तिबेट

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
<div" cellpadding="0"> Cultural/historical Tibet (highlighted) depicted with various competing territorial claims.
Light green.PNG Solid yellow.svg  चीनमधील तिबेट स्वायत्त प्रदेश
Red.svg Solid orange.svg Solid yellow.svg  अनेक स्वातंत्र्यवादी चळवळींनुसार बृहद तिबेटची व्याख्या
Solid lightblue.png Solid orange.svg Light green.PNG Solid yellow.svg  चीनच्या मते तिबेटची व्याख्या
Light green.PNG  अक्साई चीन
Solid lightblue.png  भारताच्या अखत्यारीखालील प्रदेश ज्यांवर चीनने हक्क सांगितला आहे
Solid blue.svg  इतर ऐतिहासिक तिबेटी भाग

तिबेट (तिबेटी: བོད་; चिनी: 西藏) हे आशिया खंडातील हिमालय पर्वताच्या उत्तरेकडील एक पठार आहे. समुद्रसपाटीपासून सरासरी १६,००० फूट उंच असलेले तिबेट हे जगातील सर्वात उंच पठार आहे. त्यामुळे त्याला जगाचे छप्पर असे सुद्धा म्हणतात. सातव्या शतकापासून इतिहास असलेले तिबेट आजवर एक साम्राज्य, स्वायत्त देशचीन देशाचा प्रांत इत्यादी अनेक स्वरूपांमध्ये अस्तित्वात राहिलेले आहे. सध्या तिबेट ह्या नावाने ओळखला जाणारा बराचसा प्रदेश चीनच्या अंमलाखाली (तिबेट स्वायत्त प्रदेश) आहे.

बहुसंख्य बौद्ध धर्मीय असलेले तिबेटी लोक दलाई लामा ह्यांना धर्मगुरू, पुढारी व तिबेटचे खरे शासक मानतात. परंतू १९५९ सालापासून १४ वे दलाई लामा तेंझिन ग्यात्सो हे धर्मशाळा, हिमाचल प्रदेश येथे भारत सरकारच्या आश्रयास आहेत व ते तेथूनच आपले सरकार चालवतात.

बाह्य दुवे[संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत