विश्व विपस्सना पॅगोडा
विश्व विपस्सना पॅगोडा | |
---|---|
सर्वसाधारण माहिती | |
प्रकार | ध्यानकक्ष, पॅगोडा |
ठिकाण | गोराई, बोरीवली पश्चिम, मुंबई |
बांधकाम सुरुवात | इ.स. २००० |
पूर्ण | इ.स. २००८ |
ऊंची | |
वास्तुशास्त्रीय | ३२५ फूट |
बांधकाम | |
वास्तुविशारद | परवेज दुमसिया, एन. आर. वर्मा, चंदूभाई सोमपुरा |
रचनात्मक अभियंता | नंददीप बिल्डिंग सेंटर (एन.पी.पी.सी.पी.एल.) औरंगाबाद |
संदर्भ | |
http://www.globalpagoda.org/ |
विश्व विपस्सना पॅगोडा (ग्लोबल विपस्सना पॅगोडा) हा मुंबईतील गोराई येथे उभारण्यात आलेला जगातील सर्वात मोठा खांब-रहित पॅगोडा आहे. बुद्धांच्या स्मृतीचिन्हांची जपणूक करण्यासाठी २००० वर्षात प्रथमच हा पॅगोडा बांधण्यात आला आहे तसेच विपस्सना ध्यान धारणेची ओळख व्हावी म्हणून याची निर्मिती केली आहे.[१] दरदिवशी या पॅगोडाला १.५ ते २ हजार पर्यटक भेट असतात, तर डॉ. आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिना दरम्यानच्या काही दिवसात ही पर्यटक संख्या ५ हजाराच्या वर असते. महाराष्ट्रातील सात आश्चर्ये' निवडलेली आहेत. जून २०१३ मध्ये निवडण्यात आलेल्या महाराष्ट्रातील सात आश्चर्यांपैकी विश्व विपस्सना पॅगोडा हे प्रमुख आश्चर्य ठरले आहे.[२]
रचना
[संपादन]एकाच वेळी ८ ते १० हजार लोक बसू शकतील अशी व्यवस्था याठिकाणी आहे. पॅगोडाच्या कळसाची उंची २९ मीटर असून, भूकंपरोधक आहे.
विपस्सना शिबीर
[संपादन]पॅगोडामध्ये असलेल्या गौतम बुद्धांच्या स्मृतिचिन्हातून परावर्तित होणाऱ्या तरंग लहरी विपश्यना करणाऱ्या साधकांना त्यांच्या ध्यानधारणेत सहाय्य करतात आणि मनःशांतीच्या शोधात असणाऱ्या साधकांना आध्यात्मिक आनंद देतात.
जाण्यासाठी प्रवासमार्ग
[संपादन]बोरीवली पश्चिमेकडून बेस्टबसने गोराई खाडीजवळ जाणे. तेथून एस्सेल र्वल्डकडे जाणाऱ्या लाँचने पुढचा प्रवास करणे.
चित्रदालन
[संपादन]-
प्रवेशद्वार
-
प्रवेशद्वारातून पॅगोडाचे दृश्य
-
पॅगोडाच्या समोर बाजूस असलेली बुद्ध मुर्ती
-
पॅगोडाच्या आतून गोलाकार बाजूस मध्यभागी असलेले अशोकचक्र
-
उद्यान
संदर्भ
[संपादन]- ^ विपश्यना पॅगोडा
- ^ "महाराष्ट्रातील सात आश्चर्यांची घोषणा". 2018-01-04 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2018-06-05 रोजी पाहिले.