पुरुषोत्तम भास्कर भावे
Appearance
(पु. भा. भावे या पानावरून पुनर्निर्देशित)
पुरुषोत्तम भास्कर भावे |
---|
पुरुषोत्तम भास्कर भावे (एप्रिल १२, १९१० - ऑगस्ट १३, १९८०) हे मराठी लेखक आणि ज्येष्ठ विचारवंत होते.[१] पु.भा. भावे यांनी १७ कादंबऱ्या, पाच नाटके, १४ लेखसंग्रह आणि दोन प्रवासवर्णने लिहिली आहेत. त्यांनी आत्मचरित्रही लिहिले आहे. ते सौदर्यवादी लेखक आहेत.
निबंध, ललित
[संपादन]- रक्त आणि अश्रू
- विठ्ठला पांडुरंगा
कादंबऱ्या
[संपादन]- अकुलिना
- अडीच अक्षरे
- दर्शन
- दोन भिंती
- मागे वळून
- वर्षाव
- व्याध
नाटके
[संपादन]- पद्मिनी
- महाराणी
- मुक्ती
- विषकन्या
- स्वामिनी
आत्मचरित्र
[संपादन]- प्रथम-पुरूषी एक-वचनी
कथासंग्रह
[संपादन]- ठरीव ठशाची गोष्ट
- परंपरा
- पहिला पाउस
- प्रतारणा
- फुलवा
- बंगला
- सतरावे वर्ष
- साडी
- सार्थक
- हिमानी
- घायाळ
- वैरी (१९६२. मेनका प्रकाशन)
वृत्तपत्रांतील स्तंभलेखन
[संपादन]- आदेश (नागपूर)
- सावधान (नागपूर)
गौरव
[संपादन]- अध्यक्ष, मराठी साहित्य संमेलन, पुणे, १९७७
पु.भा.भावे समिती, ही दरवर्षी मराठी लेखक पुरुषोत्तम भास्कर भावे यांच्या नावाने पुरस्कार प्रदान करत असते. भावे यांच्या स्मृतिदिनी म्हणजे १३ ऑगस्टला हे पुरस्कार जाहीरपणे दिले जातात. पाच हजार रुपये रोख, ग्रंथसंच, स्मृतिचिन्ह आणि मानपत्र असे या पुरस्कारांचे स्वरूप असते. इ.स. २०१२ सालच्या पुरस्कारप्राप्त व्यक्ती पुढीलप्रमाणे :-
- पु.भा.भावे चित्रपट दिग्दर्शन पुरस्कार : राजदत्त
- पु.भा.भावे पत्रकारिता पुरस्कार : विक्रमसिंह ओक
- पु.भा.भावे समाजसेवा पुरस्कार : वामनराव पै (मरणोत्तर)
- पु.भा.भावे सामाजिक कार्य पुरस्कार : कुटुंब संस्थेचा प्रसार करणाऱ्या अपर्णा रामतीर्थकर
- पु.भा.भावे साहित्यसेवा पुरस्कार : भा.द. खेर (मरणोत्तर)
संदर्भ
[संपादन]- ^ "भावे, पुरुषोत्तम भास्कर". vishwakosh.marathi.gov.in. २ ऑक्टोबर २०२१ रोजी पाहिले.
बाह्य दुवे
[संपादन]- महाराष्ट्र टाइम्स.कॉम येथील लेख Archived 2013-01-26 at Archive.is
- द एन्सायक्लोपीडिया ऑफ इंडियन लिटरेचर (इंग्लिश)
- संग्रहित प्रत
- लघु कथा