घोरावाडी लेणी
Appearance
शेलारवाडी लेणी किंवा घोरावाडी लेणी ही महाराष्ट्रात पुणे शहराजवळच्या शेलारवाडी आणि घोरावाडी गावांजवळची लेणी आहेत.
ही लेणी समुद्रसपाटीपासून ४५० ते ५०० मी उंच असलेल्या या डोंगरात आहेत. वर जायला खड्या चढणीच्या पायऱ्या आहेत.
ही ९-१० बौद्ध लेणी इ.स.पूर्व पहिल्या ते इ.स.नंतरच्या पहिल्या शतकात खोदली गेली होती. या लेण्यांमध्ये एक शिवमंदिरही आहे. याला घोरावडेश्वर असे नाव आहे. येथे एक चैत्यगृह आणि विहार आहेत. यांची रचना साधी असून थोडेसे नक्षीकाम आहे. एका विहारात विठ्ठल-रखुमाईच्या मूर्ती आहेत.