फिडेल कॅस्ट्रो

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
फिडेल कॅस्ट्रो
फिडेल कॅस्ट्रो


क्यूबाचा १७वा राष्ट्राध्यक्ष
कार्यकाळ
२ डिसेंबर १९७६ – २४ फेब्रुवारी २००८
पंतप्रधान स्वत:
उपराष्ट्रपती राउल कास्त्रो
मागील ओस्वाल्दो दोर्तिकोस तोरादो
पुढील राउल कास्त्रो

क्युबा कम्युनिस्ट पक्षाच्या मध्यवर्ती समितीचा सरसचिव
कार्यकाळ
२४ जून १९६१ – १९ एप्रिल २०११
मागील ब्लास रोका काल्देरियो
पुढील राउल कास्त्रो

क्यूबाचा १६वा पंतप्रधान
कार्यकाळ
१६ फेब्रुवारी १९५९ – २ डिसेंबर १९७६
मागील होजे मिरो कार्दोना

जन्म १३ ऑगस्ट, १९२६ (1926-08-13)
बिरान, ऑल्ग्विन प्रांत, क्यूबा
मृत्यू २५ नोव्हेंबर, २०१६ (वय ९०)
हवाना, क्यूबा
राजकीय पक्ष क्युबा कम्युनिस्ट पक्ष
सही फिडेल कॅस्ट्रोयांची सही

फिदेल कास्त्रो (स्पॅनिश: Fidel Alejandro Castro Ruz (मराठीत फिडेल कॅस्ट्रो) : जन्म : १३ ऑगस्ट १९२६; मृत्यू : २५ नोव्हेंबर २०१६) हा मुळातला क्रांतिकारी, क्यूबा देशाचा शासक झाला. त्याने प्रथम पंतप्रधान व नंतर राष्ट्राध्यक्ष ह्या पदांद्वारे क्युबावर एकूण ४७ वर्षे सत्ता चालवली. कट्टर साम्यवादी मार्क्सवादी-लेनिनवादी विचारसरणीच्या कास्त्रोच्या राजवटीदरम्यान क्यूबा पूर्णपणे एक-पक्षीय समाजवादी राष्ट्र बनले होते.

क्रांतिपूर्वी[संपादन]

कॅस्ट्रो यांनी क्यूबातील सॅन्टिॲगो येथे लष्कराविरोधात आघाडी उभारून २६ जुलै १९५३ रोजी संघर्षाला सुरुवात केली. त्यानंतर त्यांना अटक झाली. सुटका झाल्यानंतर ते मेक्सिकोमध्ये गेले आणि तेथे त्यांनी बंडखोर लष्कराची स्थापना केली. आपले समर्थक आणि आपल्या लष्करासह ते पुन्हा क्यूबामध्ये दाखल झाले. या लष्करविरोधातल्या कटातील बहुतेक जणांना एक तर ठार केले नाही तर अटकेत ठेवले गेले. या कारवाईतून कॅस्ट्रोसह एक छोटा गट वाचला, आणि पूर्वकडील डोंगराळ भागात जाऊन लपून बसला. त्यानंतर त्यांनी एक अधिक मोठे लष्कर उभारले आणि फुलजेन्को बटिस्ताने १ जानेवारी १९५९ रोजी क्यूबातून पलायन केल्यावर क्यूबाची सत्ता हस्तगत केली.

क्रांतीनंतर[संपादन]

क्यूबाने रशियाशी मैत्री करून केलेल्या अणुकरारानंतर युनायटेड स्टेट्सने क्यूबाबरोबरच्या व्यवहाराला विराम दिला. त्यानंतर तीन दशके क्यूबा आणि रशियाचे मैत्रिपूर्ण संबंध होते. पूर्व युरोपात डाव्या विचारांचा पराभव झाल्यानंतरही ते संबंध कायम राहिले.

कुटुंब[संपादन]

इ.स. १९४८मध्ये फिडेल कॅस्ट्रो यांनी मिर्टा डाएज - बलार्ट यांच्याशी विवाह केला. या उभयतांना इ.स. १९४९ साली मुलगा झाला. त्याचे नाव फिडेल फेलिक्स कॅस्ट्रो डियाज - बलार्ट असे आहे. १९५५ साली त्यांचा घटस्फोट झाला. फिडल कॅस्ट्रो मान्य करत नसले तरी दलिया सोटो डेल वॅले नावाच्या शिक्षिकेबरोबर त्यांचा विवाह झाल्याचे वृत्त आहे. या शिक्षिकेपासून त्यांना पाच मुले असल्याचेही सांगण्यात येते. या व्यतिरिक्त त्यांची अनेक लग्ने झाली असल्याचे आणि त्यांना अनेक मुले असल्याचे सांगण्यात येते.

चरित्र[संपादन]

अतुल कहाते यांनी ‘फिडेल कॅस्ट्रो’ या नावाचे मराठी चरित्र लिहिले आहे. याशिवाय अरुण साधू यांचे क्यूबाच्या क्रांतीवरील ‘फिडेल, चे आणि क्रांती' नावाचे पुस्तक आहे.

क्यूबाविषयी पुस्तके[संपादन]