जालना

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
हा लेख जालना शहराविषयी आहे. जालना जिल्ह्याच्या माहितीसाठी येथे टिचकी द्या


  ?जालना
महाराष्ट्र • भारत
—  शहर  —

१९° ४९′ ५९.८८″ N, ७५° ५२′ ५९.८८″ E

गुणक: 19°50′N 75°53′E / 19.83°N 75.88°E / 19.83; 75.88
प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
जिल्हा जालना
लोकसंख्या २,३५,५२९
आ.अर्जुन खोतकर
कोड
पिन कोड

• ४३१२०३
संकेतस्थळ: jalna.nic.in/

गुणक: 19°50′N 75°53′E / 19.83°N 75.88°E / 19.83; 75.88

नाव[संपादन]

मराठवाड्यातील जालना शहर हे जालना जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे.जालना शहराचे पूर्वीचे नाव जनाकीपुरम होते.

इतिहास[संपादन]

मराठीतील महानुभाव पंथाच्या आद्य कवयित्री महदंबा या अंबड तालुक्यातील रामसगावच्या आहेत, असे सांगितले जाते. मात्र, जालना येथे झाले्ल्या ६व्या मराठवाडा लेखिका साहित्य संमेलनात महदंबेच्या जन्मस्थळावरून वाद झाले. मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष कौतिकराव ठाले यांनी महदंबा जालना जिल्ह्यातील नव्हे, तर [[औरंगाबाद[[ जिल्ह्यातील पैठण येथील असल्याचे सांगितले, तर संमेलनानिमित्त काढलेल्या ममानिनीफ या स्मरणिकेतील लेखात प्रा. डॉ. सुधाकर जाधव यांनी महदंबेचा जन्म पुरी (पांढरी, तालुका गेवराई, जिल्हा बीड) गावातील असल्याचा उल्लेख केला.रोहिलागड हे ऐतिहासिक गाव जालना जिल्ह्यात येते. हंबीरराव मोहिते उर्फ चव्हाण घराणे ता.जि.जालना येथील मंहमंदाबाद (पिंपळगाव) येथे राहते. त्यांचे 5 वाडे असुन 3भव्य वास्तु व मोठी गडी आहे व तसेच बुरूजाजवळच निळकंठराव मोहिते-चव्हाण (हंबीरराव) यांची समाधी आहे.

भूगोल[संपादन]

 • सामान्य ज्ञान*

१. जालना येथे मोसंब्यांची मोठी बाजारपेठ आहे.

२.रोहिलागड हे मोठा बाजारपेठेचे गाव आहे.

३.जालना हे बी-बियाणे उद्योगच्या नावाने ओळखले जाते

४.जालना जिल्यात एकून आठ तालुके आहेत.

५.जालना जिल्ह्यातील राजुर हे गाव तिर्थक्षेत्र म्हणून आहे. तिथे गणपती मंदिर आहे.

६.जालना शहरातुन कुंडलिका नदी जाते.

७.जालना जिल्ह्यातुन जाणारी गोदावरी नदी जिल्ह्यातील अनेक गावांची तहान भागविणे.

८.जालना जिल्ह्यातील जांब हे गाव संत रामदास स्वामी यांचे जन्मगाव आहे.

वाहतूक व्यवस्था[संपादन]

जालना रेल्वे स्थानक हे दक्षिण मध्य रेल्वेच्या मनमाड-सिकंदराबाद मार्गावर आहे. जालन्याहून भारताच्या अनेक प्रमुख शहरांसाठी थेट प्रवासी रेल्वे सेवा उपलब्ध आहे. मुंबईहून औरंगाबादपर्यंत धावणारी जनशताब्दी एक्सप्रेस ऑगस्ट २०१५ मध्ये जालन्यापर्यंत वाढवण्यात आली. ह्याव्यतिरिक्त तपोवन एक्सप्रेस, देवगिरी एक्सप्रेस. नंदीग्राम एक्सप्रेस, अजिंठा एक्सप्रेस इत्यादी गाड्या जालन्याहून रोज धावतात.

महाराष्ट्र शासनाने प्रस्तावित केलेला नागपूरऔरंगाबादमुंबई द्रुतगती मार्ग जालन्यामधूनच जाईल असा अंदाज आहे. शासनाने जालना-खामगाव लोहमार्गालाही मंजुरी दिली आहे.औरंगाबाद ते जालना अंतर जवळपास १०० किमी आहे.

देवळे[संपादन]

१. जालना शहरापासून ४६ किमी अंतरावर शंभू महादेवाचे एक जागरूक देवस्थान आहे. तेथून जवळच वटेश्वर महाराज मंदिर आहे; तेथे महाशिवरात्रीनिमित्त जत्रा भरते.
२. येथून २५ किमीवर राजूर गणपती हे देवस्थान आहे

3. जालना पासून १५ कमी अंतरावर वागरूळ देवीचे मंदिर आहे सिदेखेड राजा रोड वर

४.माळाआचा गणपती १०कमी अंतर रा वर सिंधेखेड राजा रोड वर

५.जालन्यापासून ४४ किमी अंतरावर अंबड पासून १७ किमी वर जांबुवंतगड,जामखेड ता. अंबड येथे रामायण काळातले व हनुमानानंतर श्रीरामांचे निस्सीम भक्त श्री जांबुवंत महाराजांचे मंदिर आहे.

६.तसेच त्या शेजारी रोहिलागड ता.अंबड या ऐतिहासिक गावी येथे अनेक प्राचीन मंदिर व शिलालेखे आहेत. ७.जालना जिल्ह्यामध्ये अंबड येथे मत्सोदरी देवीचे मंदिर आहे. प्रती वर्षी नवरात्रीला येथे मोठी यात्रा भरते

८.जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील वनारशी हे ग्रामीण देवस्थान आहे.तिथे अंबड, घनसावंगी, जालना या तालुक्यातील भक्त येतात.

लोकजीवन[संपादन]

येथे सर्व सामान्य लोकजीवन आहे.

संस्कृती[संपादन]

रंगभूमी[संपादन]

चित्रपट[संपादन]

खवय्येगिरी[संपादन]

प्रसारमाध्यमे[संपादन]

शिक्षण[संपादन]

जिल्याच्या ग्रामीण भागात मत्स्योधरी शिक्षण संस्थेमुळे शिक्षनाच्या सोयी उपलब्ध झाल्या आहेत.

जिल्ह्यातील सर्व भागात शिक्षणाची सोय उपलब्ध आहे. जालना जिल्ह्यातील विद्यार्थी सर्व सामान्य बी.ए,बी.एस्सी,बी.कॉम हे करताना आढळतात. जिल्हात पॉलिटेक्निकल करणारे विद्यार्थी आहेत. मेडिकल क्षेत्रात आहे. जिल्ह्यातील मत्स्योदरी शिक्षण संस्था ,अंबड, घनसावंगी,परतुर, जालना तालुक्यात आहे.

विशेष शिक्षण[संपादन]

 • शासकीय तंत्रनिकेतन, जालना
 • जे.ई.एस. कॉलेज, जालना.
 • बारवाले महाविद्यालय, जालना.
 • राष्ट्रमाता इदिरा गांधी महाविद्यालय, जालना
 • राजकुंवर महाविद्यालय जालना
 • मत्स्योधरी अभियांत्रिकी महाविद्यालय, जालना
 • शासकीय तंत्रनिकेतन अंबड
 • जांबुवंत विद्यालय रोहिलागड

संशोधन संस्था[संपादन]

बारवाले संशोधन संस्था जालना औद्योगिक वसाहत येथे आहे तसेच जालना जिल्ह्य अंतर्गत येणाऱ्या बदनापूर तालुकया मध्ये मोसंबी संशोधन केंद्र तसेच कडधान्य संशोधन केंद्र आहे

लष्कर शिक्षण व संशोधन संस्था[संपादन]

१. जालना येथे राज्य राखीव पोलीस दलाचा गट क्रमांक ३
२. महाराष्ट्र पोलीस प्रशिक्षण केद्र आहे

खेळ[संपादन]

कब्बडी,खो-खो,क्रिकेट, खेळ खेळले जातात

पुढारी[संपादन]

 • जालन्याचे रहिवासी अर्जुनराव खोतकर हे २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत विजयी झाले.
 • भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे हे जालन्याचे भूमिपुत्र आहेत.
 • कैलास गोरंट्याल माजी आमदार आहेत.
 • बबन राव लोणीकर हे जालना जिल्ह्याचे पालक मंत्री आहेत.
 • राजेश भैया टोपे हे जालन्याचे माजी पालक मंत्री आहेत.
 • संगीता गोरंट्याल जालन्याच्या नगराध्यक्षा आहेत. त्या सर्वाधिक मताधिक्य घेऊन जिंकून आलेल्या नगराध्यक्षा आहेत.
 • धिरजसिंह शिवाजीराव मोहिते-चव्हाण हंबीरराव मोहिते यांचे वंशज आहेत . ते सामाजिक कार्य करतात.

संदर्भ[संपादन]

हेसुद्धा पहा[संपादन]

जालना जिल्हा

खासगांव