कोंडाणा लेणी
कोंडाणा लेणी ता.कर्जत जि. रायगड येथील कोंदिवडे गावाजवळ आहे..[१]
लेणी
[संपादन]इसवीसन पूर्व दुसऱ्या शतकात हे लेणे निर्माण झाले.
स्वरूप
[संपादन]कोंडाणे लेण्यात एक चैत्यगृह, सात विहार आणि दोन गुहा आहेत. विहारांच्या व्हरांड्यांच्या छतांवर रंगीत चित्रे होती. ही चित्रे बहुतेक प्रमाणात लुप्त झालेली दिसून येतात.
चैत्यगृह
[संपादन]मुख्य लेख :: चैत्यगृह
अंदाजे नऊ मीटर उंचीचे चैत्यगृह येथे आहे.
पिंपळपानाच्या आकारातील कमानी कोरलेल्या येथे दिसून येतात. या कमानीभोवती दर्शनी भिंतीवर मोठे कोरीव काम केलेले आहे. चैत्याकार गवाक्ष, वेदिकापट्टी, नक्षीदार जाळी, नृत्य कलाकार आदींचे शिल्पपट हे कोरलेले दिसते. यापटातील काही नृत्यकलाकारांच्या हाती धनुष्य-बाण आदी आयुधे आहेत. या शिल्पांवर वस्त्रप्रावरणे, अलंकारही आणि तत्कालीन वेगळी केशभूषाही उठून दिसते. दोन्ही बाजूस असलेल्या या शिल्पपटांच्याखालीच दोन्हीकडे यक्षांची भव्य शिल्पे कोरलेली असावीत. परंतु ती आता भग्नावस्थेत आहेत.
या भग्न यक्षाच्या डाव्या खांद्यावर प्राचीन ब्राह्मी लिपीतील लेख आहे. ‘कन्हस अंतेबासिन बलकेन कतं’ या लेखाचा अर्थ असा की, ‘कन्हाचा अंतेवासी (शिष्य) बालुक याने (हे काम) केले’.
कलते खांब, झुकत्या भिंती आणि खोदकामात केलेला अर्ध उठावाचा वापर येथे दिसतो. या गृहास आधार म्हणून मूळ दगडातील २८ खांब येथे कोरलेले होते. अत्यंत प्रमाणबद्ध असलेले हे अष्टकोनी खांब इतिहासात आक्रमकांच्या हल्ल्यात तोडले गेलेले दिसून येतात. चैत्यगृहाच्या मध्यभागी दहा फूट व्यासाचा स्तूप आहे. या स्तूपाचा विध्वंस झालेला दिसतो.
गजपृष्ठाकृती छत असलेल्या या चैत्यगृहात छताला अर्धवर्तुळाकार लाकडी वासे बसवलेले आहेत. कार्ले, भाजे येथील लेण्यातही असे वासे दिसून येतात.
हे सुद्धा पहा
[संपादन]संदर्भ आणि नोंदी
[संपादन]हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |