औरंगाबाद लेणी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

औरंगाबाद लेणी : औरंगाबाद शहरालगत बीबी का मकबरापासून उत्तरेला सुमारे दोन किलोमीटर अंतरावर डोंगरात औरंगाबाद लेणी खोदलेली आहेत. ही बौद्ध लेणी आहेत. त्यांचा पहिला संदर्भ कान्हेरीच्या विशाल चैत्यात सापडतो. इसवी सनाच्या सहाव्या ते सातव्या शतकात ही लेणी खोदण्यात आली. त्यांची समकालीन संख्या १२ इतकी आहे.

तुलनेने मृदू अशा बसाल्ट खडकात ही लेणी खोदलेली आहेत. त्याच्या स्थानावरून ही सर्व १२ लेणी मुख्यत्वे तीन गटांत विभागलेली आहेत. औरंगाबाद परिसरात असलेल्या अजिंठा आणि वेरूळ येथील लेण्यांशी या लेण्यांचा संबंध लावला जातो. अजिंठ्याची लेणी आणि वेरूळची लेणी जागतिक वारसा स्थाने घोषित झाली आहेत.

औरंगाबाद लेणीची निर्मिती इ.स.च्या ६व्या-७व्या शतकातील आहे. येथील लेणे क्रमांक ३ हे अजिंठ्याच्या महायान लेण्यांच्या शैलीतील आहे. लेणे क्रमांक ७ हे मात्र वेरूळच्या रामेश्वर लेण्याशी (लेणे क्रमांक २४) मिळतेजुळते आहे. त्यात पुढे व्हरांडा असून मागील भिंतीत गर्भगृह आहे. गर्भगृहाच्या सभोवती प्रदक्षिणापथ असून त्याच्या भिंतीत भिक्षूंच्या खोल्या आहेत.

हे सुद्धा पहा[संपादन]