Jump to content

"महाराष्ट्रातील बौद्ध धर्म" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ ११४: ओळ ११४:
!क्र. || जिल्हा || एकूण लोकसंख्या || बौद्ध लोकसंख्या || बौद्ध प्रमाण (%) || संदर्भ
!क्र. || जिल्हा || एकूण लोकसंख्या || बौद्ध लोकसंख्या || बौद्ध प्रमाण (%) || संदर्भ
|-
|-
| १ || [[अहमदनगर जिल्हा|अहमदनगर]] || || || ०.७५% || <ref>https://www.census2011.co.in/data/religion/district/360-ahmadnagar.html</ref>
| १ || [[अहमदनगर जिल्हा|अहमदनगर]] || ४५,४३,१५९ || ३३,८९८ || ०.७५% || <ref>https://www.census2011.co.in/data/religion/district/360-ahmadnagar.html</ref>
|-
|-
| २||[[अकोला जिल्हा|अकोला]] || || || १८.०८% || <ref>https://www.census2011.co.in/data/religion/district/339-akola.html</ref>
| २||[[अकोला जिल्हा|अकोला]] || १८,१३,९०६ || ३,२८,०३३ || १८.०८% || <ref>https://www.census2011.co.in/data/religion/district/339-akola.html</ref>
|-
|-
| ३||[[अमरावती जिल्हा|अमरावती]] || || || ||
| ३||[[अमरावती जिल्हा|अमरावती]] || २८,८८,४४५ || ३,८३,८९१ || ||
|-
|-
| ४||[[औरंगाबाद जिल्हा|औरंगाबाद]] || || || ||
| ४||[[औरंगाबाद जिल्हा|औरंगाबाद]] || ३७,०१,२८२ || ३,०९,०९३ || ||
|-
|-
| ५|| [[बीड जिल्हा|बीड]] || || || ||
| ५|| [[बीड जिल्हा|बीड]] || २५,८५,०४९ || ६८,४८२ || ||
|-
|-
| ६|| [[भंडारा जिल्हा|भंडारा]] || || || ||
| ६|| [[भंडारा जिल्हा|भंडारा]] || || || ||

१८:१२, १३ मे २०२० ची आवृत्ती

महाराष्ट्रातील बौद्ध
दीक्षाभूमीचा स्तूप, नागपूर
एकूण लोकसंख्या

६५.३१ लाख ते १.१० कोटी (प्रमाणः- ५.८१% ते १०%) (२०११)[]

लोकसंख्येचे प्रदेश
विदर्भ  • मराठवाडा  • खानदेश  • कोकण  • मुंबई उपनगर
भाषा
मराठीवऱ्हाडी
धर्म
नवयान बौद्ध धर्म
धम्मचक्र
संबंधित वांशिक लोकसमूह
मराठी लोक


नवयान बौद्ध धर्म हा महाराष्ट्रातील एक प्रमुख धर्म असून राज्याच्या मराठी संस्कृतीचा महत्त्वपूर्ण भाग आहे. महाराष्ट्र हे भारतीय राज्यांपैकी सर्वाधिक बौद्ध धर्मीयांची लोकसंख्या असलेले राज्य आहे. इसवी सनापूर्वी ५०० वर्षाच्या सुमारास गौतम बुद्धांच्या हयातीत बौद्ध धर्माचा प्रवेश महाराष्ट्रात झाला होता. २०व्या शतकात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या धार्मिक क्रांतीनंतर राज्यात हा धर्म व्यापक प्रमाणात रूढ झाला, व बौद्ध अनुयायांच्या संख्येतही लक्षनीय वाढ झाली.

बौद्ध धर्म हा महाराष्ट्रात बौद्ध धर्माचा प्रचार व प्रसार सातवाहन काळात फार मोठ्या प्रमाणात झाला. नाग लोकांनी धर्मप्रचारास प्राणांची बाजी लावून दिली होती. हजारो बुद्ध लेणी कोरल्या गेल्या. सिद्धांच्या माध्यमातून नाथांपर्यंत आणि नाथांपासून वारकरी संप्रदायापर्यंत बौद्धधम्म झिरपत गेला. बौद्ध धर्म हा महाराष्ट्रात सातव्या शतकापर्यंत मोठ्या प्रमाणावर प्रचलित होता.

२०११ च्या भारतीय जनगणनेच्या अहवालानुसार सबंध भारतात सुमारे ८४,४२,९७२ बौद्ध लोक होते, यापैकी ६५,३१,२०० म्हणजेच ७७.३६% बौद्ध हे महाराष्ट्र राज्यातील होते.[] महाराष्ट्रामध्ये बौद्ध धर्म हा हिंदूइस्लाम नंतर तृतीय क्रमांकाचा सर्वात मोठा धर्म आहे. आणि महाराष्ट्रातील लोकसंख्येत बौद्धांचे प्रमाण सुमारे ६% आहे. भारतातील एकूण नवयानी बौद्धांपैकी (नवबौद्ध) सुमारे ९०% महाराष्ट्रात आहेत.[] डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशभरातील आपल्या लाखो अनुयायांसह १९५६ च्या विजयादशमीच्या दिवशी बुद्धधर्मात प्रवेश केला. हा दीक्षा समारंभ नागपूर येथे झाला. महाराष्ट्रातील विदर्भ, मराठवाडाकोकण येथील दलित समाजाने यात मोठ्या प्रमाणात भाग घेतला. यामुळेच महाराष्ट्रामध्ये बौद्धांच्या संख्येत लक्षणीय वाढ झालेली आढळते. बौद्ध धर्माच्या प्रभावाखाली असलेला राज्यातील महार समाज आणि महाराष्ट्रीय बौद्ध समाज ह्या दोन्ही बौद्ध समाजाची एकत्रित लोकसंख्या ही १ कोटींवर (१०-१२%) आहे.

इतिहास

प्राचीन इतिहास

बुद्धांच्या हयातीत इसवी सनापूर्वी ५०० वर्षाच्या सुमारास बुद्ध धर्माचा प्रवेश महाराष्ट्रात झाला.[]

बौद्ध धर्माचे संस्थापक, बुद्ध यांनी बोधगया येथे संबोधी प्राप्त झाल्यानंतर त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन धम्मउपदेश देणे सुरु केले. त्यांनी अनेक शिष्य लाभले, ज्यात भिक्खू-भिक्खुणी व उपासक - उपासिका यांचा समावेश होता. बुद्धांनी आपल्या शिष्यांना (भिक्खू) कल्याणप्रद अशा आपल्या सद्धम्माचा उपदेश करण्यासाठी चारही दिशांना संचार करा, असा आदेश दिला होता. त्यानुसार हजारो भिक्खू भिक्खूणी धम्माचा उपदेश करण्यासाठी ह्या जंबुवदिपातील निरनिराळ्या ठिकाणी गेले. यामुळे महाराष्ट्रात देखील बुद्ध धम्माचा प्रचार प्रचार झाला. महाराष्ट्रात बुद्ध धम्माचा प्रचार होण्याचे दुसरे एक कारण व्यापारीवर्ग होता. सुरुवातीपासून व्यापारीवर्ग तथागतांच्या धम्माकडे आतर्षित झाला होता. जून्या पाली वाङमयात त्यावेळी अस्तित्वात असलेल्या व्यापारी मार्गांबद्दल बरीच माहिती मिळते. महत्त्वाच्या व्यापारी मार्गांपैकी अवन्ती-दक्षिणापथ हा एक महत्त्वाचा व्यापारी मार्ग होता. हा मार्ग उत्तरेकडे महाराष्ट्रातील पैठणपर्यंत व तेथून पुढे दक्षिणेकडे जात होता. धम्म प्रचारक भिक्खुंमुळे व व्यापारी वर्गामुळ् बुद्ध हयात असतानाच बुद्ध धम्माचा प्रवेश महाराष्ट्रात झाला होता.[]

अजिंठा लेण्यांची निर्मिती इ.स.पू. दुसऱ्या शतकात झाली. कार्ला, भाजा, कान्हेरी, नाशिक, पितळखोर, वेरूळ आणि अजिंठा ही प्राचीन भारतातील व्यापारी दळणवळणाच्या राज्यमार्गावर वसली होती. त्यामार्गाला सार्थवाहपथ असे म्हटले जात असे. चंद्रगुप्त मौर्याने गांधार प्रदेश जिंकून मगध राज्याला जोडल्यावर अशोकाच्या काळात या प्रदेशात बुद्ध धम्माचा व्यापक प्रसार झाला. सम्राट अशोक ह्यांच्या साम्राज्यात महाराष्ट्राचा देखील समावेश होता. अशोकाच्या आठव्या आणि नवव्या धर्माज्ञेचे शिलाखंड ठाणे जिल्ह्यातील सोपारा येथ् सापडले आहेत. सोपारा ही मौर्यांची प्रांतिक राजधानी होती. सुत्तनिपातातील पारायण वग्गावरुन धम्मप्रचारक भिक्खुंमुळे आणि व्यापाऱ्यांमुळ् बुद्ध हयात असतानाच बौद्ध धम्माचा प्रवेश महाराष्ट्रात झाला होता. इ.स.पू. चौथ्या शतकात वैशाली येथे दुसरी बौद्ध धम्म संगिनी भरली होती. अपरांत देशांतून आठ अर्हंत आणि अवंती व दक्षिणापथ या देशातून अठ्ठाऐंशी अर्हंत यशाचे निमंत्रण स्वीकारुन वैशालीस गेले होते. बुद्ध धम्माची मते मूळ शुद्ध स्वरुपात रहावीत व धम्माचा प्रचार होण्यासाठी उपाय योजना करावी असे दोन मुख्य उद्देश ही संगीनी भरवण्यामागे होते.

त्रिपिटकात निष्णात असलेले भिक्खू थेर मोग्गलीपुत्ततिस्साने एक हजार विद्वान भिक्खुंना निवडून शुद्ध स्वरुपात धम्म लिहून काढण्यास सांगितले. हे काम नऊ महिने चालले होते. तिसऱ्या धम्म संगितीची परिणीती म्हणून धम्म प्रचारासाठी निरनिराळ्या देशांत पाठविण्यात आलेले धर्मोपदेशक होत. त्यात "महारठ्ठ महाधम्म रक्खित थेर नाम कमू" म्हणजे महाधम्म रक्खिताला महारठ्ठ नावाच्या देशात कार्तिक महिन्यात पाठविले. इ.स.पू. तिसऱ्या व चौथ्या शतकात महाराष्ट्रात बऱ्याच मोठ्या प्रमाणावर बुद्ध धम्माचा प्रचार झाला होता. मौर्याचा आणि सात वाहनाचा काळ महाराष्ट्राच्या इतिहासातील सुवर्णकाळ होता. त्या वेळच्या वाढलेल्या अधिक संपत्तीचा अविष्कार म्हणजे महाराष्ट्रात निर्माण झालेले कला कौशल्याने युक्त असे अनेक बुद्ध विहार योगाचाराचा तत्त्ववेत्ता असंग काही दिवस अजिंठा येथे राहत होता. अजिंठा येथील चित्रकला जवळजवळ एक हजार वर्ष अव्याहत चालली होती. तेथून मध्य प्रदेशातील बाघा, दक्षिणेतील बदमी, सिग्रिया, सित्तनवसाल मध्ये आशियैतील बामीयान, तिबेट आणि चीन देशांतील तुनऱ्हुआंग येथे तिचा प्रचार झाला. अजिंठा येथे शिल्पकला व चित्रकला शिकवण्याचे विद्यालय होते.

महाराष्ट्रात बौद्ध धर्माचा प्रचार व प्रसार सातवाहन काळात फार मोठ्या प्रमाणात झाला असून यात नाग लोकांचे मोठे योगदान होते. पुरातन वास्तू व प्राचीन लिखाण यांचा शोध घेतला असता बौद्ध धर्म हा महाराष्ट्रात सातव्या शतकापर्यंत मोठ्या प्रमाणावर प्रचलित होता. पर्सी ब्राऊन या विद्वानाच्या मते भारतातील बौद्ध शिल्पांपैकी अर्ध्याहून अधिक शिल्पे (लेणी) महाराष्ट्रात सापडतात, ही गोष्ट बौद्ध धर्माला महाराष्ट्रात त्या काळी असलेली लोकप्रियता दर्शविते. अशा तऱ्हेची डोंगरात खोदून काढलेली वास्तु-शिल्पे त्याकाळी महाराष्ट्र बौद्ध धर्माचे अधिपत्य दर्शविते. सिद्धांच्या माध्यमातून नाथांपर्यंत आणि नाथांपासून वारकरी संप्रदायापर्यंत बौद्धधम्म झिरपत गेला. बौद्ध धर्म हा महाराष्ट्रात सातव्या शतकापर्यंत मोठ्या प्रमाणावर अनुसरला जात होता.

आंबेडकरांची धम्मक्रांती

बौद्ध सण व उत्सव

महाराष्ट्रातील बौद्ध लोक बुद्ध पौर्णिमा, भीमजयंती, धम्मचक्र प्रवर्तन दिन, गुरुपौर्णिमा, वर्षावास, नामांतर दिन असे अनेक विशेष दिवस उत्सव म्हणून साजरे करतात.

बुद्धपौर्णिमा

मुख्य लेख: बुद्ध जयंती

वैशाख पौर्णिमेला बुद्धांचा जन्म झाला, ह्याच पौर्णिमेला त्यांना ज्ञान प्राप्ती झाली आणि ह्याच पौर्णिमेला त्यांचे महापरिनिर्वाण देखील झाले त्यामुळे बौद्ध संस्कृतीत बुद्धपौर्णिमेला महत्वाचे स्थान आहे.

धम्मचक्र प्रवर्तन दिन

१४ ऑक्टोबर १९५६ अशोक विजयादशमी रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या ६,००,००० अनुयायांसोबत नागपूर येथे बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. दरवर्षी अशोक विजयादशमी रोजी लाखो बौद्ध अनुयायी दीक्षाभूमी येथे हा सण साजरा करतात.

भीमजयंती

मुख्य लेख: आंबेडकर जयंती

१४ एप्रिल १८९१ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म झाला, त्यांनी १४ ऑक्टोबर १९५६ रोजी लाखो अनुयायांना बौद्ध धम्माची दीक्षा देऊन भारतातून नाहीसा झालेल्या बौद्ध धम्माला पुनर्जीवित केले आणि बौद्धांचे ते आदरणीय ठरले. त्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती बौद्ध उत्सवाप्रमाणे साजरी केली जाते.

गुरुपौर्णिमा

मुख्य लेख: गुरु पौर्णिमा

आषाढ पौर्णिमेला सिद्धार्थ गौतमाने (बुद्धाने) गृहत्याग केला होता, शिवाय ह्याच पौर्णिमेला वाराणसी येथील सारनाथ जवळील मृगदाय वनामध्ये पाच परिव्राजकांना बुद्धाने धम्मदीक्षा दिली. संबोधी प्राप्तीनंतरचे हे बुद्धाचे पहिले धम्मचक्र प्रवर्तन होय.

वर्षावास

वर्षावास ह्या शब्दाचा विग्रह केल्यास 'वर्षा+वास' असा होतो व त्याचा अर्थ 'वर्षा ऋतूमध्ये एकाच ठिकाणी वास्तव्य करणे असा होतो. आषाढ पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमा हा काळ पावसाळ्याचा असल्यामुळे बौद्ध भिक्खू एका विहारात राहून तेथील उपासकांना व उपासिकांना धम्मोपदेश करतात म्हणून या वास्तव्यास 'वर्षावास' असे म्हटले जाते.

नामांतर दिन

नामांतर आंदोलन इ.स. १९७६ ते १९९४ या दरम्यान महाराष्ट्रात घडलेले दलित-बौद्ध चळवळीचे एक आंदोलन होते. औरंगाबाद येथील 'मराठवाडा विद्यापीठा'ला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव द्यावे ही 'सरकारी मागणी' या आंदोलनाची होती. शेवटी सोळा वर्षाच्या लढाईनंतर औरंगाबादेतील मराठवाडा विद्यापीठाला १४ जानेवारी १९९४ रोजी "डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ" असे नाव देण्यात आले. त्यामुळे दरवर्षी १४ जानेवारी रोजी बौद्ध अनुयायांद्वारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ परिसरात नामांतर दिन साजरा केला जातो.

महापरिनिर्वाण दिन

महापरिनिर्वाण दिन हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा स्मृतिदिन (पुण्यतिथी) असून तो ६ डिसेंबर रोजी आयोजित केला जातो. आंबेडकरांचे ६ डिसेंबर १९५६ रोजी दिल्ली येथे (सध्या डॉ. आंबेडकर राष्ट्रीय स्मारक) महापरिनिर्वाण अर्थात निधन झाले होते, याच्या दुसऱ्या दिवशी ७ डिसेंबर रोजी मुंबईतील चैत्यभूमी येथे त्यांच्यावर बौद्ध पद्धतीने अंत्यसंस्कार करण्यात आले. निधनाच्या काही दिवसांपूर्वी १४ ऑक्टोबर १९५६ रोजी त्यांनी लक्षावधी अनुयायांसह बौद्ध धर्म स्वीकारला होता, त्यांना बौद्ध लोक 'बोधिसत्व' मानतात. आंबेडकर हे बौद्ध गुरु होते, यामुळे त्यांच्या पुण्यतिथीसाठी 'महापरिनिर्वाण' हा बौद्ध संकल्पनेतील शब्द वापरण्यात आला आहे. महापरिनिर्वाण दिनानिमित्त दरवर्षी १ डिसेंबर पासून मुंबईतील त्यांचे समाधीस्थळ असलेल्या चैत्यभूमी येथे भारतभरातून लक्षावधी लोक येतात. चैत्यभूमी येथे २५ लाखाहून अधिक भीमानुयायी जमा होतात, व चैत्यभूमी स्तूपात ठेवलेल्या आंबेडकरांच्या अस्थीकलश व प्रतिमेस अभिवादन करतात व बाबासाहेबांचे दर्शन घेतात. मुंबईत यावेळी बौद्धांची संख्या ३० लाखावर झालेली असते. या दिवशी भारत तसेच जगभरातील आंबेडकरवादी व्यक्ती आंबेडकरांची प्रतिमा व मुर्ती समोर ठेवून त्याच्या स्मृतीस अभिवादन करतात.

लोकसंख्या

इ.स. १९५१ मध्ये महाराष्ट्रात अवघे २,४८९ बौद्ध (०.०१%) होते, डॉ. आंबेडकरांच्या सामूदायिक धर्मांतरानंतर इ.स. १९६१ मध्ये ही संख्या १,१५,९९१% वाढून २७,८९,५०१ झाली होती.

जनगणना १९५१ ते २०११ दरम्यानची महाराष्ट्रीय बौद्धांची लोकसंख्या[]
वर्ष बौद्ध लोकसंख्या (लाखात) राज्यातील प्रमाण (%) वाढ (वृद्धी) (%)
१९५१ ०.०२५ ०.०१
१९६१ २७.९० ७.०५ ११५९९०.८
१९७१ ३२.६४ ६.४८ १६.९९
१९८१ ३९.४६ ६.२९ २०.८९
१९९१ ५०.४१ ६.३९ २७.७५
२००१ ५८.३९ ६.०३ १५.८३
२०११ ६५.३१ ५.८१ ११.८५
भारतातील बौद्ध लोकसंख्येचे जिल्हानिहाय प्रमाण (%)

२०११ च्या जनगणनेनुसार भारतातील ८४,४२,९७२ बौद्धांपैकी ६५,३१,२०० (७७.३६%) बौद्ध हे महाराष्ट्र राज्यात आहेत. महाराष्ट्रातील बौद्ध धर्मीय समुदाय हा भारतातील सर्वात मोठा नवबौद्ध (नवयानी बौद्ध) समुदाय आहे. बौद्धांचे सर्वात जास्त प्रमाण विदर्भातील बुलडाणा, अकोला, वाशिम, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये आहे. या ११ जिल्ह्यांत एकूण ६५ लाख बौद्धांपैकी सुमारे ३० लाख बौद्ध आहेत. यापैकी आठ जिल्ह्यांमध्ये त्यांची लोकसंख्या १२ ते १५ % आहे. तर अकोलामध्ये बौद्धांचे १८% एवढे उच्च प्रमाण आहे. गोंदिया, गडचिरोली आणि यवतमाळमध्ये अनुसूचित जमातींची संख्या जास्त असून बौद्धांची संख्या ७ ते १०% आहे. आणखी १२ लाख बौद्ध हे मराठवाड्यातील नांदेड, हिंगोली, परभणी, जालना आणि औरंगाबाद या जिल्ह्यात आहेत. यातील आधीच्या तीन जिल्ह्यामध्ये त्यांचा हिस्सा १०% पेक्षा जास्त आहे, तर हिंगोलीमधील एकूण लोकसंख्येत १५% बौद्ध आहेत. ठाणे, मुंबई उपनगर, मुंबई, रायगढ, पुणे, सातारा आणि रत्नागिरी या पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यात आणखी १८ लाख बौद्ध आहेत, यातील मुंबई उपनगर जिल्हा आणि रत्नागिरी वगळता इतर जिल्ह्यांच्या लोकसंख्येत बौद्धांचा हिस्सा ५ टक्क्यांपेक्षा कमी आहे. मुंबई उपनगर आणि रत्नागिरी मधील लोकसंख्येत अनुक्रमे ५% आणि ७% बौद्ध आहेत.

जिल्हानिहाय बौद्ध लोकसंख्या

महाराष्ट्रातील जिल्हानिहाय बौद्ध लोकसंख्या खालील प्रमाणे आहे.

क्र. जिल्हा एकूण लोकसंख्या बौद्ध लोकसंख्या बौद्ध प्रमाण (%) संदर्भ
अहमदनगर ४५,४३,१५९ ३३,८९८ ०.७५% []
अकोला १८,१३,९०६ ३,२८,०३३ १८.०८% []
अमरावती २८,८८,४४५ ३,८३,८९१
औरंगाबाद ३७,०१,२८२ ३,०९,०९३
बीड २५,८५,०४९ ६८,४८२
भंडारा
बुलढाणा
चंद्रपूर
धुळे
१० गडचिरोली
११ गोंदिया
१२ हिंगोली
१३ जळगाव
१४ जालना
१५ कोल्हापूर
१६ लातूर
१७ मुंबई उपनगर
१८ मुंबई शहर
१९ नागपूर
२० नांदेड
२१ नंदुरबार
२२ नाशिक
२३ उस्मानाबाद
२४ परभणी
२५ पुणे
२६ रायगड
२७ रत्‍नागिरी
२८ सांगली
२९ सातारा
३० सिंधुदुर्ग
३१ सोलापूर
३२ ठाणे (पालघरसह)
३३ वर्धा
३४ वाशीम
३५ यवतमाळ
एकूण - - - -

अनुसूचित जातीचे बौद्ध

अनुसूचित जातीमध्ये बौद्ध धर्म अतिशय वेगाने वाढत आहे. इ.स. २००१ मध्ये देशात ४१.५९ लाख बौद्ध हे अनुसूचित जातीचे होते, तर इ.स. २०११ मध्ये हे प्रमाण ३८% वेगाने वाढून ५७.५६ लाख एवढे झाले आहे. देशातील एकूण अनुसूचित जातीच्या बौद्धांपैकी ५२.०४ लाख (९०% पेक्षा अधिक) महाराष्ट्रात आहेत.

महाराष्ट्रात एकूण बौद्ध लोकसंख्येत ५२,०४,२८४ (७९.६८%) अनुसूचित जातीचे बौद्ध आहेत.[] तर महाराष्ट्रातील एकूण १,३२,७५,८९८ अनुसूचित जातीत बौद्धांचे प्रमाण ३९.२०% आहे. महाराष्ट्रातील अनुसूचित जातींचा बौद्ध लोकसंख्येत तब्बल ६०% वाढ झाली आहे.[१०]

धर्मांतरे

१९५६ मधील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नवबौद्ध चळवळीनंतर महाराष्ट्रासह देशातील विविध राज्यात अनेक सामूदायिक धर्मांतरे झालेली आहेत आणि आजही होत आहेत. त्यातील काही धर्मांतरे –

१९५० चे दशक

  • १४ ऑक्टोबर, १९५६ (नागपूर, महाराष्ट्र) :-

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ५,००,००० अनुयायांसोबत बौद्ध धम्म स्वीकारला.

  • १५ ऑक्टोबर, १९५६ (नागपूर, महाराष्ट्र) :-

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी उर्वरित २ ते ३,००,००० अनुयायांसोबत बौद्ध धम्म स्वीकारला.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ३,००,००० अनुयायांसोबत बौद्ध धम्म स्वीकारला.

  • ७ डिसेंबर, १९५६ (मुंबई, महाराष्ट्र) :-

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाणानंतर दहनसंस्काराप्रसंगी उपस्थित १०,००,००० पेक्षा जास्त अनुयायांनी बौद्ध धम्म स्वीकारला.


१९६० चे दशक

१९७० चे दशक

१९८० चे दशक

१९९० चे दशक

२००० चे दशक

२००१ चे दशक

२०११ चे दशक

  • मे, २०१७ रोजी, उत्तर प्रदेशमधील सहारनपुर जिल्हातील १८० कुटुंबांनी (सुमारे ८५० व्यक्तींनी) बौद्ध धर्मात धर्मांतर केले.[११]
  • २५ डिसेंबर, २०१७ रोजी, दीक्षाभूमी नागपूर येथे सुमारे ५,००० ओबीसींनी बौद्ध धम्म स्वीकारला.

बौद्ध आंदोलने

तीर्थस्थळे

बौद्ध विहारे

बौद्ध लेणी

सर्व महाराष्ट्रातील बौद्ध लेणी या बौद्ध तीर्थस्थळे व प्रार्थमास्थळे आहेत. भारतात अनेक बौद्ध लेणी किंवा बुद्ध लेणींची निर्मीती झालेली आहेत त्यातील बहुतांश बुद्ध लेणी या महाराष्ट्र राज्यात निर्मिलेल्या आहेत.

स्मारके

उल्लेखनिय व्यक्ती

मुख्य: :वर्ग:भारतीय बौद्ध

महाराष्ट्रातील काही उल्लेखनिय बौद्ध व्यक्ती (मराठी बौद्ध व्यक्ती) —

हे सुद्धा पहा

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ "डी.एन.ए. इंडिया" (इंग्रजी भाषेत).
  2. ^ मनु मोदगिल. "दी क्वींट" (इंग्रजी भाषेत).
  3. ^ मनु मोदगिल. "इंडिया स्पेंड" (हिंदी भाषेत).
  4. ^ मोरे, एस.एस. (२००२ (तृतीय आवृत्ती)). महाराष्ट्रातील बुद्धधम्माचा इतिहास. औरंगाबाद: कौशल्य प्रकाशन. pp. ३४ व ४३. |year= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  5. ^ मोरे, एस.एस. (२००२, तृतीय आवृत्ती). महाराष्ट्रातील बुद्धधम्माचा इतिहास. औरंगाबाद: कौशल्य प्रकाशन. pp. ३४. |year= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  6. ^ http://blog.cpsindia.org/2016/01/religion-data-of-census-2011-xi_19.html?m=1
  7. ^ https://www.census2011.co.in/data/religion/district/360-ahmadnagar.html
  8. ^ https://www.census2011.co.in/data/religion/district/339-akola.html
  9. ^ "बौद्ध बढ़े, चुनावी चर्चे में चढ़े". https://m.aajtak.in (हिंदी भाषेत). 2018-05-11 रोजी पाहिले. External link in |website= (सहाय्य)
  10. ^ "Buddhism is the fastest growing religion among Scheduled Castes" (इंग्रजी भाषेत).
  11. ^ "Dalits still converting to Buddhism, but at a dwindling rate" (इंग्रजी भाषेत).


बाह्य दुवे