एप्रिल १२
Jump to navigation
Jump to search
एप्रिल १२ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील १०२ वा किंवा लीप वर्षात १०३ वा दिवस असतो.
<< | एप्रिल २०२१ | >> | ||||
सो | मं | बु | गु | शु | श | र |
१ | २ | |||||
३ | ४ | ५ | ६ | ७ | ८ | ९ |
१० | ११ | १२ | १३ | १४ | १५ | १६ |
१७ | १८ | १९ | २० | २१ | २२ | २३ |
२४ | २५ | २६ | २७ | २८ | २९ | ३० |
ठळक घटना आणि घडामोडी[संपादन]
सतरावे शतक[संपादन]
- १६०६ - ग्रेट ब्रिटनने युनियन जॅकला आपला अधिकृत ध्वज म्हणून मान्यता दिली.
एकोणिसावे शतक[संपादन]
- १८६१ - अमेरिकन यादवी युद्ध - दक्षिणेच्या सैन्याने चार्ल्स्टननजीकच्या फोर्ट सम्टरवर हल्ला केला व युद्धास तोंड फुटले.
- १८६४ - अमेरिकन गृहयुद्ध-फोर्ट पिलोची कत्तल - जनरल नेथन बेडफोर्ड फॉरेस्टच्या नेतृत्त्वाखालील दक्षिणेच्या सैन्याने शरण आलेल्या उत्तरेच्या श्यामवर्णीय सैनिकांची कत्तल उडवली.
- १८६५ - अमेरिकन गृहयुद्ध- उत्तरेच्या सैन्याने मोबिल, अलाबामा जिंकले.
- १८७७ - युनायटेड किंग्डमने दक्षिण आफ्रिकेचा ट्रान्सव्हाल प्रांत बळकावला.
विसावे शतक[संपादन]
- १९३५: प्रभात चा चंद्रसेना हा हिन्दी चित्रपट मुंबईच्या मिनर्व्हा चित्रपटगृहात प्रदर्शित झाला.
- १९४५ - अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष फ्रॅंकलिन डिलानो रूझवेल्टचा अध्यक्षपदी असताना मृत्यु. उपाध्यक्ष हॅरी ट्रुमनची राष्ट्राध्यक्षपदी नेमणूक.
- १९४६ - सिरीयाला फ्रांसपासून स्वातंत्र्य.
- १९६१ - सोवियेत संघाचा युरी गागारिन अंतराळात जाणारा प्रथम माणूस झाला.
- १९६७: कैलाशनाथ वांछू भारताचे १० वे सरन्यायाधीश झाले.
- १९७५ - ख्मेर रूजने कंबोडियाची राजधानी फ्नॉम पेन्ह जिंकली.
- १९८० - लायबेरियात लश्करी उठाव. सॅम्युएल डोने राज्यसत्ता हाती घेतली.
- १९८१ - स्पेस शटल कोलंबियाचे सर्वप्रथम प्रक्षेपण.
- १९९४ - युझनेटवर सर्वप्रथम व्यापारिक स्पॅम ईमेल पाठवण्यात आली.
- १९९७ - भारतीय पंतप्रधान एच.डी. देवेगौडा यांचा राजीनामा.
- १९९७: पूर्वप्राथमिक प्रवेशाकरिता पाल्य अथवा पालकांच्या मुलाखती घेण्यास मनाई करण्याची तरतूद असणारे विधेयक विधानसभेत मंजूर करण्यात आले.
- १९९८: सी. सुब्रमण्यम यांना भारतरत्न प्रदान करण्यात आला.
- १९९८ - स्लोव्हेनियात रिश्टर मापनपद्धतीनुसार ५.६ तीव्रतेचा भूकंप.
एकविसावे शतक[संपादन]
- २००१ : इंडोनेशियात ८.५ आणि ८.२ रिश्टर क्षमतेचे लागोपाठ दोन भूकंप
- २००२ - व्हेनेझुएलात ह्युगो चावेझविरुद्ध उठाव. पेद्रो कार्मोनाने तात्पुरते अध्यक्षपद घेतले.
- २००९: झिम्बाब्वेने अधिकृतरीत्या झिम्बाब्वेचे डॉलर हे चलन सोडून दिले.
- २०१७- विरार लोकलला आज 150 वर्षे पूर्ण झाली आहेत. 12 एप्रिल, 1867 रोजी विरारहून पहिली लोकल धावली होती. तेव्हा केवळ एकच गाडी पहाटे 6.45 वाजता विरारहून सुटायची व सायंकाळी 5.30 वाजता तीच गाडी परतीचा प्रवास करायची.
जन्म[संपादन]
- ख्रिस्तपूर्व ५९९: जैनांचे २४ वे तीर्थंकर महावीर यांचा जन्म.
- ४९९ - महावीर, जैन धर्मसंस्थापक.
- १४८२: मेवाडचे महापराक्रमी राजा संग्रामसिंग ऊर्फ राणा संग
- १५७७ - क्रिस्चियन चौथा, डेन्मार्कचा राजा.
- १८७१: लेखक, भाषांतरकार, पत्रकार, संपादक, अनुवादक, निबंधकार व कोशकार वासुदेव गोविंद आपटे
- १९०२ - लुई बील, नेदरलॅंड्सचा पंतप्रधान.
- १९१०: सुप्रसिद्ध मराठी साहित्यिक पु. भा. भावे
- १९१४: संवाद व गीतलेखक कॄष्ण गंगाधर दिक्षीत ऊर्फ कवी संजीव
- १९१७: सलामीचे फलंदाज तसेच डावखुरे मंदगती गोलंदाज विनू मांकड
- १९३२: श्रीलंकेचे परराष्ट्रमंत्री तामिळ नेते लक्ष्मण कादिरमगार
- १९४३: केंद्रीय मंत्री सुमित्रा महाजन
- १९५४: मार्क्सवादी विचारसरणीचे पथनाट्यकार, लेखक, दिगदर्शक, कवि आणि गीतकार सफदर हश्मी
- १९८१ - तुलसी गॅब्बार्ड, अमेरिकेच्या प्रतिनिधीगृहात निवड झालेली पहिली हिंदू व्यक्ती.
मृत्यू[संपादन]
- २३८ - गॉर्डियन पहिला, रोमन सम्राट.
- २३८ - गॉर्डियन दुसरा, रोमन युवराज.
- ३५२ - पोप ज्युलियस पहिला.
- १७२०: बाळाजी विश्वनाथ भट तथा पहिला पेशवा
- १८१७: फ्रेंच खगोलशास्त्रज्ञ चार्ल्स मेसिअर
- १९०६: महामहोपाध्याय पण्डित महेशचंद्र न्यायरत्न भट्टाचार्य
- १९१२: अमेरिकन रेड क्रॉस च्या स्थापक कारा बार्टन
- १९४५ - अमेरिकेचे ३२ वे राष्ट्राध्यक्ष फ्रॅंकलिन डिलानो रूझवेल्ट, अमेरिकन राष्ट्राध्यक्ष.
- १९८० - विल्यम आर. टॉल्बर्ट, जुनियर, लायबेरियाचा राष्ट्राध्यक्ष.
- २००१: NASSCOM चे अध्यक्ष देवांग मेहता
- २००१: स्माईली चे जनक हार्वे बॉल
- २००१: हिंदकेसरी पै. चंबा मुत्नाळ
- २००६: कन्नड चित्रपट अभिनेता तसेच गायक राजकुमार
- २०१२-कवी आणि नाटककार मोहित चट्टोपाध्याय
प्रतिवार्षिक पालन[संपादन]
बाह्य दुवे[संपादन]
- बीबीसी न्यूजवर एप्रिल १२ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)
एप्रिल १० - एप्रिल ११ - एप्रिल १२ - एप्रिल १३ - एप्रिल १४ - (एप्रिल महिना)