"सरदार किबे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
खूणपताका: अमराठी योगदान
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २१: ओळ २१:
* सरदार किबे बनारसच्या हिंदी साहित्य परिषदेचे आणि पुण्याच्या [[महाराष्ट्र साहित्य परिषद|महाराष्ट्र साहित्य परिषदेचे]] अध्यक्ष होते.
* सरदार किबे बनारसच्या हिंदी साहित्य परिषदेचे आणि पुण्याच्या [[महाराष्ट्र साहित्य परिषद|महाराष्ट्र साहित्य परिषदेचे]] अध्यक्ष होते.
* ते मध्य भारत हिंदी साहित्य परिषदेचे उपाध्यक्ष होते.
* ते मध्य भारत हिंदी साहित्य परिषदेचे उपाध्यक्ष होते.
* त्यांनी १९१५ साली इंदूरमध्ये मराठी साहित्य सभा ही संस्था स्थापन केली आणि तिच्यातर्फे आमंत्रण देऊन १९१७मध्ये इंदूरमध्ये [[अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन]] भरवले.
* [[मुंबई|मुंबईत]] [[इ.स. १९२६|१९२६]] साली भरलेल्या १२व्या [[अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन|मराठी साहित्य संमेलनाचे]] ते अध्यक्ष होते.
* [[मुंबई|मुंबईत]] [[इ.स. १९२६|१९२६]] साली भरलेल्या १२व्या [[अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन|मराठी साहित्य संमेलनाचे]] ते अध्यक्ष होते.
* पुण्याच्या भारत इतिहास संशोधक मंडळाच्या नियामक मंडळाचे आणि हिस्टॉरिकल रेकोर्ड्‌ससाठीच्या सरकारी कमिशनचे सदस्य.
* पुण्याच्या भारत इतिहास संशोधक मंडळाच्या नियामक मंडळाचे आणि हिस्टॉरिकल रेकोर्ड्‌ससाठीच्या सरकारी कमिशनचे सदस्य.
ओळ ४०: ओळ ४१:


==बाह्य दुवे==
==बाह्य दुवे==
http://www.mssindore.org/index.php/2012-09-02-10-11-14/1917
http://www.mssindore.org/index.php/2012-09-02-10-11-14/1917 (इंदूरचे १९१७ सालचे मराठी साहित्य संमेलन)





२२:३४, २० सप्टेंबर २०१२ ची आवृत्ती

वजीर-उद्‌-दौला रावबहादुर सरदार माधवराव विनायकराव किबे (जन्म: इंदूर, ४ एप्रिल १८७७, मृत्यू : ), एम.ए., एम.आर.ए.एस.,एफ़.आर.एस.ए. हे एक अर्थतज्ज्ञ आणि हिदुस्थानच्या प्राचीन इतिहासामध्ये संशोधन करणारे एक विद्वान होते. त्यांना ग्रंथवाचनाची आणि आपले विचार लिहून काढण्याची मनापासून आवड होती. माधव विनायक किबे एक चांगले मराठी साहित्यिक होते.

शिक्षण

सरदार किबे यांचे प्राथमिक शिक्षण इंदूरला त्यांच्या घरीच झाले. नंतर ते इंदूरच्याच डॅली कॉलेजमध्ये दाखल झाले. त्या कॉलेजमधून १८९४साली मॅट्रिकची परीक्षा दिल्यावर ते अलाहाबादच्या म्य़ुईर कॉलेजातून इ.स. १८९९मध्ये पदवीधर व १९०१ मध्ये इतिहास आणि अर्थशास्त्र हे विषय घेऊन एम.ए. झाले.

विवाह

त्यांचा विवाह रत्नागिरी जिल्ह्यात भरभराटीला आलेल्या कोल्हापूरच्या सरदेसाईंच्या घरंदाज घराण्यातील कमलाबाईशी झाला.

मानसन्मान

  • सरदार किबे यांना लंडनच्या रॉयल एशियाटिक सोसायटीचे सभासद करून घेण्यात आले.
  • सरदार किबे यांना लंडनच्या रॉयल सोसायटी ऑफ आर्ट्‌स ची फेलोशिप प्रदान करण्यात आली.
  • किबे यांची मध्यप्रांतात हिंदुस्थान सरकारच्या गव्हर्नर जनरलचे साहाय्यक मंत्री म्हणून नेमणूक झाली.
  • त्यांना इंदूर संस्थानात मानद दंडाधिकारी करण्यात आले.
  • देवास संस्थान(धाकटी पाती)चे ते इ.स.१९११मध्ये दिवाण झाले.
  • यथावकाश ते इंदूरचे महाराज तिसरे तुकोजीराव होळकर यांचे खास चिटणीस (हुज़ूर सेक्रेटरी), नंतर अबकारी मंत्री आणि निवृत्तीच्या वेळी उपपंतप्रधान झाले.
  • मुंबई इलाख्यातील सरदार, इनामदार आणि वतनदार यांच्या संमेलनाचे अध्यक्षपद किबे यांनी भूषविले होते..
  • सरदार किबे बनारसच्या हिंदी साहित्य परिषदेचे आणि पुण्याच्या महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष होते.
  • ते मध्य भारत हिंदी साहित्य परिषदेचे उपाध्यक्ष होते.
  • त्यांनी १९१५ साली इंदूरमध्ये मराठी साहित्य सभा ही संस्था स्थापन केली आणि तिच्यातर्फे आमंत्रण देऊन १९१७मध्ये इंदूरमध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन भरवले.
  • मुंबईत १९२६ साली भरलेल्या १२व्या मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.
  • पुण्याच्या भारत इतिहास संशोधक मंडळाच्या नियामक मंडळाचे आणि हिस्टॉरिकल रेकोर्ड्‌ससाठीच्या सरकारी कमिशनचे सदस्य.
  • इ.स. १९३१मध्ये सरदार किबे यांनी इंदूरचे महाराज तुकोजीराव होळकर यांच्या बोलावण्यावरून लंडनला जाऊन त्यांच्याबरोबर दुसऱ्या गोलमेज परिषदेला हजेरी लावली होती.
  • १९३१मध्येच सरदार किबे यांनी सर लेस्ली विल्सन यांच्या अध्यक्षतेखाली लंडनमध्ये भरलेल्या ईस्ट इंडिया असोसिएशनच्या बैठकीत भाषण केले होते.
  • १९३३मध्ये इंग्लंडच्या संयुक्त संसदीय समितीपुढे सरदार किबे यांनी मुंबई इलाख्यातल्या जमीनदारांची कैफियत मांडली होती.
  • देवास संस्थानात केलेल्या समाजकार्यासाठी, ब्रिटिशांनी सरदार किबे यांना रावबहादुर या उपाधीने सन्मानित केले.

दानशूरता

सरदार किबे यांनी मुंबईतला हिंदी शिक्षण फंड, पुण्याचे भारत इतिहास संशोधक मंडळ इत्यादींना आणि देशातील आणि देशाबाहेरील अनेक सामाजिक आणि धार्मिक संस्थांना, त्यांच्या चांगल्या कामासाठी भरघोस देणग्या दिल्या आहेत.

लेखन

  • लीग ऑफ नेशन्स (इंग्रजी ग्रंथ)
  • हिंदुस्थानातील संस्थाने (इंग्रजी ग्रंथ)
  • करन्सी पॉलिसी ऑफ इंडियन स्टेट्स (इंग्रजी ग्रंथ)
  • अनेक प्रतिष्ठित मराठी, हिंदी आणि इंग्रजी नियतकालिकांमध्ये नियमित लेखन.

बाह्य दुवे

http://www.mssindore.org/index.php/2012-09-02-10-11-14/1917 (इंदूरचे १९१७ सालचे मराठी साहित्य संमेलन)