Jump to content

लक्ष्मण लोंढे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
लक्ष्मण लोंढे
जन्म इ.स. १९४५
मृत्यू इ.स. २०१५
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र कवी, लेखक,
प्रसिद्ध साहित्यकृती ,

लक्ष्मण लोंढे (जन्म : १९४५; - मुंबई, ६ ऑगस्ट, २०१५) हे मराठीतले विज्ञानकथा लेखक होते. बँकेत नोकरी करणाऱ्या लक्षण लोंढे यांनी वयाच्या ५०व्या वर्षी स्वेच्छानिवृत्ती घेतली आणि त्यांनी त्यानंत आपला पूर्ण वेळ विज्ञान कथा लेखनात घालविला. दुसरा आइन्स्टाइन ही त्यांची कथा इंग्रजीत 'सायन्स टुडे' या नियतकालिकात प्रसिद्ध झाली. पुढे या कथेला कन्सास विद्यापीठाचा जागतिक सर्वोत्कृष्ट कथा म्हणून पुरस्कार मिळाला. तसेच कथेची निवड जगातील विज्ञान लेखकांसाठी सर्वोच्च मानल्या जाणाऱ्या जेम्स गुन यांच्या 'द रोड टू सायन्स फिक्शन'च्या १९८९ च्या आवृत्तीसाठी निवडली गेली. आंतरराष्ट्रीय बहुमान मिळवणारे ते पहिले मराठी विज्ञान कथालेखक होत. ते सोबत साप्ताहिकामध्येच लक्ष्मणझुला नावाचे सदर लिहीत.

कोणतीही वैज्ञानिक पार्श्वभूमी नसतानाही त्यांनी विज्ञान लेखक म्हणून खूप चांगली कामगिरी केली. विज्ञान लेखक होण्यासाठी वैज्ञानिक पार्श्वभूमीपेक्षा जिज्ञासेची आवश्यकता असते हे त्यांनी दाखवून दिले. कथा लिहिण्यासाठी आवश्यक ते पुरेसे ज्ञान जवळ नसल्यामुळे कोणताही विषय त्यांनी निवडला की ते त्या विषयाचा एखाद्या वैज्ञानिकासारखाच अभ्यास करायचे. त्या विषयाशी संबधित प्रकाशित झालेले साहित्याचे वाचन करून तो विषय पक्का करून सामान्यांना समजेल अशा भाषेत त्या विषयाची मांडणी ते करायचे. मराठी विज्ञान परिषदेत नवोदित विज्ञान लेखकांसाठी मार्गदर्शन कार्यशाळा व्हायच्या. या कार्यशाळेत नवोदित लेखकांच्या लेखनावर ते अत्यंत मार्मिक टिप्पणी करत असत. या टिप्पणीमुळे त्या लेखकाचा उत्साह वाढे.

वैज्ञानिक कथांव्यतिरिक्त त्यांनी चरित्रे आणि ललित कथा-कादंबऱ्याही लिहिल्या.

लक्ष्मण लोंढे यांचे प्रकाशित साहित्य

[संपादन]
  • असं घडलंच नाही (कादंबरी)
  • आणि वसंत पुन्हा बहरला (चरित्र)
  • कारकीर्द
  • काऊंट डाऊन
  • गुंता
  • थँक यू मिस्टर फॅरॅडे
  • दुसरा आइनस्टाइन
  • देवांसि जिवें मारिले
  • दूर - क्षितिजापलीकडे
  • धर्मयोद्धा
  • नव्या शतकाच्या उंबरठ्यावर
  • रिमोट कंट्रोल
  • लक्ष्मण उवाच
  • लक्ष्मणझुला
  • लक्ष्मणवेध
  • लक्ष्मणायन
  • वाळूचे गाणे
  • संघर्ष (कादंबरी)

पुरस्कार

[संपादन]
  • "दुसरा आइनस्टाइन" कथा संग्रहाला महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट साहित्य निर्मिती पुरस्कार
  • "दुसरा आइनस्टाइन" या कथेला कन्सास विद्यापीठाकडून सर्वोत्कृष्ट जागतिक विज्ञान कथा पुरस्कार
  • शांताराम कथा पारितोषिक []

स्मृतिग्रंथ

[संपादन]

विज्ञानकथा लेखक लक्ष्मण लोंढे यांचा पहिला स्मृतिदिन ६ ऑगस्ट २०१६ रोजी होता. त्या दिवशी त्यांच्या स्मृतिपर लिखाणांचा 'ओंजळभर' नावाचा लेखसंग्रह प्रकाशित झाला. स्वाती लोंढे त्या संग्रहाच्या संपादक आहेत.

संदर्भ

[संपादन]