विश्वशांती स्तूप

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
विश्वशांती स्तूप

विश्वशांती स्तूप हे महाराष्ट्राच्या वर्धा जिल्ह्यातील, गिताई मंदिराजवळील पांढऱ्या रंगाचे एक मोठे स्तूप आहे. या स्तूपाच्या चार बाजूवर बुद्ध मूर्ती बसवलेल्या आहेत. यामध्ये मोठ्या पार्कसह एक लहान जपानी बौद्ध विहारही आहे. स्तूपाजवळ एक मंदिर आहे जेथे सार्वत्रिक शांततेसाठी प्रार्थना केली जाते. हे स्तूप इ.स. १९९३ मध्ये खुले गेले आहे,[१] जगभरात बनवल्या गेलेल्या सुमारे ८० शांती पॅगोड्यांपैकी हे एक आहे.[२] महात्मा गांधींना प्रेरणास्थान मानणाऱ्या फुजिरी गुरुजींचे हे स्वप्न होते. जपानच्या आण्विक बॉम्बची प्रतिक्रिया म्हणून हे राजगीरमधील रत्‍नागिरी टेकडीवर बांधलेले हे पहिले आणि सर्वाधिक प्रसिद्ध विश्वशांती स्तूप आहे.[३]

हेही पहा[संपादन]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ M. V. Kamath, Gandhi's Coolie: Life & Times of Ramkrishna Bajaj, p. 354, Allied Publishers, 1988 ISBN 8170234875.
  2. ^ J.A. Kempf, Silicon Valley Monk: From Metaphysics to Reality on the Buddhist Path, Dharma Gates Publishing, 2014 ISBN 0990895106.
  3. ^ Aruna Deshpande, Buddhist India Rediscovered, Jaico Publishing House, 2013 ISBN 8184952473.

बाह्य दुवे[संपादन]

  • Siby K. Joseph, Bharat Mahodaya (eds), Essays in Conflict Resolution, Institute of Gandhian Studies, 2007.