Jump to content

नाणेघाट

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
नाणेघाट

नाणेघाट
नाव नाणेघाट
उंची २७२४ फूट
प्रकार गिरीदुर्ग
चढाईची श्रेणी मध्यम
ठिकाण ठाणे जिल्हा, महाराष्ट्र
जवळचे गाव वैशाखरे
डोंगररांग हरिश्चंद्राची रांग
सध्याची अवस्था व्यवस्थित
स्थापना {{{स्थापना}}}


नाणेघाट हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक प्राचीन व्यापारी घाट मार्ग आहे. हा मार्ग पुर्वीचे जीर्णनगर(जुन्नर) व कोकणातील भाग यांना जोडतो. हा घाटमार्ग सातवाहन कालीन आहे. व्यापारासाठी सोयीचे व्हावे यासाठीच देश व कोकणाला जोडत हा घाट खोदण्यात आला. इसवी सन पूर्व पहिल्या शतकात हे खोदकाम झाले. या मार्गाचे एक टोक वर जुन्नरच्या दिशेला, तर दुसरे खाली कोकणात मुरबाड तालुक्यात आहे.

इतिहास[संपादन]

मौर्य राजा नंतर सत्तेत आलेल्या सातवाहन राजांनी हा घाट खोदला. या घाटात सातवाहनांनी एक लेणे तयार करत त्यामध्ये त्यांच्या कुलाची गाथाही कोरून ठेवलेली आढळते. येथे असलेल्या लेखात सातवाहन सम्राज्ञी नागणिके विषयी माहिती मिळते. या लेखांमध्ये महाराष्ट्राच्या आद्य राज्यकुल, त्यांचा पराक्रम, दानधर्माबद्दल माहिती आहे. इसवी सन पूर्व पहिल्या शतकात भारताच्या मोठया भूप्रदेशावर राज्य करणारा सातवाहन हे पहिले राजे. हा राजवंश सुमारेचार शतके सलगतेने राज्य करत होता. या काळात त्यांचे तीस पराक्रमी राजे होऊन गेले. या सातवाहनांच्या राजवटीत महाराष्ट्र इतर प्रदेशात सुवर्णकाळ होता असे मानले जाते. प्रतिष्ठान (पैठण), जीर्णनगर (जुन्नर), तगर (तेर), नेवासे, नाशिक अशी भरभराटीला आलेली शहरे या राजवटीत उदयास आली. अशा या सातवाहनांच्या राज्यात प्रवेश करण्यासाठी ‘नाणेघाट’ हा प्रमुख मार्ग होता.

येथील एका लेखात सातवाहनांच्या पराक्रमाशिवाय त्यांनी इथे केलेले यज्ञ, दानधर्माचे उल्लेख आहेत. सातवाहन राजांनी दोनदा अश्वमेध यज्ञ केला असे दिसून येते. याशिवाय वाजपेय यज्ञ, राजसूय यज्ञ असे तब्बल २२ यज्ञ इथे पार पडल्याची माहिती हे लेख देतात. हजारो गाई, शेकडो हत्ती, घोडे, खेडी, धान्य, वस्त्र-अलंकार आणि तत्कालीन सातवाहनांची कार्षांपण या नाण्यांचा मोठा दानधर्म केल्याचाही यात उल्लेख येतो.

  • येथील गुहांमध्ये ब्राम्ही भाषेतील लेख आढळतात. गुहांमध्ये सातवाहनांचे वंशजांचे पुतळे आहेत. त्यांचे सध्या पायांचे भाग आहेत.
  • घाटाच्या तळाशी वैशाखखेडे गाव आहे. असे मानले जाते की ते "वैश्यखेडे"चा अपभ्रंश आहे. हे गाव व्यापारी व त्यांचे नोकरांच्या सुविधांसाठी इमारती होत्या.
  • घाटात जकातीसाठी रांजण आहेत. हा टोल संस्कृती सर्वांत जुना पुरावा आढळतो.
  • सुपारक अर्थात सोपारा आणि कल्याण ही प्राचीन काळी पश्चिम किनाऱ्यावरची दोन अत्यंत महत्त्वाची व्यापारी केंद्रे होती. केवळ देशांतर्गतच नव्हे, तर परदेशातील व्यापाराला सुद्धा येथून मोठी चालना मिळत असे. विशेषतः रोमहून आयात होणारा माल सोपाऱ्याला उतरवला जाऊन तेथून कल्याण, नाणेघाट, जुन्नर, नेवासा मार्गे पैठणकडे नेला जात असे. तसेच निर्यातीच्या वस्तूंची वाहतूक देखील याच मार्गावरून उलट दिशेने होत असे.

चित्रदालन[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]