मराठी लोक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Translation arrow-indic.svg
ह्या लेखाचा/विभागाचा इंग्रजी किंवा अमराठी भाषेतून मराठी भाषेत भाषांतर करावयाचे बाकी आहे. अनुवाद करण्यास आपलाही सहयोग हवा आहे. ऑनलाईन शब्दकोश आणि इतर सहाय्या करिता भाषांतर प्रकल्पास भेट द्या.Disambig-dark.svg
मराठी माणसे (महाराष्ट्रीय)
RaigadFort5.jpgYoung Ambedkar.gif
Mphule.jpgLokmany tilak.jpg
Phalke.jpgTukaram.jpg
Sachin Tendulkar.jpgMadhuriDixit.jpgRajinikanth 2010 - still 113555 crop.jpg
छ. शिवाजी महाराजडॉ. बाबासाहेब आंबेडकर
ज्योतिबा फुलेबाळ गंगाधर टिळक
धुंडिराज गोविंद फाळकेतुकाराम
सचिन तेंडुलकरमाधुरी दीक्षितरजनीकांत
एकूण लोकसंख्या

आठ ते नऊ कोटी

लोकसंख्येचे प्रदेश
प्रमुख लोकसंख्या

लक्षणीय लोकसंख्या

इतर

भाषा
मराठी
धर्म
हिंदू, बौद्ध, इस्लाम, ख्रिश्चन, यहुदी
संबंधित वांशिक लोकसमूह
इंडो-युरोपीय, इंडो-इराणी, इंडो-आर्यन


मराठी लोक (महाराष्ट्रीय) हा गट मूळचा भारतीय उपखंडातील असून, दक्षिण भारतातील दख्खन/डेक्कन प्रांत किंवा सध्याचे महाराष्ट्र राज्य, ह्या ठिकाणी या लोकांचे मूळ निवासस्थान आहे.मराठी ही त्यांची मातृभाषा असून, ती इंडो-आर्यन दक्षिण विभाग समूहातील एक प्रमुख भाषा आहे. मराठी माणसांचा लष्करी इतिहास हा असामान्य आहे. इंग्रजांच्या भारतातील प्रवेशापूर्वी मराठा साम्राज्य हे भारतीय उपखंडात पसरले होते. मराठे हे द्रविडी परंपरेतले असून, बळीवंशातील ते मूळनिवासी आहेत.

शब्दस्रोत[संपादन]

मराठ्यांच्या साम्राज्याचा झेंडा

मराठी माणसे महाराष्ट्रीय या समूह नावानेही ओळखली जातात. महाराष्ट्रीय माणसांना मराठी माणूस म्हणण्याचे कारण म्हणजे त्यांची भाषा मराठी ही आहे. महाराष्ट्र आणि मराठी या शब्दांच्या उत्पत्तीबाबत वेगवेगळी माहिती उपलब्ध आहे. एका माहितीनुसार मराठी लोकांचे पूर्वज असलेल्या दख्खन प्रांतातील लोकांना सम्राट अशोकांच्या काळात "राष्ट्रिक" म्हणून संबोधले जात होते. महाराष्ट्री प्राकृत भाषा ही या लोकांशी संबंधित असून मराठी या शब्दाचा उगम हा महाराष्ट्री या शब्दापासून झाला आहे.
महाराष्ट्री प्राकृत ही भाषा सातवाहन काळातील अधिकृत भाषा होती. मात्र या माहितीमध्ये राष्ट्रिक या शब्दाचे मूळ व राष्ट्रिक शब्द व दख्खनचे लोक यातील संबंध कोठेही दिलेला नाही. संस्कृत शब्द "राष्ट्र" हा सध्या देश या अर्थाने वापरला जातो. मात्र काही शतकांपूर्वी हा शब्द कोणत्याही एका प्रशासकीय घटकासाठी वापरला जात असावा. दुसऱ्या माहितीनुसार मराठी आणि राष्ट्री यांचा संबंध "रट्ट" या शब्दाशी जोडला जातो. रट्ट हा राष्ट्रकूट शब्दाचा अपभ्रंश आहे. राष्ट्रकूट घराणे हे आठव्या ते दहाव्या शतकामध्ये दख्खन प्रांतावर राज्य करत होते. मात्र सम्राट अशोकांच्या काळातील लेख हे राष्ट्रकूटांपेक्षा बरेच पुरातन असल्यामुळे दोन्ही लेखांचा पडताळा घेणे अवघड आहे.
मराठी ही यादव राजवटीमध्ये राजभाषा होती.यादव राजा सिंघण हा त्याच्या दानशूरपणाबद्दल प्रसिद्ध होता. त्याच्या दानशूरपणाबद्दलची माहिती ही मराठी शिलालेखांच्या स्वरूपात कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरात पहायला मिळते. हेमाद्रीसारख्या विद्वान व्यक्तींच्या रचनाही मराठीत उपलब्ध आहेत. हेमाद्री यांची हेमाडपंती मंदिरांची रचना प्रसिद्ध आहे.
मराठीतील शिलालेख हे रायगडमधील आक्षी, पाटण, पंढरपूर वगैरे ठिकाणी आहेत. या शिलालेखांपैकी सर्वांत लोकप्रिय शिलालेख हा कर्नाटकातील श्रवणबेळगोळ येथील गोमटेश्वराच्या (बाहुबली) पायाशी आहे. हा लेख खालीलप्रमाणे आहे.
चामुंडराये करवियले, गंगाराये सुत्ताल करवियाले.... या लेखामधून पुतळ्याचे शिल्पकार व तत्कालीन राजाबद्दल माहिती मिळते.

महाराष्ट्राचा इतिहास[संपादन]

प्राचीन ते मध्ययुगीन इतिहास कालखंड[संपादन]

इ.स.पू. २३० साली महाराष्ट्रात सातवाहन साम्राज्याच्या अधिपत्याखाली होता.which ruled the region for 400 years.[१] The greatest ruler of the Satavahana Dynasty was Gautami putra Satakarni. The Vakataka dynasty ruled Maharashtra from the 3rd century to the 5th century.[२] The Chalukya dynasty ruled Maharashtra from the 6th century to the 8th century and the two prominent rulers were Pulakeshin II, who defeated the north Indian Emperor Harsh and Vikramaditya II, who defeated the Arab invaders in the 8th century. The Rashtra kuta Dynasty ruled Maharashtra from the 8th to the 10th century.[३] The Arab traveler Sulaiman called the ruler of the Rashtrakuta Dynasty (Amoghavarsha) as "one of the 4 great kings of the world".[४] From the early 11th century to the 12th century the Deccan Plateau was dominated by the Western Chalukya Empire and the Chola dynasty.[५] The Seuna dynasty, also known as the Yadav dynasty ruled Maharashtra from the 13th century to the 14th century.[६] The Yadavas were defeated by the Khiljis in 1321.After the Yadav defeat, the area was ruled for the next 300 years by a succession of Muslim rulers including in the chronological order, the Khiljis , the Tughlaqs, the Bahamani Sultanate and its successor states such as Adilshahi and Nizamshahi and the Mughal Empire.[७]

सन १६०० पूर्वीचा मराठ्यांचा इतिहास (शिवाजी महाराजांच्या उदयापूर्वीचा)[संपादन]

उपलब्ध असलेल्या सर्वांत पुरातन माहितीनुसार हल्ली महाराष्ट्र या नावाने ओळखला जाणारा प्रदेश पूर्वी "दंडकारण्य" म्हणून ओळखला जात होता. दंडकारण्य या शब्दाचा अर्थ "कायद्याचे राज्य असलेले अरण्य" असा आहे.

इसवी सन पूर्व ६०० मध्ये महाराष्ट्र हा प्रदेश हे एक महाजनपद होते. मात्र आर्यांच्या प्रवेशापूर्वी या प्रदेशाचे नागरिकीकरण झाले होते की नाही ही माहिती अज्ञात आहे. सम्राट अशोकानंतर हा प्रदेश मौर्य साम्राज्याचा भाग झाला व त्याचे आर्यीकरण संपादन झाले.
इसवी सन पूर्व २३० मध्ये स्थानिक राजघराणे सातवाहन हे महाराष्ट्रात सत्तेवर आले. पुण्याजवळील जुन्नर येथील या घराण्याने पुढे उत्तर कर्नाटक व आंध्र प्रदेशातील विजयानंतर एक मोठे साम्राज्य स्थापन केले.
आजचे बहुतेक मराठी लोक हे या साम्राज्याचे वंशज आहेत, असे मानण्यात येते. हे साम्राज्य गौतमपुत्र सत्कर्णी उर्फ शालिवाहन याच्या काळात उत्कर्षाला पोचले. शालिवाहन राजाने नवीन दिनदर्शिका व कालगणना सुरू केली. शालिवाहन शक नावाची ही कालगणना मराठी माणसांकडून आजही मोठ्या प्रमाणावर वापरली जाते. या साम्राज्याचा अस्त इसवी सन ३०० च्या आसपास झाला. मराठीच्या पूर्वीची भाषा असलेल्या महाराष्ट्री भाषेचा वापर सातवाहन काळात सुरू झाला. सातवाहन काळानंतर या प्रदेशावर अनेक लहान लहान राजघराण्यांनी राज्य केले. हा प्रदेश पुढे आठव्या शतकात राष्ट्रकूट घराण्याने जिंकून आपल्या राज्याला जोडला. राष्ट्रकूट घराण्याच्या पाडावानंतर येथे देवगिरीच्या यादवांचे राज्य आले. त्यांनी मराठी ही अधिकृत भाषा बनवली. त्यांचे राज्य १३व्या शतकापर्यंत चालले. पुढे हा प्रदेश मुस्लिम साम्राज्यांतर्गत आला. दख्खनच्या सुलतानीच्या अमलाखाली महाराष्ट्र सुमारे तीन शतके होता.

मराठा साम्राज्य[संपादन]

मराठा साम्राज्याचा विस्तार इ.स.१७६०, ज्या काळात मराठा साम्राज्य आपल्या शिखरावर होते.(पिवळ्या रंगाने दर्शविले आहे)

१७व्या शतकाच्या मध्यात शिवाजी महाराजांनी मराठा साम्राज्याची स्थापना केली. अनेक विजय व असामान्य कामगिरीनंतर शिवाजी महाराजांचे १६८० मध्ये निधन झाले. शिवाजी महाराजांकडून अनेक वेळा पराभव झालेल्या मोगलांनी १६८१ मध्ये महाराष्ट्रावर आक्रमण केले. शिवाजी महाराजांचा मुलगा संभाजी हा एका छोट्या लढाईनंतर महाराष्ट्राचा राजा झाला. तुलनेने अधिक बलवान शत्रूशी लढा देताना संभाजीने मराठ्यांचे उत्कृष्ट नेतृत्व केले. संभाजी एकही किल्ला किंवा प्रदेश हरला नाही. मात्र १६८९ मध्ये फितुरीमुळे औरंगजेबाच्या हाती सापडल्यानंतर संभाजीची क्रूरपणाने हत्या करण्यात आली. आपल्या नेत्याच्या मृत्यूमुळे निर्नायकी व निराश झालेल्या मराठ्यांचे नेतृत्व संभाजीचा धाकटा भाऊ राजाराम याने केले. त्याच्या मृत्यूनंतर साम्राज्याची सूत्रे पत्नी ताराराणीने घेतली. आपल्या अज्ञान मुलांच्या नावाने स्वतः राज्य कारभार पाहिला. पण त्याच वेळी औरंगजेबाच्या कैदेत आसणारा शाहू यांनी मोर्चेबांधणी करून ताराराणीविरुद्ध बंड केले. मराठा सरदारांनी मध्यस्थी करुन ताराराणीस कोल्हापूरची व शाहूस सातारची गादी दिली. पुढे शाहूने पेशवाई निर्माण करून बाळाजी विश्वनाथ यास पहिला पेशवा केले. त्यानंतर राज्य चालविण्याची जबाबदारी पेशव्यांच्या डोक्यावर आली. पहिला बाजीराव आणि बाळाजी बाजीराव यांनी मोठा साम्राज्यविस्तार केला. त्यांच्या काळखंडात संपूर्ण उपखंडावर मराठ्यांची सत्ता होती. पुणे हे सत्तेचे केंद्र झाले होते. मात्र पानिपतच्या तिसऱ्या लढाईनंतर हे साम्राज्य छोट्या छोट्या प्रदेशात विभागले गेले. ब्रिटिशांनी दुसऱ्या बाजीरावाचा पराभव करेपर्यंत महादजी शिंदे यांच्या प्रयत्नांमुळे हे प्रदेश एकत्र होते.

ब्रिटिश राजवट[संपादन]

बहुसंख्य मराठी लोक हे हिंदू आहेत.[८] अल्पसंख्यकात बौद्ध, जैन, ख्रिश्चन, मुस्लिम आणि यहूदी यांचा समावेश होतो.[८]

जाती आणि समाज[संपादन]

Marathi people form an ethno-linguistic group that is distinct from others in terms of its language, history, cultural and religious practices, social structure, literature and art.[९]

 • चांभार – जनावरांच्या कातडीपासून वस्तु बनवणे हा यांचा परंपरागत व्यवसाय आहे. हा समाज अनुसूचित जातीत मोडतो.
 • (चंद्रसेनीया कायस्थ प्रभु) – हा उच्च-विद्याविभुषित क्षत्रिय-ब्राह्मण समाज आहे.
 • भोई - अहिराणी भाषा बोलणाऱ्या २२ उप-जातींपैकी एक हा समाज आहे.
 • लोणारी - The lomesh Rushi belonged to this community.
 • धनगर –हा मेंढपाळ करणारा समाज आहे. इंदोरचे राजे मल्हारराव होळकर याच समाजातील होते. आज भारतात भटक्या विमुक्त जातीत यांचा समावेश होतो.
 • गुरव – हा समाज हिंदू मंदिरात पाहिला जातो कारण पुजारी ह्यांचा परंपरागत व्यवसाय आहे.
 • मंगेला कोळी – हा समाज कोळी समाजातील उच्चभ्रु वर्ग (उपजात) आहे.
 • कुणबी — हा शेती करणारा मागासवर्गीय समाज आहे. उच्चवर्णीय मराठा समाज याला स्वत:चीच उपजाती मानतो.
 • मातंग – झाडव त्याच्या पानांपासून दोर, झाडू इत्यादी वस्तु बनवणे ह्या समाजाचा परंपरागत व्यवसाय आहे. गावातील विविध समारंभात दफडी वाजवणे, दवंडी देणे सुद्धा ह्या समाजाचा व्यवसाय आहे. हा समाज अनुसूचित जातीमध्ये मोडतो.
 • मराठा – हिंदू वर्णव्यवस्थेमध्ये हा समाज पहिल्यापासून उच्च वर्गीय क्षत्रिय वर्गात मोडतो. महाराष्ट्रात यांची संख्या १५% आहे.
 • महार – हा समाज महाराष्ट्राच्या लोकसंख्येत १०% आहे.[१०] संपूर्ण महार समाजाने सन १९५६ मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अनुकरण करत बौद्ध धर्म स्विकारलेला आहे. दलितांच्या हक्कांसाठी हा समाज सर्वाधिक संघर्ष करीत असतो.[११][१२] The community is designated as a Scheduled Caste
 • पठारे प्रभू – काही शतकांपासून हा समाज मुंबईत राहतो.
 • वंजारी — काही शतकांपूर्वी पासून राजस्तानमधून महाराष्ट्रात, त्यातही मराठवाड्यात स्थंलातरीत झालेला हा समाज आहे.
 • रामोशी
 • वाणी – हा व्यापार करणारा समाज आहे.
 • आरे, आर्य क्षत्रिय - सैनिक आणि शेतकऱ्यांचा हा समाज आहे. हा समाज मूळ तेलुगू भाषिक प्रांतातील असून तीनशे वर्षापासून महाराष्ट्रात स्थियिक झालेला आहे.

अ-हिंदू समाज[संपादन]

Marathi Diaspora[संपादन]

हेही बघा: Maharashtra Mandal

भारतातील दुसऱ्या राज्यात[संपादन]

भारता बाहेरील मराठी[संपादन]

खानपान[संपादन]

Attire[संपादन]

 Traditional Maharashtrian dresses
Women wearing lugade (nau wari), a traditional nine yard sari for a Rotary Club Party

बाह्य दुवे[संपादन]


५0px
या लेखाचा/विभागाचा सध्याचा मजकूर पुढील परभाषेत आहे : इंग्रजी भाषेतून मराठी भाषेत अनुवाद करण्यास आपला सहयोग हवा आहे. ऑनलाइन शब्दकोश आणि इतर साहाय्यासाठी भाषांतर प्रकल्पास भेट द्या.


संदर्भ[संपादन]


५0px
या लेखाचा/विभागाचा सध्याचा मजकूर पुढील परभाषेत आहे : इंग्रजी भाषेतून मराठी भाषेत अनुवाद करण्यास आपला सहयोग हवा आहे. ऑनलाइन शब्दकोश आणि इतर साहाय्यासाठी भाषांतर प्रकल्पास भेट द्या.Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.
 1. India Today: An Encyclopedia of Life in the Republic: p.440
 2. History of Humanity: From the seventh century B.C. to the seventh century A.D. by Sigfried J. de Laet,Joachim Herrmann p.392
 3. Indian History - page B-57
 4. A Comprehensive History Of Ancient India (3 Vol. Set): p.203
 5. The Penguin History of Early India: From the Origins to AD 1300 by Romila Thapar: p.365-366
 6. People of India: Maharashtra, Part 1 by B. V. Bhanu p.6
 7. .
 8. ८.० ८.१ .
 9. Changing India: Bourgeois Revolution on the Subcontinent by Robert W. Stern, p. 20
 10. {{{शीर्षक}}}. 
 11. {{{शीर्षक}}}. 
 12. {{{शीर्षक}}}.