Jump to content

घटोत्कच लेणी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

घटोत्कच लेणी ही छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्यासिल्लोड तालुक्यातील जंजळा गावाजवळील बुद्ध लेणी आहे. ही लेणी अजिंठाच्या पश्चिमेस १८ कि.मी अंतरावर आहे. सिल्लोड, गोळेगाव, उंडणगाव मार्गे अंभई या गावातून हा रस्ता जातो. ही चारही बाजून असलेल्या जंगालात ही लेणी आहे. लेणीपर्यंत जाण्यास आता आकर्षक अशा पायऱ्या करण्यात आलेल्या आहेत. राज्य पुरात्व विभागाच्या ताब्यात ही लेणी आहे. लेणीमध्ये तीन बौद्ध लेणी आहेत, एक म्हणजे चैत्य आणि दोन विहार. ६ व्या शतकातील लेणी खोदलेल्या होत्या आणि महायान बौद्धधम्माने प्रभावित होते. लेणीच्या वाकाटाक राजवंशांच्या मंत्र्यावर एक शिलालेख आहे. शिलालेख बुद्ध, धम्म आणि संघ यांच्याविषयी आहे.

जंजाळा गाव व जंजाळा किल्ला यांच्या मधल्या भागात ही बौद्ध लेणी आहेत. या लेण्यातील दर्शनी दालन प्रशस्त असून त्याला २० खांब आहेत. मधल्या दोन व कोपऱ्यातील दोन खांबांचा आकार व त्यावरील नक्षी इतरांपेक्षा वेगळी आहे. दालनाच्या डाव्या बाजूला बुद्धमूर्ती व शिलालेख आहे. त्यात अशमाकच्या राजकन्येचा उल्लेख आहे. वाकाटक नरेशाचा मंत्री वराहदेव याने ही लेणी इ.स.च्या ५ व्या शतकात खोदवली अशीही माहिती दिलेली आहे. गाभाऱ्यात गौतम बुद्धांची आसनस्थ मूर्ती आहे. आसनाखाली हरणे व मधे धम्मचक्र आहे.