नाडसूर लेणी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

नाडसूर लेणी किंवा ठाणाळ लेणी ही कोकणातील रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यात आहे.

शोध[संपादन]

तेवीस लेण्याचा हा समूह सर्वप्रथम मराठी मिशन मुंबई यांनी इ.स.१८९० मधील जानेवारी महिन्यात जाऊन पाहिला आणि सुप्रसिद्ध पुरातत्व तज्ञ हेन्री कझिन्स या संशोधकाने नजरेसमोर आणला. इ.स १८९० मध्ये कझिन्सने ठाणाळे लेण्यांना भेट दिली आणि इ.स.१८११ मध्ये त्याने "Caves at Nadasur and Kharasamla" ही पुस्तिका प्रकाशित केली.खडसामला लेणी समूह ठाणाळयाच्या दक्षिणेस अवघ्या ९ किमी अंतरावर असून तो नेणावली या नावाने ओळखला जातो ठाणाळ या शब्दामधील ठाण म्हणजे स्थान आणि स्थानाचा अर्थ ’पूजास्थान ’ असा केला जातो. यातील ’ठ’ हे अक्षर स्थानवाचक आहे.

रचना[संपादन]

ठाणाळे येथील लेणी समूहातील सर्व लेणी पश्चिमभिमुख आहेत. या बौद्ध लेण्यांमध्ये एक चैत्यगृह, एक स्मारक स्तूप व एकवीस निवासी गुंफा आहेत. इ.स.वी.सन पूर्व दुस-या शतकात ठाणाळे लेण्याची निर्मिती केली या लेणीच्या दर्शनासाठी दक्षिणेकडून जावे लागते. [१]

कसे जाल ?[संपादन]

पाली गावापासून ठाणाळे गाव नाडसूर मार्गे सुमारे २५ किमी अंतरावर आहे. ठाणाळे गावाच्या पूर्वेला घनदाट अरण्यात हि लेणी कोरलेली आहेत. पाली गावातून स्थानिक एस.टी. किंवा रिक्षाचा आसरा घ्यावा लागतो. ठाणले गावातून मात्र पुढे पायवाटेने सुमारे दीड तासांची पायपीट करून लेण्यांपर्यंत पोहोचता येते. रानात चकव्या वाट पुष्कळ आहेत.म्हणून गावातून वाटाड्या सोबत घेणे उत्तम.

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. मराठीवर्ल्ड