लेवा बोली

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

लेवा गण बोली जळगाव जिल्ह्याच्या पूर्व भागात आणि मलकापूर तालुक्यात बोलली जाते. तापी, पूर्णा, वाघूर, आणि गिरणा या नद्यांच्या प्रदेशात शेती व्यवसाय असलेल्या लेवा पाटीदार समाजाची वस्ती आहे. या व्यवसायात असलेल्या बलुतेदारांची ही बोली संपर्क भाषा आहे.

लेवा बोली
लेवा गणबोली
प्रदेश खानदेश
वऱ्हाड
भाषाकुळ
हिंद-युरोपीय
लिपी देवनागरी
भाषा संकेत
ISO ६३९-१ -

लेवा बोली ही खान्देशी भाषासमूहातील एक बोली आहे, जी खान्देशातील जळगाव जिल्ह्याच्या पूर्व भागात, बऱ्हाणपूर जिल्ह्यातील काही भागात व खान्देशला लागून असलेल्या बुलडाणा जिल्ह्यातील काही सिमांत भागात बोलली जाते.

एका बाजूला अहिराणी भाषिक प्रदेश तर दुसऱ्या बाजूला मराठीची वऱ्हाडी बोली बोलली जाणारा प्रदेश असल्या कारणाने पूर्व खान्देशातील इतर बोल्यांप्रमाणे लेवा बोलीवर सुद्धा अहिराणी व वऱ्हाडी या दोन्ही भाषांचा प्रभाव पडलेला दिसून येतो. भाषा व व्याकरणाच्या नियमांनुसार लेवा बोलीची मराठीशी अधिक जवळीक असल्यामुळे लेवा बोलीला मराठीची बोली मानली जाते. असे असले तरीही लेवा बोलीमध्ये अहिराणीचेही अनेक गुणधर्म आढळून येतात.

साहित्य[संपादन]

लेवा बोली मध्ये फार कमी साहित्य उपलब्ध असून, कवयित्री बहिणाबाई चौधरींच्या कविता लेवा बोलीतील सर्वात प्रसिद्ध साहित्य आहेत.

कोश साहित्य[संपादन]

नि.रा. पाटील आणि ऊर्मिला पाटील यांनी 'लेवा गण बोली कोश' तयार केला आहे. त्यात या बोलीचा पूर्ण इतिहास व्याकरणासह दिला आहे. त्याला महाराष्ट्र शासनाचा २००६ सालचा उत्कृष्ट निर्मितीचा पुरस्कार मिळाला आहे.[१]

संदर्भ[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]

१. लेवा समाजाचे संकेतस्थळ (इंग्रजी मजकूर)