बरोबर घेऊन त्यांनी कुटुंबनियोजन केंद्र स्थापन केले. नागरिकांना मार्गदर्शन केले. लैंगिक रोगांची लक्षणे, कारणे त्यावरील उपाय यांबाबत लोकांना माहिती दिली. त्यासाठी त्यांनी ‘वेश्याव्यवसाय’, `आधुनिक आहारशास्त्र' ही पुस्तके लिहिली.
स्त्री मुक्ती, स्त्री शिक्षण, स्त्री-पुरुष संबंध याबाबतही कर्व्यांचा दृष्टिकोन अतिशय पुरोगामी होता. वैद्यकीय नवविध संशोधनाने कमी होत चाललेले मृत्यूचे प्रमाण व अनिर्बंध वाढत चाललेली लोकसंख्यामुळे संततिनियमनाची गरज लक्षता घेऊन रघुनाथराव कर्वे यांनी इ.स. १९२१ साली इंग्रजीत एक पुस्तक प्रकाशित केले. ह्या विषयावर संशोधन करून आपल्या राहत्या घरीच संततिनियमनाची साधने बनवून देण्याचा आधुनिक उपक्रम त्यांनी सुरू केला. पत्नी मालतीलाही बरोबर घेऊन त्यांनी कुटुंबनियोजन केंद्र स्थापन केले. नागरिकांना मार्गदर्शन केले. लैंगिक रोगांची लक्षणे, कारणे त्यावरील उपाय यांबाबत लोकांना माहिती दिली. त्यासाठी त्यांनी ‘वेश्याव्यवसाय’, `आधुनिक आहारशास्त्र' ही पुस्तके लिहिली.

स्वत:ला एकही मूल नसताना कर्वे यांनी शस्त्रक्रिया करून घेतली व त्यांच्या बायकोनेही त्याला थोर मनाने संमती दिली. इ.स. १९२३ साली पुण्याच्या वसंत व्याख्यानमालेत त्यांनी ‘संततिनियमन’ ह्या विषयावर भाषण केले. कर्वे यांनी स्वतःच्या प्रयत्नातून पहिले कुटुंब नियोजन केंद्र इ.स. १९२१ साली लंडनमधे सुरू केले,त्याच वर्षी ते भारतात सुरू झाले. स्वत:चे जीवनप्रयोजन म्हणून [[लैंगिक शिक्षण|लैंगिक शिक्षणाचा]] आग्रह रघुनाथ धोंडो कर्वे यांनी अगदी इसवी सनाच्या दुसऱ्या दशकात धरला होता. लैंगिक शिक्षणाबद्दल जनजागृती करण्याचा त्यांनी ध्यासच घेतला होता. संभोग हा केवळ संतती उत्पादनासाठी नसून सुखासाठीदेखील असतो, असा त्यांचा विचार होता. पण [[संतती नियमनाची साधने|संतती नियमनाची पुरेशी साधन/ शास्त्रीय माहिती]] व मुख्य म्हणजे सामाजिक जाणीव नसल्यामुळे भारंभार पोरे होत. त्यामुळे [[स्त्री-आरोग्य|स्त्री-आरोग्यावर]] गंभीर परिणाम व्हायचे. कौटुंबिक आर्थिक परिस्थिती खालावायची. खूप मुले झाल्यामुळे शारीरिक सुखाची भीती वाटायला लागायची, अशा भीतीमुळे [[मानसिक विकृती]] निर्माण व्हायची, त्यातून बलात्कार, वेश्यागमन अशा गोष्टी घडत. ह्या वेश्यागमनातून बऱ्याच व्याधी निरोगी घरांमध्ये प्रवेश करायच्या. ह्या सर्व समस्यांमध्ये र. धों. कर्व्यांना त्यांच्या कट्टर शास्त्रीय दृष्टिकोनाचा खूप उपयोग झाला.

==समाजस्वास्थ्य==
==समाजस्वास्थ्य==
एक सोपा उपाय त्यांना सापडला- [[संततिनियमन]]. संततीनियमनाचे उद्दिष्ट समोर ठेऊन र.धों. कर्वे यांनी १५ जुलै इ.स. १९२७ ला '''‘[[समाजस्वास्थ्य]]’''' या मासिकाची सुरुवात केली. कोणत्याही विषयाचा सखोल अभ्यास करून त्यावर स्वतंत्रपणे विचार करून आपली मते बनवणे व ती निर्भीडपणे मांडणे हे र. धों. कर्वे यांच्या व्यक्तिमत्त्वाचे ठळक वैशिष्ट्य होय. यासाठी त्यांना सरकारी खात्यातील नोकरीही प्रसंगी गमवावी लागली. इ.स. १९२७ ते इ.स. १९५३ अशी सुमारे २५-२६ वर्षे कर्वे यांनी ‘समाजस्वास्थ्य’ हे मासिक मोठ्या निष्ठेने, कमालीच्या निग्रहाने चालवले. त्याद्वारे लैंगिक शिक्षणाचा प्रसार केला. वक्तशीरपणा आणि व्यवस्थितपणा ही कर्व्यांच्या व्यक्तित्वाची ठळक वैशिष्ट्ये म्हणून सांगता येतील. समाजस्वास्थ्याचे अंक प्रत्येक महिन्याच्या दहा तारखेला प्रेसमधून येत. स्वत: सर्व बंडले बांधून, पत्ते घालून चौदा तारखेला ती सर्व पोस्टात जाऊन पंधरा तारखेला ते अंक ग्राहकांच्या हातीही पडत.
[[संततिनियमन]]. संततिनियमनाचे उद्दिष्ट समोर ठेऊन र.धों. कर्वे यांनी १५ जुलै इ.स. १९२७ ला '''‘[[समाजस्वास्थ्य]]’''' या मासिकाची सुरुवात केली. कोणत्याही विषयाचा सखोल अभ्यास करून त्यावर स्वतंत्रपणे विचार करून आपली मते बनवणे व ती निर्भीडपणे मांडणे हे र. धों. कर्वे यांच्या व्यक्तिमत्त्वाचे ठळक वैशिष्ट्य होय. यासाठी त्यांना सरकारी खात्यातील नोकरीही प्रसंगी गमवावी लागली. इ.स. १९२७ ते इ.स. १९५३ अशी सुमारे २५-२६ वर्षे कर्वे यांनी ‘समाजस्वास्थ्य’ हे मासिक मोठ्या निष्ठेने, कमालीच्या निग्रहाने चालवले. त्याद्वारे लैंगिक शिक्षणाचा प्रसार केला. वक्तशीरपणा आणि व्यवस्थितपणा ही कर्व्यांच्या व्यक्तित्वाची ठळक वैशिष्ट्ये म्हणून सांगता येतील. समाजस्वास्थ्याचे अंक प्रत्येक महिन्याच्या दहा तारखेला प्रेसमधून येत. स्वत: सर्व बंडले बांधून, पत्ते घालून चौदा तारखेला ती सर्व पोस्टात जाऊन पंधरा तारखेला ते अंक ग्राहकांच्या हातीही पडत.

[[फ्रान्स]] येथील वास्तव्यामध्ये त्यांनी त्यासंदर्भात बरेच वाचन, अभ्यास केला. तेथून येताना सोबत ट्रंका भरून नियमनाची साधने व पुस्तके घेऊन आले. स्वतःच्या बिर्‍हाडातच त्यांनी पहिले संततिनियमन केंद्र चालू केले. लोकांनी खूप हेटाळणी केली, कुचेष्टा केली, पण कर्वे आपल्या ध्यासापासून हटले नाहीत. समाजस्वास्थ्य नावाचे मासिक चालू केले. एका [[वसंत व्याख्यान माला|वसंत व्याख्यान मालेत]] त्यांनी स्त्रियांनादेखील लैंगिक भावना असतात हे प्रकटपणे मांडले. त्यांचे हे प्रकट बोलणे बऱ्याच मान्यवरांना पचले नाही, पण स्वतःवर असलेल्या विश्वासाच्या जोरावर ते आपले हे नैसर्गिक विचार निदान काही लोकांपर्यंत तरी पोचवू शकले. त्या मोजक्या लोकांमध्ये पेरलेल्या विचारांचा बराच मोठा वृक्ष आज आपल्या समोर उभा आहे. भारताच्या सज्ञान लोकसंख्येमध्ये निदान १०% लोक तरी सध्या संततिनियमन करीत असावेत. र. धों. कर्व्यांच्या हयातीत त्यांना केवळ कुचेष्टाच मिळाली, तरीदेखील ते केवळ स्वतःवरच्या विश्वासावर लढत राहिले, त्यांना हा आत्मविश्वास त्यांच्या पत्‍नीने, व आई-वडिलांनी पूर्ण खंबीरपणे मागे उभे राहून दिला. जेव्हा केव्हा परिस्थिती हाताबाहेर जायची त्यात्या वेळी त्यांना [[रॅंग्लर परांजपे]] ह्यांसारखे हितचिंतक लाभायचे. अनेक अश्लीलतेच्या कोर्ट खटल्यांमध्ये त्यांना दंड झाला. एकदा त्यांची केस [[भीमराव रामजी आंबेडकर|बाबासाहेब आंबेडकरांनी]] लढवली होती. त्यामुळे जरी ते ती केस हरले तरी त्यांना बाबासाहेबांसारखा आयुष्यभरासाठीचा मित्र मिळाला.
[[फ्रान्स]] येथील वास्तव्यामध्ये र.धों कर्वे यांनी बरेच वाचन, अभ्यास केला. तेथून येताना सोबत ट्रंका भरून संततिनियमनाची साधने व पुस्तके घेऊन आले. स्वतःच्या बिऱ्हाडातच त्यांनी पहिले संततिनियमन केंद्र चालू केले. लोकांनी खूप हेटाळणी केली, कुचेष्टा केली, पण कर्वे आपल्या ध्यासापासून हटले नाहीत. समाजस्वास्थ्य नावाचे मासिक चालू केले. एका [[वसंत व्याख्यान माला|वसंत व्याख्यान मालेत]] त्यांनी स्त्रियांनादेखील लैंगिक भावना असतात हे प्रकटपणे मांडले. त्यांचे हे प्रकट बोलणे बऱ्याच मान्यवरांना पचले नाही, पण स्वतःवर असलेल्या विश्वासाच्या जोरावर ते आपले हे नैसर्गिक विचार निदान काही लोकांपर्यंत तरी पोचवू शकले. त्या मोजक्या लोकांमध्ये पेरलेल्या विचारांचा बराच मोठा वृक्ष आज आपल्या समोर उभा आहे. भारताच्या त्यांच्या जन्माच्या वेळी त्यांच्या मातोश्रींचा बाळंतपणातच देहांत झाल्यामुळे गरोदरपणा संदर्भात व्यवस्थित शिक्षण आणि माहिती व्हावी असा त्यांचा आग्रह होता. २१व्या शतकातील भारतातल्या सज्ञान लोकसंख्येमध्ये निदान १०% लोक तरी संततिनियमन करीत असावेत. र. धों. कर्व्यांच्या हयातीत त्यांना केवळ कुचेष्टाच मिळाली, तरीदेखील ते केवळ स्वतःवरच्या विश्वासावर लढत राहिले, त्यांना हा आत्मविश्वास त्यांच्या पत्‍नीने, व आई-वडिलांनी पूर्ण खंबीरपणे मागे उभे राहून दिला. जेव्हा केव्हा परिस्थिती हाताबाहेर जायची त्यात्या वेळी त्यांना [[रॅंग्लर परांजपे]] ह्यांसारखे हितचिंतक लाभायचे. अनेक अश्लीलतेच्या कोर्ट खटल्यांमध्ये त्यांना दंड झाला. एकदा त्यांची केस [[भीमराव रामजी आंबेडकर|बाबासाहेब आंबेडकरांनी]] लढवली होती. त्यामुळे जरी ते ती केस हरले तरी त्यांना बाबासाहेबांसारखा आयुष्यभरासाठीचा मित्र मिळाला.

फ्रेंच भाषेचे र.धों. कर्व्यांना विशेष ज्ञान होते. त्या भाषेतील अनेक नाटके व गोष्टी त्यांनी रूपांतरित केली आहेत. नाटक, सिनेमा, ललित वाङ्‌मय ह्यावर समाजस्वास्थ्यात टीकात्मक लेख व परीक्षणे येत. साहित्य, संगीत, अन्य कला यांची त्यांना तहान होती. देशात व जगात काय चालले आहे ह्याचे त्यांचे अवलोकन तिखट होते. एका थोर समाजसुधारकाच्या पोटी जन्म घेऊनही त्यांची वाढ खुंटली नाही. त्यांनी वडिलांच्या - महर्षी कर्वे यांच्या - पुढे अनेक पावले जाऊन समाजप्रबोधन करण्याचा प्रयत्न केला.

००:०१, ६ डिसेंबर २०१३ ची आवृत्ती

रघुनाथ धोंडो कर्वे
टोपणनाव: र.धों. कर्वे
जन्म: जानेवारी १४, इ.स. १८८२
मुरूड
मृत्यू: ऑक्टोबर १४, इ.स. १९५३
चळवळ: संततिनियमन
पत्रकारिता/ लेखन: समाजस्वास्थ्य
वडील: धोंडो केशव कर्वे
आई: राधाबाई धोंडो कर्वे
पत्नी: मालती रघुनाथ कर्वे

रघुनाथ धोंडो कर्वे (जानेवारी १४, इ.स. १८८२ - ऑक्टोबर १४, इ.स. १९५३) हे गणिताचे प्राध्यापक आणि महाराष्ट्रातील अग्रणी समाजसुधारक होते. हे धोंडो केशव कर्वे यांचे पुत्र होय.

बालपण आणि तारुण्य

र.धों. कर्वे यांचा जन्म मुरुड येथे झाला. पुण्याच्या न्यू इंग्लिश स्कूल मधे ते शिकले. इ.स. १८९९ साली त्यांनी दहावीची परीक्षा दिली. इ.स. १९०४ मधे ते फर्ग्युसन कॉलेजमधून बी. ए.झाले. आशापौर्णिमा नावाची साप्ताहिके इ.स. १९४०च्या सुमारास प्रसिद्ध होत असत, त्यांमध्ये ह. वि. देसाई या पत्रकाराने रघुनाथरावांच्या घेतलेल्या दोन मुलाखती प्रसिद्ध झाल्या आहेत.. इ.स. १९१९ साली ते गणितातील पी.एच.डी. पदवी घेण्याकरिता ते पॅरिसला गेले, परंतु ती न मिळवता एका पदविकेवर समाधान मानून त्यांना परत यावे लागले. त्यामागील घडलेल्या घटना त्यांनी या मुलाखतींमध्ये नोंदविल्या आहेत. याशिवाय अण्णांशी त्यांचे संबंध कसे राहिले, यावरही या मुलाखतींमध्ये प्रकाश टाकण्यात आला आहे. आणखी काही दुर्मिळ माहितीही तिथे निश्चितच मिळते.

इ.स. १९०६ साली रघुनाथराव मुंबईला ट्रेनिंग कॉलेजात शिक्षण घेण्याकरिता आले, तेव्हा तिथे त्यांना भेटलेले प्रो. नेल्सन फ्रेझर या गुरूंविषयी आणि फ्रेंच भाषा शिकायचे निश्चित झाले तेव्हापासून दीर्घकालपर्यंत ज्यांच्या सानिध्याचा व साहाय्याचा लाभ रघुनाथरावांना मिळाला ते प्रो. पेल्तिए यांच्या संबंधातील त्यांनी जागवलेल्या आठवणी ‘एक विक्षिप्त इंग्रज- प्रो. नेल्सन पेल्तिए‘ या लेखात आहेत.

व्यावसायिक कारकीर्द

र.धों.कर्वे यांनी गणिताचे प्राध्यापक म्हणून मुंबईच्या विल्सन महाविद्यालयात नोकरी केली, त्यातच त्यांनी कुटुंब नियोजन, लोकसंखेला आळा, आणि लैंगिक सुखाचे स्त्रियांचे अधिकार याचे महत्त्व ते लोकांना सांगत राहिले. तेव्हा महाविद्यालयाच्या रूढीवादी प्राचार्यांनी त्यांना पदाचा राजीनामा देण्यास सांगितले. त्यांनी तो दिला परंतु वरील प्रश्नांसाठी आपले आयुष्य समर्पित केले.

त्यांच्या जन्माच्या वेळी त्यांच्या मातोश्रींचा बाळंतपणातच देहान्त झाल्यामुळे गरोदरपणासंदर्भात स्त्रियांना व्यवस्थित शिक्षण आणि माहिती व्हावी असा त्यांचा आग्रह होता.

संततिनियमन

संततिनियमनाचे भारतातील आद्य प्रवर्तक म्हणून ज्यांची ओळख करून देता येईल असे आधुनिक संत म्हणजे रघुनाथ कर्वे. समाजस्वास्थ्यासाठी संततिनियमन व लैंगिक शिक्षण यांविषयी र. धों. कर्वे यांनी केलेले लोकांचे मत-विचार प्रबोधन, प्रवर्तन व प्रत्यक्ष कार्य फार मोलाचे आहे. ज्या काळात संततिनियमनाविषयी साधा उच्चारही करणे निषिद्ध मानले जायचे, त्या काळात रघुनाथरावांनी या विषयाचा प्रचार करून जनजागृती घडवून आणायचे ठरविले. वाचनाची अफाट गोडी आणि लहानपणापासून जडलेली अवांतर वाचनाची सवय यामुळे कर्वे यांनी अनेक शास्त्रीय पुस्तके वाचनालयांतून आणून वाचली.

स्त्री मुक्ती, स्त्री शिक्षण, स्त्री-पुरुष संबंध याबाबतही कर्व्यांचा दृष्टिकोन अतिशय पुरोगामी होता. वैद्यकीय नवविध संशोधनाने कमी होत चाललेले मृत्यूचे प्रमाण व अनिर्बंध वाढत चाललेली लोकसंख्यामुळे संततिनियमनाची गरज लक्षता घेऊन रघुनाथराव कर्वे यांनी इ.स. १९२१ साली इंग्रजीत एक पुस्तक प्रकाशित केले. ह्या विषयावर संशोधन करून आपल्या राहत्या घरीच संततिनियमनाची साधने बनवून देण्याचा आधुनिक उपक्रम त्यांनी सुरू केला. पत्नी मालतीलाही बरोबर घेऊन त्यांनी कुटुंबनियोजन केंद्र स्थापन केले. नागरिकांना मार्गदर्शन केले. लैंगिक रोगांची लक्षणे, कारणे त्यावरील उपाय यांबाबत लोकांना माहिती दिली. त्यासाठी त्यांनी ‘वेश्याव्यवसाय’, `आधुनिक आहारशास्त्र' ही पुस्तके लिहिली.

स्वत:ला एकही मूल नसताना कर्वे यांनी शस्त्रक्रिया करून घेतली व त्यांच्या बायकोनेही त्याला थोर मनाने संमती दिली. इ.स. १९२३ साली पुण्याच्या वसंत व्याख्यानमालेत त्यांनी ‘संततिनियमन’ ह्या विषयावर भाषण केले. कर्वे यांनी स्वतःच्या प्रयत्नातून पहिले कुटुंब नियोजन केंद्र इ.स. १९२१ साली लंडनमधे सुरू केले,त्याच वर्षी ते भारतात सुरू झाले. स्वत:चे जीवनप्रयोजन म्हणून लैंगिक शिक्षणाचा आग्रह रघुनाथ धोंडो कर्वे यांनी अगदी इसवी सनाच्या दुसऱ्या दशकात धरला होता. लैंगिक शिक्षणाबद्दल जनजागृती करण्याचा त्यांनी ध्यासच घेतला होता. संभोग हा केवळ संतती उत्पादनासाठी नसून सुखासाठीदेखील असतो, असा त्यांचा विचार होता. पण संतती नियमनाची पुरेशी साधन/ शास्त्रीय माहिती व मुख्य म्हणजे सामाजिक जाणीव नसल्यामुळे भारंभार पोरे होत. त्यामुळे स्त्री-आरोग्यावर गंभीर परिणाम व्हायचे. कौटुंबिक आर्थिक परिस्थिती खालावायची. खूप मुले झाल्यामुळे शारीरिक सुखाची भीती वाटायला लागायची, अशा भीतीमुळे मानसिक विकृती निर्माण व्हायची, त्यातून बलात्कार, वेश्यागमन अशा गोष्टी घडत. ह्या वेश्यागमनातून बऱ्याच व्याधी निरोगी घरांमध्ये प्रवेश करायच्या. ह्या सर्व समस्यांमध्ये र. धों. कर्व्यांना त्यांच्या कट्टर शास्त्रीय दृष्टिकोनाचा खूप उपयोग झाला.

समाजस्वास्थ्य

संततिनियमन. संततिनियमनाचे उद्दिष्ट समोर ठेऊन र.धों. कर्वे यांनी १५ जुलै इ.स. १९२७ ला समाजस्वास्थ्य या मासिकाची सुरुवात केली. कोणत्याही विषयाचा सखोल अभ्यास करून त्यावर स्वतंत्रपणे विचार करून आपली मते बनवणे व ती निर्भीडपणे मांडणे हे र. धों. कर्वे यांच्या व्यक्तिमत्त्वाचे ठळक वैशिष्ट्य होय. यासाठी त्यांना सरकारी खात्यातील नोकरीही प्रसंगी गमवावी लागली. इ.स. १९२७ ते इ.स. १९५३ अशी सुमारे २५-२६ वर्षे कर्वे यांनी ‘समाजस्वास्थ्य’ हे मासिक मोठ्या निष्ठेने, कमालीच्या निग्रहाने चालवले. त्याद्वारे लैंगिक शिक्षणाचा प्रसार केला. वक्तशीरपणा आणि व्यवस्थितपणा ही कर्व्यांच्या व्यक्तित्वाची ठळक वैशिष्ट्ये म्हणून सांगता येतील. समाजस्वास्थ्याचे अंक प्रत्येक महिन्याच्या दहा तारखेला प्रेसमधून येत. स्वत: सर्व बंडले बांधून, पत्ते घालून चौदा तारखेला ती सर्व पोस्टात जाऊन पंधरा तारखेला ते अंक ग्राहकांच्या हातीही पडत.

फ्रान्स येथील वास्तव्यामध्ये र.धों कर्वे यांनी बरेच वाचन, अभ्यास केला. तेथून येताना सोबत ट्रंका भरून संततिनियमनाची साधने व पुस्तके घेऊन आले. स्वतःच्या बिऱ्हाडातच त्यांनी पहिले संततिनियमन केंद्र चालू केले. लोकांनी खूप हेटाळणी केली, कुचेष्टा केली, पण कर्वे आपल्या ध्यासापासून हटले नाहीत. समाजस्वास्थ्य नावाचे मासिक चालू केले. एका वसंत व्याख्यान मालेत त्यांनी स्त्रियांनादेखील लैंगिक भावना असतात हे प्रकटपणे मांडले. त्यांचे हे प्रकट बोलणे बऱ्याच मान्यवरांना पचले नाही, पण स्वतःवर असलेल्या विश्वासाच्या जोरावर ते आपले हे नैसर्गिक विचार निदान काही लोकांपर्यंत तरी पोचवू शकले. त्या मोजक्या लोकांमध्ये पेरलेल्या विचारांचा बराच मोठा वृक्ष आज आपल्या समोर उभा आहे. भारताच्या त्यांच्या जन्माच्या वेळी त्यांच्या मातोश्रींचा बाळंतपणातच देहांत झाल्यामुळे गरोदरपणा संदर्भात व्यवस्थित शिक्षण आणि माहिती व्हावी असा त्यांचा आग्रह होता. २१व्या शतकातील भारतातल्या सज्ञान लोकसंख्येमध्ये निदान १०% लोक तरी संततिनियमन करीत असावेत. र. धों. कर्व्यांच्या हयातीत त्यांना केवळ कुचेष्टाच मिळाली, तरीदेखील ते केवळ स्वतःवरच्या विश्वासावर लढत राहिले, त्यांना हा आत्मविश्वास त्यांच्या पत्‍नीने, व आई-वडिलांनी पूर्ण खंबीरपणे मागे उभे राहून दिला. जेव्हा केव्हा परिस्थिती हाताबाहेर जायची त्यात्या वेळी त्यांना रॅंग्लर परांजपे ह्यांसारखे हितचिंतक लाभायचे. अनेक अश्लीलतेच्या कोर्ट खटल्यांमध्ये त्यांना दंड झाला. एकदा त्यांची केस बाबासाहेब आंबेडकरांनी लढवली होती. त्यामुळे जरी ते ती केस हरले तरी त्यांना बाबासाहेबांसारखा आयुष्यभरासाठीचा मित्र मिळाला.

फ्रेंच भाषेचे र.धों. कर्व्यांना विशेष ज्ञान होते. त्या भाषेतील अनेक नाटके व गोष्टी त्यांनी रूपांतरित केली आहेत. नाटक, सिनेमा, ललित वाङ्‌मय ह्यावर समाजस्वास्थ्यात टीकात्मक लेख व परीक्षणे येत. साहित्य, संगीत, अन्य कला यांची त्यांना तहान होती. देशात व जगात काय चालले आहे ह्याचे त्यांचे अवलोकन तिखट होते. एका थोर समाजसुधारकाच्या पोटी जन्म घेऊनही त्यांची वाढ खुंटली नाही. त्यांनी वडिलांच्या - महर्षी कर्वे यांच्या - पुढे अनेक पावले जाऊन समाजप्रबोधन करण्याचा प्रयत्न केला.

प्रकाशित साहित्य

  • संततिनियमन,
  • गुप्त रोगांपासून बचाव,
  • वेश्याव्यवसाय,
  • आधुनिक आहारशास्त्र,
  • आधुनिक कामशास्त्र,
  • त्वचेची निगा,
  • संतति नियमन - विचार व आचार इ.

वारसा

  • 'रघुनाथाची बखर' ही श्री. ज. जोशींची रघुनाथ धोंडो कर्वे या थोर व स्वाभाविकपणे उपेक्षिलेल्या एका सामाजिक क्रांतिकारकाच्या जीवनावरची एक वेधक कादंबरी आहे. या कादंबरीवर आधारित दृक्‌श्राव्य कार्यक्रम, श्याम भुर्के आणि गीता भुर्के रंगमंचावर सादर करतात.
  • ध्यासपर्व हा अमोल पालेकरांनी त्यांच्यावर काढलेला एक अत्युत्तम चित्रपट आहे. त्यात रघुनाथ धोंडो कर्वे यांची मध्यवर्ती भूमिका किशोर कदम (कवी सौमित्र) ह्यांनी अत्यंत जीव ओतून केली आहे. त्यांच्या पत्‍नीची (मालतीबाई कर्वे) भूमिका सीमा विश्वास ह्या अक्षरशः जगल्या आहेत. बाकीची पात्रे ही जाणीवपूर्वक साहाय्यक व छोटी ठेवली आहेत. कुठेही मुख्य विषयापासून चित्रपट भरकटलेला नाही. अशा विषयावर ह्या आधुनिक युगात साधा चित्रपट काढताना/बघताना इतका त्रास/संकोचल्यासारखे होते तर त्या काळात तसे काम करताना काय काय सहन करावे लागले असेल हे जाणवते. हा समाज, एका स्त्रीने साधे शिक्षण घेण्या-देण्यावरून महात्मा फुलेसावित्रीबाईंना इतका त्रास देऊ शकतो तर ह्यांचा विषय त्यांना पचणे शक्यच नव्हते.

माध्यमांतील चित्रण

पुस्तके

  1. महाराष्ट्रातील समाजसुधारक - अन्य महनीय व्यक्ती - के सागर प्रकाशन.
  2. आधुनिक भारताचे शिल्पकार - संपादक-बाळ सामंत, प्रकाशक - लोकवाङ्‌मय गृह

चित्रपट

ध्यासपर्व (र. धों. कर्वे यांच्या जीवनावरील अमोल पालेकर व चित्रा पालेकर निर्मित चित्रपट)

अधिक वाचन

  • म. वा. धोंड. Missing or empty |title= (सहाय्य)

बाह्य दुवे