महाकाली लेणी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

कोंडीवटी बौद्ध लेणी ही मुंबई शहरातील प्राचीन बौद्ध स्थापत्य शैलीतील बौद्ध लेणी आहेत. ही लेणी आरे कॉलनी आणि संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात आहेत. डोंगरावरील ही लेणी पूर्वेला पंधरा व पश्चिमेला चार अशी दोन भागात आहेत. पश्चिमेला लेण्यातील चार विहारापैकी एक भोजनकक्ष आहे.

महाकाली लेणीच्या टेकडीच्या पायथ्याशी असलेले सध्याचे हिंदू देवी महाकालीचे मंदिरावरून या लेण्यांना महाकाली हे नाव पडले आहे. येथे बौद्धांच्या लेण्या, भिक्खू निवास आहेत. यात बुद्धाची एकूण १९ लेणी असून विविध स्तूपही आहेत.[१]

अंधेरी स्थानकावरून बस व रिक्षाने आपण या लेण्यापर्यंत पोहचू शकतो.

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ "मुंबई पुणे ऑनलाईन". Archived from the original on 2020-10-25. 2017-05-25 रोजी पाहिले.