दत्तजयंती

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(श्रीदत्त जयंती या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search

दत्तजयंती ही हिंदू पंचांगात असलेल्या मार्गशीर्ष पौर्णिमा या तिथीला साजरी केली जाते. दत्तात्रेय किंवा दत्त हे अत्री ऋषी व माता अनसूया (अनुसया नव्हे!) यांचे पुत्र होत. तीन तोंडे, सहा हात, दोन पाय, चतुर्वेददर्शक चार श्वान व जवळ कामधेनू (गोमाता) असलेले श्रीदत्तगुरू हे ब्रह्मा, विष्णु, महेश यांचे एकस्वरूप आहे. श्रीगुरुदेव दत्त हे हिंदू धर्मातील पहिले गुरू समजले जातात. हिंदू धर्माचा प्रसार करण्याच्या उद्देशाने दत्तात्रेयांनी भारतभम्रण केले. ठिकठिकाणी त्यांची स्थाने (गादी) निर्माण करून आपली परंपरा चालू ठेवली.

दत्त जयंतीच्या दत्ताच्या देवळात दिवशी भजन, कीर्तन होते. संध्याकाळच्या वेळी दत्ताचा जन्म झाला असे मानतात; त्यामुळे त्या वेळी जन्माचे कीर्तन असते. देवळावर रोषणाई केली जाते. दत्तजन्माची कथा अशी सांगितली जाते:- दत्तात्रेयांचे पिता अत्री ऋषिीआणि माता अनसूया. अत्री ऋषी हे ब्रह्मदेवांचे मानसपुत्र. ते मोठे तपस्वी होते. तपाने त्यांची कांती तेजस्वी दिसायची. त्यांची पत्नी अनसूया महान पतिव्रता होती. तिच्या पातिव्रत्याच्या अनेक कथा नारदमुनी स्वर्गातील देवक-देवतांना सांगत असत.

दत्त संंप्रदाय[संपादन]

दत्तात्रेयांच्या शिष्यांनी दीनदलितांची सेवा करण्याचे व समाजातील दुःख व अज्ञान दूर करण्याचे कार्य चालू ठेवले. त्यांच्या पश्चात श्रीपाद श्रीवल्लभ, श्रीनृसिंह सरस्वतीवासुदेवानंद सरस्वती हे त्यांचे अवतार मानण्यात येतात. दत्ताची स्थाने प्रयाग येथे, आणि महाराष्ट्रात, औदुंबर, गाणगापूर, माहूर, नृसिंहवाडी, कुरवपूर आदि ठिकाणी आहेत. श्रीदत्तांच्या कार्यावर लिहिलेला गुरुचरित्र हा ग्रंथ प्रसिद्ध ग्रंथ भक्तिभावाने वाचला जातो.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

बाह्यदुवे[संपादन]