Jump to content

विश्वनाथ खैरे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(मराठी भाषेचे मूळ या पानावरून पुनर्निर्देशित)
विश्वनाथ खैरे

विश्वनाथ खैरे (मार्च २९, इ.स. १९३० - हयात) हे एक मराठी लेखक, कवी, समीक्षक आहेत. त्यांनी काव्य, गद्य, नाट्यविषयक, भाषाविषयक, समीक्षणात्मक व विविध माहितीपर साहित्य लिहिले आहे.

जीवन

[संपादन]

खैऱ्यांचा जन्म महाराष्ट्रात पुणे जिल्ह्यातील]] सुपे गावात शेतकरी कुटुंबात मार्च २९, इ.स. १९३० रोजी झाला. पुण्यात भावे स्कूल, फर्ग्युसन महाविद्यालय व शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, पुणे येथे त्यांचे शिक्षण झाले. बी.ई. (स्थापत्य) पदवीपरीक्षेत त्यांनी प्रथम वर्ग, प्रथम क्रमांक पटकावला होता. शिक्षणानंतर ते केंद्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम खात्यात अभियंता म्हणून रुजू झाले. नोकरी करताना त्यांनी आपल्या आवडीच्या विषयांचा पाठपुरावा करत मराठीत साहित्य निर्मिले.

प्रकाशित साहित्य

[संपादन]
नाव साहित्यप्रकार भाषा प्रकाशन प्रकाशन वर्ष (इ.स.)
अडगुलं मडगुलं (पुस्तक) ललितेतर मराठी
अक्षरे बालसाहित्य मराठी
इमराठी गाणी बालसाहित्य मराठी
एकलव्य नाटक मराठी
द्रविड महाराष्ट्र ललितेतर मराठी
भारतीय मिथ्यांचा मागोवा मिथकशास्त्र समीक्षा मराठी
मराठी भाषेचे मूळ ललितेतर मराठी
युरेका नाटक मराठी
वंशाचा व्यास नाटक मराठी
वेदांतली गाणी काव्यसंग्रह मराठी
हिरकणी नाटक मराठी
ज्ञानेश्वराचे चमत्कार धार्मिक मराठी