तावडी बोलीभाषा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Wiktionary-logo-mr.png
Look up तावडी बोलीभाषा in
Wiktionary, the free marathi dictionary.
तावडी बोलीभाषा ह्या बोलीभाषेची शब्दसूची
विक्शनरी, या मुक्त शब्दकोशात पाहा/तपासा/अद्याप नसलेले शब्द/वाक्यांश जोडा अथवा सूची:मराठी बोलीभाषातील शब्द येथे मराठी बोलीभाषांची सामायिक शब्दसूची पहा

तावडी ही एक मराठीची बोलीभाषा आहे. ही प्रामुख्याने पूर्व खानदेशात बोलली जाते. जळगाव,भुसावल ,यावल रावेर बऱ्हाणपूर ,जामनेर ,बोदवड,मुक्ताईनगर- सूर्यकन्या तापी खोऱ्यातील हा प्रदेश तावडी प्रदेश म्हणून ओळखला जातो .तेथील लोकांना तावडी लोक म्हणतात.तावडी लोक तावडी बोली बोलतात.

उच्चार प्रक्रियेतील भाषिक काटकसर[संपादन]

कमीत कमी शब्दात जास्तीत जास्त आशय व्यक्त करण्याकडे तावडी बोलीचा कल आहे. जसे आल्था (आला होता), गेल्था (गेला होता), कुठलोंग (कुठपर्यंत), काव्हाचा (केव्हापासूनचा), तधलोंग (तिथपर्यंत), आठलोंग (इथपर्यंत), पहाल्ता (पाहिला होता), राहल्ता (राहिला होता), झाल्ता (झाला होता) इत्यादी.

तावडी बोलीतील वैशिष्ट्यपूर्ण सर्वनामे[संपादन]

भो (भाऊ), बीन (बहिण), बायजा (आत्या), बोय (आजी), म्हतारा (बाप), म्हतारी (आई), जेठाणी (मोठी जाऊ), देराणी (लहान जाऊ), चांबल्डी (आजी), डोबल्डा (आजोबा), बी (सुद्धा), जो (जवळ), न् (आणि), तूं (तर), मीन्हं (मी), तुन्हं (तू), महे (माझे), तुहे (तुझे) इत्यादी.


संदर्भ व नोंदी[संपादन]Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.