गडहिंग्लज पूर्वभागातील मराठी बोली
Jump to navigation
Jump to search
गडहिंग्लज पूर्वभागातील मराठी बोली ह्या बोलीभाषेची शब्दसूची
विक्शनरी, या मुक्त शब्दकोशात पाहा/तपासा/अद्याप नसलेले शब्द/वाक्यांश जोडा अथवा सूची:मराठी बोलीभाषातील शब्द येथे मराठी बोलीभाषांची सामायिक शब्दसूची पहा
विक्शनरी, या मुक्त शब्दकोशात पाहा/तपासा/अद्याप नसलेले शब्द/वाक्यांश जोडा अथवा सूची:मराठी बोलीभाषातील शब्द येथे मराठी बोलीभाषांची सामायिक शब्दसूची पहा
गडहिंग्लज तालुक्यातील मराठी बोली ही कन्नडमिश्रित मराठी बोलीभाषा आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात १२ तालुके आहेत. त्यात गडहिंग्लज हा एक तालुका आहे. गडीहिन्ग्लजच्या पूर्वभागातील जवळपास ३५ ते ४० गावे येतात. ही सर्व गावे लिंगायत बहुसंख्यांक लोकांची बोली ही कन्नडमिश्रित मराठी आहे. या बहुसंख्य समाजाचा मुख्य व्यवसाय शेती असल्याकारणाने शेतीशी निगडीत असे बरेचसे शब्द हे कन्नड मधील वापरले जातात. उदारणार्थ-
- काळगी - ऊसाचा पाला
- कावली - पाण्याच पाट
- कारकि - हराटी
- चगची - शेवरी
- नगा - बैलांच्या खाध्यावरील जू
- क्यार - बिबा
- गुंडा - डेचक
- गंज - पेला
- वाटका - वारी