रत्‍नागिरी जिल्हा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(रत्नागिरी जिल्हा या पानावरून पुनर्निर्देशित)
हा लेख रत्‍नागिरी जिल्ह्याविषयी आहे. रत्‍नागिरी शहराच्या माहितीसाठी येथे टिचकी द्या
रत्‍नागिरी जिल्हा
रत्‍नागिरी जिल्हा
महाराष्ट्र राज्याचा जिल्हा
MaharashtraRatnagiri.png
महाराष्ट्रच्या नकाशावरील स्थान
देश भारत ध्वज भारत
राज्य महाराष्ट्र
विभागाचे नाव कोकण विभाग
मुख्यालय रत्‍नागिरी
तालुके मंडणगड, दापोली, खेड, चिपळूण, गुहागर, संगमेश्वर, रत्‍नागिरी, लांजा, राजापूर
क्षेत्रफळ ८,२०८ चौरस किमी (३,१६९ चौ. मैल)
लोकसंख्या १६,९६,७७७ (२००१)
लोकसंख्या घनता २०७ प्रति चौरस किमी (५४० /चौ. मैल)
शहरी लोकसंख्या ११.३३%
साक्षरता दर ६५.१३%
प्रमुख शहरे रत्‍नागिरी, चिपळूण
लोकसभा मतदारसंघ रत्‍नागिरी-सिंधुदुर्ग
विधानसभा मतदारसंघ दापोली, गुहागर, चिपळूण, रत्‍नागिरी, राजापूर
खासदार विनायक राऊत
संकेतस्थळ


रत्‍नागिरी जिल्हा भारत देशातील महाराष्ट्र राज्याच्या ३6 जिल्ह्यांपैकी एक जिल्हा आहे. या जिल्ह्याच्या पश्चिमेस अरबी समुद्र, दक्षिणेस सिंधुदुर्ग जिल्हा, पूर्वेस सातारा जिल्हा, कोल्हापूर जिल्हा व सांगली जिल्हा तर उत्तरेस रायगड जिल्हा (जुने नाव कुलाबा जिल्हा) आहे. रत्‍नागिरी शहर हे या जिल्ह्याचे मुख्यालय आहे. या जिल्ह्याची शहरी लोकसंख्या ११.३३% इतकी आहे.

हल्लीचा रत्‍नागिरी जिल्हा हा ब्रिटिश काळात आणि नंतरही उत्तर रत्‍नागिरी जिल्हा म्हणून ओळखला जात होता. हल्लीच्या सिंधुदुर्ग जिल्ह्याला दक्षिण रत्‍नागिरी जिल्हा म्हणत. दक्षिण रत्‍नागिरी जिल्ह्यात सावंतवाडी या संस्थानाचाही समावेश होता. सन १९८१ साली या जिल्ह्यांची नावे बदलली.

प्रसिद्ध व्यक्ती[संपादन]

भूगोल[संपादन]

रत्‍नागिरी जिल्ह्याच्या सीमा[संपादन]

रत्‍नागिरी जिल्ह्यातील नद्या[संपादन]

काजळी, केव, गड, बोर, मुचकुंदी, वाशिष्टी, शास्त्री, सावित्री

तालुके[संपादन]

रत्‍नागिरी जिल्ह्यात खालील तालुके समाविष्ट आहेत:

 1. गुहागर
 2. खेड
 3. चिपळूण
 4. मंडणगड
 5. दापोली तालुका
 6. रत्‍नागिरी
 7. राजापूर
 8. लांजा
 9. संगमेश्वर

दळणवळण[संपादन]

रत्‍नागिरी ते कोल्हापूर (राष्ट्रीय महामार्ग २०४)

मुंबई ते कोचीन (राष्ट्रीय महामार्ग १७)

प्रेक्षणीय स्थळे[संपादन]

 1. आंबडवे
 2. गणपतीपुळे
 3. गणेशगुळे
 4. गुहागर
 5. चिपळूण
 6. जयगड
 7. नाणीज
 8. पावस
 9. पूर्णगड
 10. माचाळ
 11. मार्लेश्वर
 12. रत्‍नागिरी (शहर)
 13. शेरीवली
 14. संगमेश्वर


रत्‍नागिरी जिह्यातील गड-किल्ले[संपादन]

१. आंबोळगड

२. गोपाळगड

३. गोविंदगड

४. जंगली जयगड

५. जयगड

६. पालगड

७. पूर्णगड

८. प्रचितगड

९. भवानीगड

१०. महिपतगड

११. महीमंडणगड

१२. यशवंतगड

१३. रत्‍नदुर्ग

१४. रसाळगड

१५. विजयगड

१६. सुवर्णदुर्ग

शेती[संपादन]

रत्‍नागिरी जिल्हा हापूस आंब्यांसाठी जगप्रसिद्ध आहे. आंब्याप्रमाणेच काजू, नारळ, फणस, आमसूल(रातांबा) इत्यादींची लागवड येथे केली जाते. तांदळाची शेती येथे प्रामुख्याने केली जाते.

राजकीय संरचना[संपादन]

लोकसभा मतदारसंघ (१) : रत्‍नागिरी-सिंधुदुर्ग.

विधानसभा मतदारसंघ (५) : दापोली, गुहागर, चिपळूण, रत्‍नागिरीराजापूर.

संदर्भ[संपादन]

रत्‍नागिरी जिल्ह्यातील तालुके
मंडणगड | दापोली | खेड | चिपळूण | गुहागर | संगमेश्वर | रत्‍नागिरी | लांजा | राजापूर

बाहेरील दुवे[संपादन]