गुरू गोविंदसिंह जयंती

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

गुरू गोविंदसिंह जयंती हा शिखांचा वार्षिक उत्सव आहे जो ग्रेगोरियन कॅलेंडरनुसार डिसेंबर किंवा जानेवारी महिन्यामध्ये भारत, कॅनडा सारख्या देशांत (जिथे शीख समुदाय मोठ्या प्रमाणात आहे) साजरा केला जातो. हा एक धार्मिक सण आहे ज्यामध्ये समृद्धीसाठी प्रार्थना केली जाते.

गुरू गोविंदसिंह हे नानकांचे दहावे गुरु होते. त्यांचा जन्म २२ डिसेंबर १६६६ रोजी पटना (बिहार) येथे झाला. त्यांचा वाढदिवस ग्रेगोरीयन कॅलेंडरनुसार कधी डिसेंबर तर कधी जानेवारीमध्ये येतो. गुरूंचा वाढदिवस नानकशाही कॅलेंडरनुसार ठरवला जातो. गुरू गोविंदसिंह हे गुरू तेग बहादूर यांचे पुत्र होते, त्यांनी धार्मिक स्वातंत्र्यासाठी प्राण अर्पण केले. वयाच्या नवव्या वर्षी त्यांनी वडीलांचा वारसा चलवत ते गुरू बनले.