कांब्रे लेणी
Jump to navigation
Jump to search
कांब्रे लेणी | |
---|---|
स्थान | रायगड |
18°53′10.4604″N 73°29′23.1792″E / 18.886239000°N 73.489772000°E |
कांब्रे लेणी सह्याद्री पर्वतरांगेतील लेणी आहेत. कांब्रे गावाजवळ असलेली ही लेणी. अर्धवर्तुळाकार कातळात खोदलेली आहे.
कसे जाल ?[संपादन]
लेणी जवळ कांब्रे गाव आहे. पुणे-मुंबई जुन्या महामार्गावरील कान्हे- टाकवे जवळून कांब्रे गावी जावे लागते. रेल्वेने कान्हे रेल्वे स्थानकावरून जावे.[१] लेणीत पोहचण्यासाठी दगडी बोगदा आहे. येथे दगडात कोरलेल्या विहारासमोर धान्याचे उखळ आहे. जवळच पाण्याचे टाके आहे. दगडावर सारीपाटाचा खेळ कोरलेला आहे. कांब्रे गावाजवळून ‘कुसूरघाट’ नावाची कोकणातील कर्जत आणि घाटावरील तळेगाव यांना जोडणारी पुरातन व्यापारी वाट होती. या मार्गावर विश्रामासाठी आणि धर्मप्रसारासाठी ही लेणी कोरलेली असू शकतील. ही दुर्लक्षित राहिलेली आहे.[२]