के.ना. वाटवे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search


Imbox content.png
हा विभाग/लेख सामान्य उल्लेखनीयता मार्गदर्शक तत्त्वांच्या अनुरूप नाही. कृपया या विषयाबद्दल विश्वसनीय स्रोत जोडून या लेखाची उल्लेखनीयता सिद्ध करण्यात मदत करा. जर याची उल्लेखनीयता सिद्ध केली जाऊ शकत नसेल, तर हा लेख दुसऱ्या लेखात एकत्रीत / पुनर्निर्देशित केला जाऊ शकतो किंवा थेट काढून टाकला जाऊ शकतो याची नोंद घ्यावी.
Imbox content.png
ह्या लेखाला एकही संदर्भ दिला गेलेला नाही. विश्वसनीय स्रोत जोडून या लेखातील माहितीची पडताळणी करण्यात मदत करा. संदर्भ नसल्याने प्रस्तुत लेखाची उल्लेखनीयता ही सिद्ध होत नाही. संदर्भहीन मजकूराची पडताळणी करता येत नसल्याने व उल्लेखनीयता सिद्ध होत नसल्याने हा लेख काढून टाकला जाऊ शकतो याची नोंद घ्यावी. संदर्भ कसे निवडावेत याची माहिती येथे मिळेल तर संदर्भ कसे जोडायचे याची माहिती आपल्याला येथे मिळेल.

डाॅ. केशव नारायण वाटवे (जन्म {१९ एप्रिल १८९५; मृत्यू : ९ मे १९८१) हे एक मराठीचे प्राध्यापक आणि लेखक होते. त्यांचे शिक्षण औंध (सातारा) आणि पुणे येथे झाले. ते शरद तळवलकरांचे सासरे लागत.

के.ना. वाटवे हे संस्कृत आणि मराठी साहित्याचे रसिक अभ्यासक होते. संस्कृत व मराठी साहित्याची सूक्ष्म आणि रसिक परीक्षणे करून त्यांनी काही पुस्तके लिहिली.

के.ना. वाटवे यांनी लिहिलेली पुस्तके[संपादन]

 • किरार्जुनीयम् कथा
 • नलदमयंती काव्य (छंदोबद्ध काव्य)
 • पंडिती काव्य
 • प्राचीन मराठी पंडिती काव्य
 • माझी वाटचाल (आत्मचरित्र)
 • रसविमर्श
 • (पंच महाकाव्याधिष्ठित) संस्कृत काव्याचे पंचप्राण
 • संस्कृत नाट्यसौंदर्य
 • संस्कृत साहित्यातील विनोद

के.ना. वाटवे यांना मिळालेले सन्मान आणि पुरस्कार[संपादन]

 • डाॅ. के.ना. वाटवे यांच्या 'रसविमर्श' या पुस्तकाला सन १९४२ सालातील उत्कृष्ट पुस्तक म्हणून मुंबई विद्यापीठाचे दादोबा पांडुरंग तर्खडकर पारितोषिक मिळाले.
 • त्याच पुस्तकाला भोर येथील शंकराजी नारायण पारितोषिक
 • त्याच पुस्तकाला डेक्कन सोसायटीची इचलकरंजी पारितोषिक
 • के.ना. वाटवे यांचा रसविमर्श हा ग्रंथ मुंबई, पुणे, नागपूर, कर्नाटक, गुजराथ येथी विद्यापीठांनी बी,ए.ला व एम.ए.ला लावला.