तुळजा लेणी
तुळजा लेणी हा महाराष्ट्रातल्या जुन्नर तालुक्यातील एक लेणी समूह आहे. शिवनेरी किल्याच्या पश्चिम बाजूला कड़ेलोटाच्या पायथ्याजवळ साधारण ३ किलोमीटर लांबीवर एक टेकडी लागते... त्या टेकडीपासून जवळच ठाकरवाडी म्हणून एक गाव आहे, त्या गावाच्या शेवटी तुळजा लेणी आहेत.
भारतातील एकूण लेण्यांपैंकी सर्वांत जास्त लेणी जुन्नर तालुक्यात आहेत. त्यापैंकीच तुळजा लेणी... तुळजा लेण्यांचे वैशिष्ट्य म्हणजे ही लेणी महाराष्ट्रात कोरण्यात आलेली सर्वात पहिली लेणी असावी... ही लेणी सम्राट अशोकांच्या काळातच कोरली गेली असे इतिहास अभ्यासकांचे मत आहे.
या लेण्यांमध्ये असलेला स्तूप हा अन्य ठिकाणी पाहायला मिळत नाही. या स्तूपाच्या भोवती बारा अष्टकोणी खांब आहेत आणि वरती गोलाकार घुमट... बाजूलाच बौद्ध भिक्षूंसाठी दगदांतून कोरलेले विहार, भोजनालय, सभा मंडप कोरले आहेत. काही ठिकाणी सुंदर असे नक्षीकाम केलेले पहायला मिळते. यात उपासक स्तूपाची पूजा करताना दाखवले आहेत. बुद्ध, धम्म, संघ या तीन रत्नांचे त्रिरत्न चिन्ह सुद्धा जुन्नर येथील प्रत्येक लेण्यामध्ये कोरलेले दिसते. डोंगरावरुरू कोसळणारे धबधब्याचे पाणी थेट लेणीसमोरच पानकोदी(?)मध्ये साठवले जाते. पावसाळ्यात लेण्यांचे सौंदर्य अधिकच खुलून येते. लेण्यांमधून समोर विस्तीर्ण जुन्नर तालुका व शिवनेरी किल्ला दिसतो.
या लेण्यांच्या अभ्यासासाठी अनेक अभ्यासक येत असतात. लेण्यांचे व शिल्प कलेचे अभ्यासक महेंद्र शेगावकर या लेण्यांबद्दल सांगतात की, या लेण्यांच्य निर्मितीचा काळ हा सुरुवातीचा म्हणजे इ.स.पू २३०चा आहे. नंतर तिथे अजिंठ्यासारखे चित्रकलेच्या माध्यमातून जातक कथा व बुद्ध चरित्रातील प्रसंग साकारण्यात आले.
या लेण्यांची प्रसिद्धी हेन्री कुझेनच्या कानावर गेली. मुंबई गव्हर्नर व तो ही लेणी पाहण्यासाठी येणार होते, असा निरोप जुन्नरच्या कलेक्टरला मिळाला. गव्हर्नर येतात म्हणून लेण्यांची साफसफाई करून घेण्यात आली. वाढलेली झुडपे, कोळिष्टके, पाकोळ्याची घाण काढण्यात आली. ही घटना १९१८ मधील आहे. पाणी टाकून गोणपाट - कांबळीच्या मदतीने लेणीच्या भिंती स्वच्छ करण्यात आल्या. त्यामुळे सर्व चित्रे नष्ट झाली. जेव्हा गव्हर्नर व हेन्री कुझेन आले... बघतात तर काय? तो हा प्रकार... जे पाहण्यासाठी आले तेच नष्ट झालेले होते. अतिउत्साहापायी व अज्ञानापायी ऐतिहासिक ठेवा नष्ट झाला होता. झाल्या प्रकारामुळे हेन्री कुझेनत्यांनी कपाळावर हात मारून घेतला. याबाबतचा तेव्हाचा अहवाल आजही पुरातत्त्व खात्याकडे आहे.
.[१]