"आंबेडकर जयंती" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ ३३: ओळ ३३:


== १२६वी आंबेडकर जयंती – ज्ञान दिन ==
== १२६वी आंबेडकर जयंती – ज्ञान दिन ==
इ.स. २०१७ मध्ये, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा १४ एप्रिल हा जन्मदिवस यापुढे ‘[[ज्ञान दिवस]]’ म्हणून [[महाराष्ट्र]] राज्यात साजरा करण्याचा महत्वपूर्ण निर्णय [[सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, महाराष्ट्र शासन|महाराष्ट्र शासनाने]] जाहीर केला आहे.<ref>[http://www.india.com/marathi/maharashtra/babasaheb-ambedkar-jayanti-2017-ambedkar-jayanti-to-be-celebrated-as-gyan-diwas/ महाराष्ट्र राज्यात आंबेडकर जयंती ‘ज्ञान दिवस’ म्हणून साजरी करण्याची घोषणा</ref><ref>http://tarunbharat.net/archives/22662 {{मृत दुवा}}</ref>
इ.स. २०१७ मध्ये, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा १४ एप्रिल हा जन्मदिवस यापुढे ‘[[ज्ञान दिवस]]’ म्हणून [[महाराष्ट्र]] राज्यात साजरा करण्याचा महत्वपूर्ण निर्णय [[सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, महाराष्ट्र शासन|महाराष्ट्र शासनाने]] जाहीर केला आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.india.com/marathi/maharashtra/babasaheb-ambedkar-jayanti-2017-ambedkar-jayanti-to-be-celebrated-as-gyan-diwas/|title=Babasaheb Ambedkar Jayanti 2017: Ambedkar Jayanti to be celebrated as ‘Gyan Diwas’ {{!}} डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती आता ‘ज्ञान दिवस’ म्हणून साजरी होणार|last=desale|first=sunil|website=India.com|language=en|access-date=2018-05-08}}</ref><ref>http://tarunbharat.net/archives/22662 {{मृत दुवा}}</ref>


डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२६ व्या जयंतीनिमित्त [[ट्विटर]]कडून खास [[इमोजी]] तयार करून डॉ. आंबेडकरांना अभिवादन करण्यात आले होते.<ref>{{स्रोत बातमी|url=https://www.loksatta.com/desh-videsh-news/twitter-salutes-iconic-dr-ambedkar-with-emoji-hashtags-1451841/|title=बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ट्विटरकडून खास इमोजी|date=2017-04-13|work=Loksatta|access-date=2018-05-08|language=mr-IN}}</ref><ref>{{स्रोत बातमी|url=http://m.lokmat.com/storypage.php?catid=2&newsid=18865198|title=डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ट्विटरचे खास हॅशटॅग|date=2017-04-14|work=Lokmat|access-date=2018-05-08|language=mr}}</ref>
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२६ व्या जयंतीनिमित्त [[ट्विटर]]कडून खास [[इमोजी]] तयार करून डॉ. आंबेडकरांना अभिवादन करण्यात आले होते.<ref>{{स्रोत बातमी|url=https://www.loksatta.com/desh-videsh-news/twitter-salutes-iconic-dr-ambedkar-with-emoji-hashtags-1451841/|title=बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ट्विटरकडून खास इमोजी|date=2017-04-13|work=Loksatta|access-date=2018-05-08|language=mr-IN}}</ref><ref>{{स्रोत बातमी|url=http://m.lokmat.com/storypage.php?catid=2&newsid=18865198|title=डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ट्विटरचे खास हॅशटॅग|date=2017-04-14|work=Lokmat|access-date=2018-05-08|language=mr}}</ref>

१४:२७, ८ मे २०१८ ची आवृत्ती

आंबेडकर जयंती
जाफ्राबादमध्ये १२६वी आंबेडकर जयंती (इ.स. २०१७)
अधिकृत नाव डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती
इतर नावे भीम जयंती
साजरा करणारे भारत व जगातील ६० पेक्षा अधिक देशातील बौद्ध, हिंदू व इतर लोक लोक
प्रकार सामाजिक
उत्सव साजरा १ दिवस
सुरुवात १९४० च्या दशकापासून
दिनांक १४ एप्रिल
वारंवारता वार्षिक


जाफ्राबादमध्ये १२६वी आंबेडकर जयंती
जाफ्राबादमध्ये १२६वी आंबेडकर जयंती

आंबेडकर जयंती किंवा भीम जयंती हा एक प्रमुख भारतीय सण व उत्सव आहे. हा सण आधुनिक भारताचे निर्माते आणि भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्म दिवशी १४ एप्रिल रोजी भारतासह जगभरातल्या ६५ पेक्षा अधिक देशात साजरा केला जातो.[१] या दिवसाला ‘समता दिन’ आणि ‘ज्ञान दिन’ म्हणूनही साजरा केला जातो, कारण जीवनभर समानतेसाठी संघर्ष करणारे प्रतिभाशाली डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना ‘समतेचे प्रतिक’ आणि ‘ज्ञानाचे प्रतिक’ सुद्धा म्हटले जाते. बाबासाहेब जगात त्यांच्या मानवी हक्कांचे आंदोलन, भारतीय संविधान निर्मिती आणि त्यांच्या अतिशय प्रकांड विद्वत्तासंपन्न म्हणून ओळखले जातात आणि म्हणूनच त्यांचा जन्मदिवस ‘आंबेडकर जयंती’ हि त्यांच्या प्रति आदर व सन्मान व्यक्त करण्यासाठी जागतिक स्तरावर साजरा केला जातो. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची पहिली जयंती त्यांचे अनुयायी जनार्धन सदाशिव रणपिसे यांनी १४ एप्रिल १९२८ रोजी पुण्यात साजरी केली होती.[२]

बाबासाहेबांच्या जन्मदिवशी प्रत्येक वर्षी त्यांचे लक्षावधी अनुयायी त्यांचे जन्मस्थळ महू (मध्य प्रदेश), दीक्षास्थळ दीक्षाभूमी, समाधी स्थळ चैत्यभूमी, सार्वजनिक ठिकाणे, शाळा -महाविद्यालये, विद्यापीठे तसेच भारतासह जगभरातील अनेक बौद्ध विहारात त्यांना अभिवादन करण्यासाठी एकत्र येतात. जगातील ६५ पेक्षा अधिक देशांत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती हर्षात साजरी केली जाते.[३]

इ.स. २०१५ मध्ये, गुगलने बाबासाहेबांच्या १२४ व्या जयंती निमीत्त आपल्या 'गूगल डूडल' वर त्यांची प्रतिमा लावून त्यांना अभिवादन केले होते.[४][५][६] हे गूगल डूडल तीन खंडातील देशांत प्रसिद्ध करण्यात आले होते.

१२५वी आंबेडकर जयंती

डॉ. आंबेडकर आंबेडकर

सन २०१६ मध्ये, संपूर्ण जगासह भारत सरकारने सुद्धा मोठ्या प्रमाणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १२५वी जयंती गुरूवार रोजी साजरी केली. संयुक्त राष्ट्राने सुद्धा पहिल्यांदा बाबासाहेबांची १२५ वी जयंती साजरी केली, ज्यात १५६ देशांच्या प्रतिनिधींचा सहभाग होता. संयुक्त राष्ट्रानेे बाबासाहेबांना विश्वाचा प्रणेता म्हणून गौरव केला.[७] संयुक्त राष्ट्राच्या ७० वर्षाच्या इतिहासात तिथे पहिल्यांदा एक भारतीय व्यक्ती डॉ॰ बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी केली, बाबासाहेब यांच्यशिवाय जगात केवळ दोन असे महापुरूष आहेत ज्यांची जयंती संयुक्त राष्ट्राने साजरी केली – मार्टिन ल्यूथर किंग, जुनियर आणि नेल्सन मंडेला.[८] डॉ. आंबेडकर, किंग आणि मंडेला हे तिन्ही महापुरूष मानवी हक्क संघर्षाचे सर्वात महान नेते राहिलेले आहेत.

१२६वी आंबेडकर जयंती – ज्ञान दिन

इ.स. २०१७ मध्ये, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा १४ एप्रिल हा जन्मदिवस यापुढे ‘ज्ञान दिवस’ म्हणून महाराष्ट्र राज्यात साजरा करण्याचा महत्वपूर्ण निर्णय महाराष्ट्र शासनाने जाहीर केला आहे.[९][१०]

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२६ व्या जयंतीनिमित्त ट्विटरकडून खास इमोजी तयार करून डॉ. आंबेडकरांना अभिवादन करण्यात आले होते.[११][१२]

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मदिवस

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा १४ एप्रिल हा जन्म दिवस, त्यांच्या योगदानाचे स्मरण करण्यासाठी एखाद्या उत्सवासारखा देशभर साजरा केला जातो.

हा दिवस पूर्ण भारतात सार्वजनिक उत्सव व सुटी म्हणून घोषित केला आहे. नवी दिल्ली, संसदमध्ये त्यांच्या पुतळ्याला प्रत्येक वर्षी भारताचे राष्ट्रपती, प्रधानमंत्री, मंत्रीगण व इतर राजकिय पक्षांचे नेत्यांकडून अभिवादनाद्वारे आदरांजली दिली जाते. घरातील प्रतिमा समोर ठेवून लोक त्यांना वंदन करुन एखाद्या ईश्वराप्रमाणे त्यांना सन्मान देतात. याच दिवशी त्यांच्या मूर्ती समोर ठेवून लोक संचालन करतात, ढोल वाजवून नृत्य करून आनंद व्यक्त करतात.

आंबेडकर जयंती कशी साजरी केली जाते

पूर्ण भारत भर वाराणसी, दिल्ली सोबत दुसऱ्या मोठ्या शहरांत प्रचंड जोश-उल्लासात आंबेडकर जयंती साजरी केली जाते. कचेरी क्षेत्रात डॉ. आंबेडकर जयंती समारोह समिती द्वारा डॉ. अंबेडकरांचा जन्मदिवस उत्सवासाठी कार्यक्रम वाराणसीत आयोजित केला जातो. आंबेडकरवादी विभिन्न प्रकारचे कार्यक्रम आयोजित करतात जसे चित्रकला, सामान्य ज्ञान प्रश्न-उत्तर स्पर्धा, चर्चा, नृत्य, निबंध लेखन, परिचर्चा, खेळ स्पर्धा आणि नाटक ज्यासाठी जवळच्या शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थांसोबत अनेक लोक भाग घेतात. हा उत्सव साजरा करण्यासाठी, लखनऊमध्ये भारतीय पत्रकार लोक कल्याण संघ द्वारा प्रत्येक वर्षी एक मोठा सेमीनार आयोजीत केला जातो.


आंबेडकर जयंती कुठे साजरी केली जाते

आंबेडकर जयंती संपूर्ण विश्वात विशेषत: संपूर्ण भारतात व्यापक प्रमाणात साजरी केली जाते. भारताच्या प्रत्येक राज्यात, राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात आणि जिल्ह्यातील लाखों गावांत साजरी केली जाते. भारतीय समाज, लोकशाही, राजनीती इत्यादी क्षेत्रात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा खोलवर प्रभाव पडलेला आहे.

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मदिवस वा जयंती साजरी करणारे काही देश

भारत, अमेरीका, ऑस्ट्रिया, बहरीन, ब्राजील, डेनमार्क, बांग्लादेश, मिस्र, जर्मनी, ग्वाटेमाला, हाँग काँग, इंडोनेशिया, इराक, आयरलंड, सउदी अरब, दक्षिण आफ्रिका, जपान, मेडागास्कर, मंगोलिया, नेपाळ, ओमान, फ्रांस, श्रीलंका, सेशेल्स, दक्षिण सूडान, स्पेन, स्विझरलॅड, तंजानिया, संयुक्त राजशाही (ग्रेट ब्रिटेन, लंडन), युक्रेन, कॅनडा, हंगरी, म्यान्मार, कुवैत, आस्ट्रेलिया, मलेशिया, न्यूजीलंड, थायलंड, चीन, पाकिस्तान, दुबई, कैलिफोर्निया, सैन फ्रांसिस्को इत्यादी देश आंबेडकर जयंती साजरी करतात.[१३][१४][१५][१६][१७][१८][१९][२०][२१][२२][२३]

जगातील ६५ पेक्षा अधिक देशांत दर वर्षी विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केली जाते.

हे सुद्धा पहा


बाह्य दुवे

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ http://ccis.nic.in/WriteReadData/CircularPortal/D2/D02est/12_6_2015_JCA-2-19032015.pdf Ambedkar Jayanti from ccis.nic.in on 19th March 2015
  2. ^ एप्रिल २०१८ चे लोकराज्य (महाराष्ट्र शासनाचे मासिक)
  3. ^ http://www.mea.gov.in/ambedkar.htm जहामध्ये आंबेडकर जयंती
  4. ^ "B.R. Ambedkar, a hero of India's independence movement, honoured by Google Doodle". The Telegraph. 9 January 2016 रोजी पाहिले.
  5. ^ "Google doodle marks Dr BR Ambedkar's 124th birthday". The Times of India. 9 January 2016 रोजी पाहिले.
  6. ^ Google Honored Dr. Babasaheb Ambedkar with Google Doodle https://drambedkarbooks.com/2015/04/13/google-honored-dr-babasaheb-ambedkar-with-google-doodle/
  7. ^ United Nations to celebrate Dr. Babasaheb Ambedkar’s Jayanti but at what cost? [१]
  8. ^ "संयुक्त राष्ट्र संघात बाबासाहेबांची जयंती". prahaar.in (इंग्रजी भाषेत). 2018-05-08 रोजी पाहिले.
  9. ^ desale, sunil. "Babasaheb Ambedkar Jayanti 2017: Ambedkar Jayanti to be celebrated as 'Gyan Diwas' | डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती आता 'ज्ञान दिवस' म्हणून साजरी होणार". India.com (इंग्रजी भाषेत). 2018-05-08 रोजी पाहिले.
  10. ^ http://tarunbharat.net/archives/22662 [मृत दुवा]
  11. ^ "बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ट्विटरकडून खास इमोजी". Loksatta. 2017-04-13. 2018-05-08 रोजी पाहिले.
  12. ^ "डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ट्विटरचे खास हॅशटॅग". Lokmat. 2017-04-14. 2018-05-08 रोजी पाहिले.
  13. ^ संपूर्ण विश्वात १२५वी आंबेडकर जयंती [२]
  14. ^ वेगवेगळ्या देशांत आंबेडकर जयंती [३]
  15. ^ https://m.youtube.com/watch?v=NkrcFfmrLJo
  16. ^ साजोकाजा, हंगरीत आंबेडकर जयंती [४]
  17. ^ https://m.youtube.com/watch?v=jw-L_TSnb1I
  18. ^ पॅरिसमध्ये आंबेडकर जयंती [५]
  19. ^ जपानमध्ये आंबेडकर जयंती [६]
  20. ^ कुवेतमध्ये आंबेडकर जयंती [७]
  21. ^ न्यूझीलंडमध्ये आंबेडकर जयंती [८]
  22. ^ ऑस्ट्रेलिया, आंबेडकर जयंती [९]
  23. ^ नेपाळ, आंबेडकर जयंती [१०]