Jump to content

"मोहन आपटे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ३१: ओळ ३१:
| तळटिपा =
| तळटिपा =
}}
}}
'''मोहन आपटे''' (जन्म : कुवेशी, राजापूर तालुका, कोकण, ५ डिसेंबर १९३८; मृत्यू : मुंबई, १२ नोव्हेंबर २०१९)<ref>{{संकेतस्थळ स्रोत | दुवा=http://www.rajhansprakashan.com/node/369 | शीर्षक=मोहन आपटे | प्रकाशक=राजहंस प्रकाशन | भाषा=मराठी | accessdate=२३ ऑगस्ट २०१४}}</ref> - ) हे [[भौतिकशास्त्र|भौतिकशास्त्राचे]] प्राध्यापक, वैज्ञानिक व [[मराठी]] लेखक होते.
प्रा. '''मोहन आपटे''' (जन्म : कुवेशी, राजापूर तालुका, कोकण, ५ डिसेंबर १९३८; मृत्यू : मुंबई, १२ नोव्हेंबर २०१९)<ref>{{संकेतस्थळ स्रोत | दुवा=http://www.rajhansprakashan.com/node/369 | शीर्षक=मोहन आपटे | प्रकाशक=राजहंस प्रकाशन | भाषा=मराठी | accessdate=२३ ऑगस्ट २०१४}}</ref> - ) हे [[भौतिकशास्त्र|भौतिकशास्त्राचे]] प्राध्यापक, वैज्ञानिक व [[मराठी]] लेखक होते.


मोहन आपटे यांचे शालेय शिक्षण अनेक ठिकाणी झाले. पुण्याच्या फर्ग्युसन काॅलेजातून भौतिकशास्त्रातील पदवी घेतल्यावर त्यांनी अहमदाबाद विद्यापीठातून पदव्युत्तर शिक्षण घेतले. विद्यार्थीदशेत ते कुस्ती शिकले होते. विज्ञानाबरोबरच त्यांना चित्रकलेतही स्वारस्य होते. ते कविता पण करायचे.
==प्रकाशित साहित्य==

मुंबईतील भारतीय विद्याभवन संचालित सोमाणी महाविद्यालयात १९६६ ते १९९८ या काळात ते भौतिकशास्त्राचे प्राध्यापक होते. त्या महाविद्यालयाच्या भौतिकशास्त्र विभागाचे प्रमुख असताना ते निवृत्त झाले.

==लेखन==
प्रा. मोहन आपटे यांनी अवकाशशास्त्र, इतिहास, खगोलशास्त्र, गणित, निसर्ग, भौतिकशास्त्र, शरीरशास्त्र, संगणक अशा अनेक विषयांवर विपुल लिखाण केले. मराठीबरोबरच त्यांनी इंग्रजीतूनही नऊ पुस्तके लिहिली. मराठीतून सोप्या भाषेत विज्ञानविषयक जागृती करणारे, वैज्ञानिक वास्तव मांडणारे लिखाण त्यांनी केले. वैज्ञानिक विषय सोप्या भाषेत समाजावून सांगणारी व्याख्याने आणि प्रदर्शनांसाठी त्यांनी महाराष्ट्रभर दौरे केले.

आपट्यांची ‘मला उत्तर हवंय’ ही अकरा पुस्तकांची मालिका खूप गाजली. त्यामध्ये अगदी साध्या विज्ञानविषयक शंकांना सोप्या भाषेत उत्तरे दिली आहेत. त्या त्या विषयावरील शंभर प्रश्नांची उत्तरे एका पुस्तिकेत मांडली आहेत. [[भास्कराचार्य|भास्कराचार्याचे]] संस्कृत श्लोक, त्यांची गणिती सूत्रे त्यांनी सोप्या मराठीत मांडली. ‘लोकसत्ता’च्या रविवारच्या ‘लोकरंग’ या साप्ताहिक पुरवणीत ते खगोलशास्त्रावर एक सदर लिहीत.

==संस्थाकीय कार्य==
आपटे हे अनेक वैज्ञानिक आणि सामाजिक संस्थांशी निगडित होते. त्यांतल्या काही संस्था :-
* खगोल मंडळ, सायन-मुंबई
* जनसेवा समिती, विले पार्ले या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष. या संस्थेतर्फे सामाजिक कार्यापासून, विज्ञान, खगोलशास्त्र, इतिहास ते दुर्गभ्रमंती अशा अनेक विषयांना चालना देणारे उपक्रम हाती घेण्यात आले.
* मराठी विज्ञान परिषद, सायन चुनाभट्टी-मुंबई
* मुंबई विद्यापीठाच्या बहि:शाला विभाग
* विले पार्ले-मुंबई येथील लोकमान्य सेवा संघ
* विले पार्ले-मुंबई येथील उत्कर्ष मंडळ वगैरे. या संस्थांच्या कामांत त्यांचा सक्रिय सहभाग होता.

==प्रकाशित साहित्य (एकूण ७५हूनअधिक पुस्तके)==
* अग्निनृत्य : कृत्तिका प्रकाशन, २००४
* अग्निनृत्य : कृत्तिका प्रकाशन, २००४
* अण्वस्त्रांचा मृत्युघोष : कृत्तिका प्रकाशन, २००४
* अण्वस्त्रांचा मृत्युघोष : कृत्तिका प्रकाशन, २००४

२१:०२, १४ नोव्हेंबर २०१९ ची आवृत्ती

मोहन आपटे
जन्म ५ डिसेंबर १९३८)
कुवेशी-राजापूर-कोंकण
मृत्यू १२ नोव्हेंबर २०१९
विलेपार्ले-मुंबई

प्रा. मोहन आपटे (जन्म : कुवेशी, राजापूर तालुका, कोकण, ५ डिसेंबर १९३८; मृत्यू : मुंबई, १२ नोव्हेंबर २०१९)[] - ) हे भौतिकशास्त्राचे प्राध्यापक, वैज्ञानिक व मराठी लेखक होते.

मोहन आपटे यांचे शालेय शिक्षण अनेक ठिकाणी झाले. पुण्याच्या फर्ग्युसन काॅलेजातून भौतिकशास्त्रातील पदवी घेतल्यावर त्यांनी अहमदाबाद विद्यापीठातून पदव्युत्तर शिक्षण घेतले. विद्यार्थीदशेत ते कुस्ती शिकले होते. विज्ञानाबरोबरच त्यांना चित्रकलेतही स्वारस्य होते. ते कविता पण करायचे.

मुंबईतील भारतीय विद्याभवन संचालित सोमाणी महाविद्यालयात १९६६ ते १९९८ या काळात ते भौतिकशास्त्राचे प्राध्यापक होते. त्या महाविद्यालयाच्या भौतिकशास्त्र विभागाचे प्रमुख असताना ते निवृत्त झाले.

लेखन

प्रा. मोहन आपटे यांनी अवकाशशास्त्र, इतिहास, खगोलशास्त्र, गणित, निसर्ग, भौतिकशास्त्र, शरीरशास्त्र, संगणक अशा अनेक विषयांवर विपुल लिखाण केले. मराठीबरोबरच त्यांनी इंग्रजीतूनही नऊ पुस्तके लिहिली. मराठीतून सोप्या भाषेत विज्ञानविषयक जागृती करणारे, वैज्ञानिक वास्तव मांडणारे लिखाण त्यांनी केले. वैज्ञानिक विषय सोप्या भाषेत समाजावून सांगणारी व्याख्याने आणि प्रदर्शनांसाठी त्यांनी महाराष्ट्रभर दौरे केले.

आपट्यांची ‘मला उत्तर हवंय’ ही अकरा पुस्तकांची मालिका खूप गाजली. त्यामध्ये अगदी साध्या विज्ञानविषयक शंकांना सोप्या भाषेत उत्तरे दिली आहेत. त्या त्या विषयावरील शंभर प्रश्नांची उत्तरे एका पुस्तिकेत मांडली आहेत. भास्कराचार्याचे संस्कृत श्लोक, त्यांची गणिती सूत्रे त्यांनी सोप्या मराठीत मांडली. ‘लोकसत्ता’च्या रविवारच्या ‘लोकरंग’ या साप्ताहिक पुरवणीत ते खगोलशास्त्रावर एक सदर लिहीत.

संस्थाकीय कार्य

आपटे हे अनेक वैज्ञानिक आणि सामाजिक संस्थांशी निगडित होते. त्यांतल्या काही संस्था :-

  • खगोल मंडळ, सायन-मुंबई
  • जनसेवा समिती, विले पार्ले या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष. या संस्थेतर्फे सामाजिक कार्यापासून, विज्ञान, खगोलशास्त्र, इतिहास ते दुर्गभ्रमंती अशा अनेक विषयांना चालना देणारे उपक्रम हाती घेण्यात आले.
  • मराठी विज्ञान परिषद, सायन चुनाभट्टी-मुंबई
  • मुंबई विद्यापीठाच्या बहि:शाला विभाग
  • विले पार्ले-मुंबई येथील लोकमान्य सेवा संघ
  • विले पार्ले-मुंबई येथील उत्कर्ष मंडळ वगैरे. या संस्थांच्या कामांत त्यांचा सक्रिय सहभाग होता.

प्रकाशित साहित्य (एकूण ७५हूनअधिक पुस्तके)

  • अग्निनृत्य : कृत्तिका प्रकाशन, २००४
  • अण्वस्त्रांचा मृत्युघोष : कृत्तिका प्रकाशन, २००४
  • अवकाशातील भ्रमंती - भाग १, २ आणि ३ : राजहंस प्रकाशन, १९८९
  • अविभाज्य संख्यांची कुळकथा : अश्वमेध प्रकाशन, १९९६
  • आकाशगंगा : १९८७
  • आपली पृथ्वी : अभिषेक टाईपसेटर्स आणि प्रकाशक, २००८
  • इंटरनेट : एक कल्पवृक्ष : राजहंस प्रकाशन, १९९७
  • कालगणना : २००८
  • कृष्णविवर - अद्भुत खगोलीय चमत्कार : राजहंस प्रकाशन, २००२
  • गणित शिरोमणी भास्कराचार्य : मोरया प्रकाशन, १९९३, २००४
  • गणिताच्या पाऊलखुणा. : अश्वमेध प्रकाशन, २००४
  • चंद्रप्रवासाची दैनंदिनी : अभिषेक एन्टरप्राइझेस, १९९१
  • चंद्रलोक (रामबाग) : राजहंस प्रकाशन, २००८
  • चला भूमितीशी खेळू या :
  • डळमळले भूखंड : मोरया प्रकाशन, १९९४
  • डाइईनासॉर्स : मोरया प्रकाशन, २००५
  • डावखुऱ्यांची दुनिया : अश्वमेघ प्रकाशन, २००४
  • नक्षत्रवेध : अभिषेक एन्टरप्राइझेस, २००४
  • नभ आक्रमिले - विज्ञानयुगाच्या शताब्दीचा सचित्र इतिहास. : राजहंस प्रकाशन, २००५
  • निसर्गाचे गणित. : राजहंस प्रकाशन, १९९३
  • ब्रम्हांड-उत्पत्ती, स्थिती, विनाश : राजहंस प्रकाशन, २००४
  • भास्कराचार्य (गणित शिरोमणी) : मोरया प्रकाशन १९९३, २००४
  • मला उत्तर हवंय - अवकाश : राजहंस प्रकाशन, १९९८
  • मला उत्तर हवंय - खगोलशास्त्र : राजहंस प्रकाशन, १९९२
  • मला उत्तर हवंय ! (तंत्रज्ञान) : राजहंस प्रकाशन, २००४
  • मला उत्तर हवंय - पदार्थविज्ञान : राजहंस प्रकाशन, १९९२
  • मला उत्तर हवंय - संगणक : राजहंस प्रकाशन, १९९२
  • विज्ञान वेध : राजंहस प्रकाशन, २००४
  • विश्वात आपण एकटेच आहोत काय ? : राजंहस प्रकाशन,२००४
  • शतक शोधांचे : राजहंस प्रकाशन, २०००
  • शरीर एक अद्भुत यंत्र : राजा प्रकाशन, १९९८
  • शालेय खगोलशास्त्र : अभिषेक टाईपसेटर्स अ‍ॅन्ड पब्लिशर्स, २००५
  • संख्यांची अनोखी दुनिया :
  • संख्यांचे गहिरे रंग : राजहंस प्रकाशन, २००४
  • संगणक : १९९४
  • संदेशायन : ग्रंथाली प्रकाशन, २००४
  • सहस्रकातील विज्ञान : (सहलेखक शरद चाफेकर आणि इतर), २००३
  • सहस्ररश्मी : अश्वमेध प्रकाशन, १९९५
  • सूर्यग्रहण : मोरया प्रकाशन, २००४
  • सूर्यमालेतील चमत्कार : राजहंस प्रकाशन, २००४
  • स्पेस शटल : अभिषेक टाईपसेटर्स अ‍ॅन्ड पब्लिशर्स, २००७
  • स्मरणशक्ती कशी वाढवावी? :
  • स्तंभलेखन (दैनिक लोकसत्तातील अंतरिक्ष या मालिकेत)

पुरस्कार

  • मुंबईच्या ’खगोल मंडळ’ या संस्थेचा पहिला भास्कर पुरस्कार []

गौरव

  • १९८१ मध्ये ब्रिटिश कौन्सिल तर्फे इंग्लंड दौऱ्याचे निमंत्रण

संदर्भ

  1. ^ http://www.rajhansprakashan.com/node/369. २३ ऑगस्ट २०१४ रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  2. ^ भास्कर पुरस्कार[मृत दुवा]

बाह्य दुवे