भाऊ फक्कड
Appearance
भाऊ फक्कड हे तमाशातील एक अष्टपैलू व्यक्तिमत्त्व होते. ते सातारा जिल्ह्यातल्या पाटण तालुक्यातील हुंबरणे या गावचे होते. त्यांनी तमाशात नायकापासून ते खलनायकापर्यंत सर्व कामे केली. ते तमाशात स्वतः नाच करीतच, शिवाय अनेक वाद्ये वाजविण्यात त्यांचा हातखंडा होता. त्यांची बुद्धी अलौकिक होती. मात्र, दुर्दैवाने त्यांना उपेक्षित आणि अंधारात रहावे लागले.
साक्षात् पठ्ठे बापूरावसारख्या नामवंताला सवाल जवाबात हरवणारा अत्यंत ज्ञानी शाहीर म्हणून शाहीर भाऊ फक्कड यांचे नाव इतिहासात अजरामर झाले आहे. यांनी लिहिलेल्या लावण्या, गण-गवळणी वाचल्यानंतर आणि त्यांचा अभिनय व संवादफेक पाहिल्यानंतर या शाहिराची उंची लक्षात येते.
प्रा. डाॅ. रुस्तुम अचलखांब यांनी भाऊ फक्कड यांच्यावरील केलेले संशोधन प्रसिद्ध आहे.
भाऊ फक्कड यांच्यावरील पुस्तके
[संपादन]- शाहिरांचे शाहीर : भाऊ फक्कड (लेखक - प्रा. डॉ. पांडुरंग ऐवळे)
- शाहीर भाऊ फक्कड (लेखक - माधव मोडक ऊर्फ बंधु माधव)