Jump to content

गुरू नानक जयंती

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
अमृतसरच्या हरमंदिर साहिब कॉम्प्लेक्समध्ये अकाल तख्त यांनी प्रकाश टाकला

गुरू नानक गुरपरब किंवा गुरू नानक जयंती हे पहिल्या शीख गुरु, सिंधी गुरू (गुरू नानक) यांचे वाढदिवस साजरा करणारे सण आहे. हा सर्वात पवित्र सण शीख, सिंधी लोकांचा आहे.या दिवसाला प्रकाश उत्सव अशी संबोधिले जाते. कार्तिक पौर्णिमा या दिवशी गुरू नानकदेव यांचा जन्मोत्सव साजरा केला जातो.[]

प्रस्तावना

[संपादन]

गुरू नानक देव हे शीख धर्माचे संस्थापक मानले जातात. त्यांच्या जयंतीनिमित्त भारतभरात सार्वजनिक सुट्टी दिली जाते. या दिवशी गुरुद्वारामध्ये शबद कीर्तन कार्यक्रम आयोजित केले जातात.[] नानकदेव यांच्या विचारांचे स्मरण केले जाते. लंगर म्हणजे प्रसादाचे वाटप होते.

उत्सवी स्वरूप

[संपादन]

गुरू पुरव या दिवशी पहाटे लवकर गुरुद्वारात कार्यक्रम सुरू केले जातात. दिवसाच्या या वेळेला अमृत वेला असे म्हतळे जाते. पहाटे सकाळच्या विशेष प्रार्थना गायल्या जातात. कथा आणि कीर्तन यांचे आयोजन केले जाते. लंगर भोजन व्यवस्था करण्यामागे सर्व समानता असा हेतू आहे. सर्व जाती जमातीचे लोक एकत्र येवुन येथे प्रसाद स्वीकारतात. संध्याकाळी पुन्हा प्रार्थना केल्या जातात. लहान मुले विविध कार्यक्रम सादर करतात. मध्यरात्री जन्मउत्सव साजरा होताना विशेष प्रार्थना केल्या जातात. या सर्व प्रार्थना गुरू ग्रंथ साहिब या पवित्र ग्रंथातील आहेत.[]

भारताच्या माजी राष्ट्रपती मा. प्रतिभाताई पाटील गुरू नानक जयंती कार्यक्रमात सहभागी
  • ब्रह्मनिष्ठ आत्मज्ञानी प.पु. बाळूबाबा महाराज पुण्यतिथी सोहळा, श्री. सत्य अविनाश पारख पद समाज जावली- वारूळ ता. शाहूवाडी जि कोल्हापूर

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "'कलि महि राम नाम सारु'चा उपदेश देणाऱ्या गुरू नानक यांची जयंती". महाराष्ट्र टाइम्स. 2021-12-12 रोजी पाहिले.
  2. ^ "Guru Nanak Jayanti 2021: आज है गुरुपर्व, जानिए कौन थे गुरुनानक देव और कैसे मनाई जाती है गुरुनानक जयंती". Amar Ujala (हिंदी भाषेत). 2021-12-12 रोजी पाहिले.
  3. ^ "Guru Nanak's Birthday, Gurpurabs, Guru Gobind Singh Birthday, Sikh Festival Gurpurab, Festival Of Sikhs, Gurpurabs Of Guru Sahib, India". web.archive.org. 2009-06-01. 2009-06-01 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2021-12-12 रोजी पाहिले.