चमार

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

चमार किंवा चांभार हा भारतातील अनुसूचित जातीचा समाज आहे, जो प्रामुख्याने उत्तर प्रदेशात राहतो. महाराष्ट्रात या वर्गाला चांभार म्हणून ओळखले जाते. महाराष्ट्रातील चर्मकार मुलतः हिंदू धर्माचे पालन करतात. चांभारांची भारतातील लोकसंख्या ५ कोटींपेक्षा अधिक असून ही सर्वात मोठी 'अनुसूचित जाती' आहे. महाराष्ट्राच्या लोकसंख्येत १३ लाख लोकसंख्या चांभारांची आहे. भारतातील अनेक राज्यांत हा समाज मोठ्या संख्येने आढळतो. उत्तर प्रदेशच्या लोकसंख्येत १४% आणि पंजाबच्या लोकसंख्येत १२% चांभार आहेत.

चांभारांना बारा बलुतेदारांपैकी एक समजले जाते. बूट निर्मिती हा जातीचा पारंपरिक व्यवसाय आहे. चांभारांचे मुख्य काम म्हणजे जनावरांच्या कातड्यापासून वेगवेगळ्या वस्तू बनवणे. त्यामध्ये मुख्यत्वे चामड्याच्या चपला/ पादत्राणे, पर्स/ बटवे, कातडी पट्टे, कातडी चाबूक इ. बनवणे आणि त्यांची दुरुस्ती करणे येते.

२००१ च्या जनगणनेनुसार, उत्तर प्रदेशातील चमार जातीची लोकसंख्या २ कोटी ९८ लाख इतकी होती.[१] तर महाराष्ट्रात १२ लाख इतकी होती.[२]

उल्लेखनीय व्यक्तिमत्व:-

संत रोहिदास

जगजीवन राम

सुशीलकुमार शिंदे

हे सुद्धा पहा[संपादन]

संदर्भ[संपादन]

  1. ^ "A-10 Individual Scheduled Caste Primary Census Abstract Data and its Appendix - Uttar Pradesh". Registrar General & Census Commissioner, India. 2017-02-06 रोजी पाहिले.
  2. ^ "Census of India - Tables on Individual Scheduled Castes (SC) and Scheduled Tribes (ST)". 2013-02-07. 2018-04-04 रोजी पाहिले.