अहिराणी बोलीभाषा
ह्या लेखाला एकही संदर्भ दिला गेलेला नाही. विश्वसनीय स्रोत जोडून या लेखातील माहितीची पडताळणी करण्यात मदत करा. संदर्भ नसल्याने प्रस्तुत लेखाची उल्लेखनीयता ही सिद्ध होत नाही. संदर्भहीन मजकूराची पडताळणी करता येत नसल्याने व उल्लेखनीयता सिद्ध होत नसल्याने हा लेख काढून टाकला जाऊ शकतो याची नोंद घ्यावी. संदर्भ कसे निवडावेत याची माहिती येथे मिळेल तर संदर्भ कसे जोडायचे याची माहिती आपल्याला येथे मिळेल. |
विक्शनरी, या मुक्त शब्दकोशात पाहा/तपासा/अद्याप नसलेले शब्द/वाक्यांश जोडा अथवा सूची:मराठी बोलीभाषातील शब्द येथे मराठी बोलीभाषांची सामायिक शब्दसूची पहा
अहिराणी ही एक मराठीची बोलीभाषा आहे. ही प्रामुख्याने खानदेश प्रदेशात बोलली जाते. जळगाव,धुळे आणि नंदुरबार हे तीन जिल्हे, औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्याचा काही भाग आणि नाशिक जिल्ह्याच्या कलवण, सटाणा, मालेगाव व देवळा या तालुक्यांत ती बोलली जाते. या भूप्रदेशातील लोक अहिराणी बोलत असले, तरीही वाचन आणि लेखन यांसाठी प्रमाण मराठीचा वापरण्याचा कल आढळतो.
नावाची व्याप्ती[संपादन]
जुन्या खानदेश परीसरात म्हणजे अजिंठ्याचे डोंगर,सातपुड्याचे डोंगर,चांदवडचे डोंगर आणि वाघूर नदी या खोल खाणी-खदाणीत वास्तव्यास असलेले अहिर लोक अहिराणी बोलत[१]. खानदेश परिसरातील अहिरांच्या वास्तव्यामुळे, सत्तेतील त्यांच्या प्राबल्यामुळे, त्या परिसरातील सर्वांच्या बोलीवर अहिराणी बोलीची छाप पडली. यातून खानदेशाचे सामाजिक आणि प्रादेशिक प्रभेद झाले आहेत. प्रदेशानुसार बगलांनी, नंदुरबारी, खाल्यांन्गी, वर्ल्यांगी, तप्तांगी, डोंगरांगी, जामनेरी हे बोलीभाषांतील प्रादेशिक प्रभेदांत, तर जातिवाचक बोली ह्या सामाजिक प्रभेदांत मोडतात. खानदेशातील सर्व जातींची बोली ही अहिराणीची छाप असणारी बोली आहे. या सामाजिक प्रभेदांत महाराऊ, भिलाऊ, लाड सिक्की, लेवापातीदार, गुजरी, इत्यादी सामाजिक प्रभेदाच्या बोली आहेत. खानदेशात बोलली जाते ती खानदेशी, असे असल्याने खानदेशी ही संकल्पना अहिराणी ह्या संकल्पनेहून विशाल आहे.
जवळपास ९५% टक्के खानदेशी माणसे अहिराणी बोलतात. ती त्यांची बोलीभाषा आहे. जळगाव, धुळे, नंदुरबार, औरंगाबाद तथा नाशिक जिल्ह्याच्या काही भागात अहिराणी भाषा बोलतात. उत्तर महाराष्ट्राच्या अमळनेर, साक्री, पारोळा, दोंडाईचा, शिरपूर, तळोदा, शहादा, धडगाव, नवापूर, नंदुरबार, धुळे, जळगाव, अक्कलकुवा, सिंदखेडा, चोपडा, एरंडोल, चाळीसगाव, भडगाव, पाचोरा, कळवण, सटाणा, मालेगाव, देवळा, बागलाण ह्या तालुक्यातील बहुतेक सर्व जाती जमातीची ती मायबोली भाषा आहे.गुजरातच्या,सुरत,सोनगढ,व्यारा, उच्छल,निझर व मध्यप्रदेशच्या खेतिया, पानसेमल,संधवा आणि काही तालुक्यातही अहिराणी भाषा बोलतात.
शब्दकोश आणि व्याकरणाची पुस्तके[संपादन]
- नि. रा. पाटील यांनी खानदेशी भाषेवर आधारित ‘लेवा गण बोली’ भाषेचा शब्दकोश तयार केला आहे.
- अहिराणी शब्दकोश (अहिराणी- मराठी) (डॉ. रमेश सूर्यवंशी) : अहिराणी बोलीचा पहिला शब्दकोश.
- Ahirani Boli Sulabh Vyakaran (Dr.Ramesh Suryawanshi)
- Khandeshatil Krishak Jivan Sachitra Kosh (Dr.Ramesh Suryawanshi)
अन्य पुस्तके[संपादन]
- अहिराणी : आंतरराष्ट्रीय भाषा (डाॅ. बापूराव देसाई)
हेही पाहा[संपादन]
संदर्भ व नोंदी[संपादन]
- ^ सूर्यवंशी,रमेश. अहिराणी बोली - भाषा वैज्ञानिक अभ्यास.
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |