मालवणी बोलीभाषा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
Wiktionary-logo-mr.png
Look up मालवणी बोलीभाषा in
Wiktionary, the free marathi dictionary.
मालवणी बोलीभाषा ह्या बोलीभाषेची शब्दसूची
विक्शनरी, या मुक्त शब्दकोशात पाहा/तपासा/अद्याप नसलेले शब्द/वाक्यांश जोडा अथवा सूची:मराठी बोलीभाषातील शब्द येथे मराठी बोलीभाषांची सामायिक शब्दसूची पहा
Disambig-dark.svg

मालवणीही कोकण विभागातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही भागाची बोली भाषा आहे. मच्छिंद्र कांबळी यांनी मालवणी भाषेत बरेच नाट्यप्रयोग केले आहेत. ऐकण्यास मधुर अशी ही भाषा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे एक वैशिष्ट्य आहे.

मालवणी म्हणून ओळखली जाणारी ही बोली मूळ कुडाळी किंवा कुडाळदेशकर भाषा आहे. ह्या कुडाळ पट्ट्यातील मालवणीचा पहिला शब्दकोश शामकांत मोरे यांनी तयार केला आहे. डोंबिवलीतील ‘सुमेरू प्रकाशन’ने या शब्दकोशाची मांडणी केली आहे. व्याकरणाचे संदर्भ शब्दकोशासाठी घेण्यात आले आहेत. या शब्दकोशात ६५० क्रियापदे आहेत. एक मालवणी शब्द, त्याचे पोटअर्थ, त्या शब्दाशी संबंधित अन्य शब्द किंवा तो शब्द असलेल्या म्हणीदेखील या कोशात आहेत. ३५ मालवणी म्हणींचा समावेश आहे. भाषेचे क्षेत्र जिल्हा, प्रांतापुरते मर्यादित असते. त्यामुळे या भाषेला स्थानिक नाव मिळाले. या बोलीच्या शब्दकोशालाही मालवणी शब्दकोश म्हणतात. अन्य प्रांताचे किंवा भाषेचे नाव देण्यात आले असते तर या शब्दकोशासंबंधी संभ्रम निर्माण होण्याची शक्यता होती, असे लेखकाने स्पष्ट केले आहे. दर १२ कोसांवर भाषा बदलते; या उक्तीनुसार कणकवली, देवगड, वेंगुर्ला, मालवण, आचरे, बांदा परिसरांतील मालवणी रहिवासी यांची बोली थोडी वेगळी आहे.

मालवणी माणूस फणसासारखा म्हणजे वरून काटेरी पण आतून खूप गोड आणि रसाळ असतो, हे मालवणी माणसाचे वर्णन खालील कवितेत मांडले आहे.

मालवणी माणसा प्रेमाची भुकेली,

शाबासकीचो दोर घेवन माडार चढतली, चढता चढता मधेच खाली पडतली, तोंडार आपाटली तरी ही ही करतली

स्वतः भुकी रवतली, पावन्याक जेवक घालतली, कोकम मिश्यांका लावतली, तूप खालय म्हनांन सांगतली, हजार रुपयाची वस्तू धा रुपयाक मागतली, मिळाली नाय ती खराब म्हणान सांगतली,

गणपतीत जोरात आरती-भजना गातली, शिगम्याक जोशात सोंगा नाचवतली, दशावतारी नाटक बघीत थयच पसारतली, जात्रेचा खाजा चार दीस खातली,

मालवणी माणसा ही अशीच रवतली, फसली गेली तरी नाय म्हनतली, हसणाऱ्याक रडयतली,रडणार्‍याक हसवतली,

गुणगान करता करता मधीच गाळीय घालतली.

मालवणीतील म्हणी[संपादन]

मालवणी भाषेत काही सुरेख म्हणी आहेत. खाली काही म्हणी उदाहरणादाखल दिल्या आहेत :-

 • अंधारात केला पण उजेडात इला
 • अरदो मिरग सारण गेलो आणि म्हारणीच्या झिलान उतव बांदलो
 • आकाडता बापडा, सात माझी कापडा
 • आगासली ती मागासली पाठसून इलेली गुरवार रवली
 • आंधळा दळता आणि कुत्रा खाता
 • आपला खावचा आनि दडान हगाचा
 • आपला ठेवा झाकान आणि बघा दुसऱ्याचा वाकान
 • आपली मोरी आणि मुताक चोरी?
 • आयत्यार कोयत्ये
 • आवशीक खाव व्हरान
 • आवस रडता रोवाक आणि चेडू रडता घोवाक
 • आवस सोसता आणि बापूस पोसता
 • आळशी उटाक आनी शिमरा शिंकाक
 • इतभर तौसा नी हातभर बी
 • उडालो तर कावळो बुडलो तर बांडूक
 • एक कानार पगडी आणि घराक बायल उघडी
 • एक मासो आणि खंडी भर रस्सो
 • कपाळार मुकुट आणि खालसुन नागडो
 • करुक गेलं गणपती आणि झाला केडला
 • करून करून भागलो आणि देव पूजेक बसलो
 • करून गेलो गाव नि ....चा नाव
 • कशात काय आणि फटक्यात पाय
 • काप गेला भोका रवली
 • कापाड न्हेला बायन आणि चींधी नेली गायन
 • कायच नाय कळाक - बोको गेलो म्हाळाक
 • कावळो बसाक फांदी मोडाक
 • कुल्यापाटी आरी नी चांभार पोरांक मारी
 • केला तुका - झाला माका
 • कोको मिटाक जाता मगे पावस येता
 • कोणाची जळताहा दाडी आणि तेच्यार कोण पेतयता इडी
 • कोणाच्यो म्हशी नी कोणाक उठा बशी
 • कोंबो झाकलॉ म्हणान उजवाडाचा रव्हत नाय
 • खळ्यात मुतलला आनी जावयाक घातलला सारख्याच
 • खाल्लेला सरता नि बोल्लेला र्‍हवता
 • खांद्यार बसयलो तर कानात मुतता
 • खिशात नाय आणो नि माका म्हणता शाणो
 • खिशात नाय दमडी आणि खावची हा कोंबडी
 • खुळा भांडता वझरा वांगडा
 • खेकट्याक मेकटा
 • गजालीन खाल्लो घोव,परशान नेली बाय- गप्पांच्या नादात कामाचा विसर..
 • गाढवा गुळ हगती तर घोरपी भीक कित्या मागती?
 • गाबत्याक गोरवा आनी भटाक तारवा सांगलीहत कोणी?
 • गायरेतले किडे काय गायरेतच रवनत नाय
 • गावकारची सुन काय पादत नाय?
 • गावता फुकट भाकरी तर कित्याक करु चाकरी
 • गावला तेचा फावला
 • गावात लगीन नी कुत्र्याक बोवाळ
 • घरणी बरोबर वाकडा ता खायत चुलीतली लकडा
 • घरासारखो गुण, सासू तशी सून
 • चल चल फुडे तीन तीन वडे
 • चव नाय रव धनगरा पोटभर जेव
 • चुकला माकला ढॉर धामपुरच्या तळ्यात
 • चुलीतला लाकूड चुलीतच जळाक होया
 • जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाय
 • जेच्या खिशात आणो तो म्हणता मीच शाणो
 • जेच्या मनात पाप तेका पोरा होती आपोआप
 • डाळ भात लोणचा कोण नाय कोणचा
 • तरण्याक लागली कळ आणि म्हाताऱ्याक इला बळ
 • तुका नको माका नको घाल कुत्र्याक
 • तुमचा तुमका आणि खटपट आमका?
 • दिस गेलो रेटारेटी आणि चांदण्यात कापूस काती
 • दिसला मडा, इला रडा
 • दुकान नाय उघडला, तो इलो उधारेक
 • देणगेसारख्या घोरीप
 • देणा नाय घेणा आणि कंदिल लावन येणा
 • देव गेल्लो हगाक आणि ह्यो गेल्लो अक्कल मागाक
 • दोडकाऱ्याचा कपाळात तिनच गुंडे
 • धाक नाय दारारो, फुकटचो नगारो
 • नदी आधी व्हाणो, कढलल्यो बऱ्यो
 • नाय देवच्या भाषेक बोंडगीचे वाशे
 • नालकार रडता म्हणान त्यालकार रडता
 • नावाजललो गुरव देवळात हगलो
 • पडलो तरी नाक वर
 • पादऱ्याक निमीत पावट्याचा
 • पानयात हगलला काय दडान ऱ्हवाचा नाय
 • पानवेलीच्या धर्मान शेगलाक पाणी
 • पावळेचा पाणी पावळेक जाताला
 • पिकला पान घळतलाच
 • पोरांच्या मळणेक बी नाय भात
 • फूडचा ढोर चाल्ताला तसा पाटला
 • बघता वडो मागता भजी
 • बघून बघून आंगण्याची वाडी
 • बापूस लक्ष देयना आवस जेवक घालीना
 • बारशाक वारशी नसाय आणि अवळात बसलो देसाय
 • बोच्यात नाय दम आनी माका म्हणा यम
 • भेरा म्हणता तेरा आणि माजाच तूनतुना खरा
 • भोपळन बाय पसारली नी पाटचे गुण इसारली
 • मडकेत कडी पाटी जीव ओढी
 • माका नाय माका, घाल कुत्र्याक – मला ना तुला घाल कुत्र्याला
 • मिठाक लावा नी माका खावा
 • मेल्ल्या म्हशीक पाच शेर दूध
 • मोठ्या लोकंची वरात आणि हगाक सुद्धा परात
 • मोव थय खोव
 • येताळाक नाय बायल, भामकायक नाय घोव
 • येरे दिसा नी भररे पोटा
 • येवाजलला साधात तर दळीदार कित्याक बाधात
 • येळार येळ - शीगम्याक खेळ
 • राती राजा आणि सकाळी कपाळार बोजा
 • लिना लिना नी भिकार चिन्हा
 • वरये दितय तुका गावकार म्हण माका
 • वसाड गावात एरंड बळी
 • वसावसा खान आणि मसणात जाणा
 • वैदाची पॉरा गालगुंडा येऊन मेली – स्वतःच्या ज्ञानाचा स्वतःसाठी उपयोग करता न येणे.
 • शेजारणीचा रस्सा आणि पोळयेचा काढून बसा
 • शेजारी पाजारी मड्याक आणि पावणे सोयरे वड्याक
 • सरकारी काम, तीन म्हयने थांब
 • सरड्याची धाव वयपुरती
 • सात पाच रंभा नी पाण्याचा नाय थेंबा
 • सांदाण कित्या वाकडा, पिड्याची लाकडा – नाचता येईना अंगण वाकडे.
 • सुने आधी खावचा, लेकी आधी लेवचा
 • हगणाऱ्याक नाय तरी बघणाऱ्याक होई लाज
 • हयरातय नाय नी माशातय नाय
 • हळकुंडाच्या पदरात शेळकुंड
 • हाडाची काडा आणि बोच्याचा तूनतुना
 • हात पाय र्‍हवले, काय करु बायले
 • हो गे सुने घरासारखी