लक्ष्मीपूजन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
दिवाळी लक्ष्मीपूजन

दिवाळी लक्ष्मीपूजन ही भारतीय संस्कृतीतील वैशिष्ट्यपूर्ण पूजा आहे.[१]आश्विन महिन्यातील अमावास्येला संध्याकाळी ही पूजा प्रतिवर्षी केली जाते.[२] दिवाळीमध्ये लक्ष्मी पूजनाला अधिक महत्त्व दिले जाते.

पूजा[संपादन]

केरसुणी

दिवाळीच्या अमावास्येला केरसुणी पूजन केले जाते. घरातून दारिद्र्य, अलक्ष्मी घालवून टाकणारी केरसुणी ही देवी स्वरूप मानली जाते म्हणून या दिवशी तिचे महत्व विशेष आहे.[३] अश्विन अमावास्येच्या रात्री लक्ष्मी सर्वत्र संचार करते आणि आपल्या निवासासाठी योग्य असे स्थान शोधू लागते. जेथे चारित्र्यवान, कर्तव्यदक्ष, संयमी, धर्मनिष्ठ, देवभक्त आणि क्षमाशील पुरुष आणि गुणवती आणि पतिव्रता स्त्रिया असतात, त्या घरी वास्तव्य करणे लक्ष्मीला आवडते, अशी आख्यायिका आहे. समृद्धी आणि ऐश्वर्य यांचे प्रतीक असलेल्या लक्ष्मीची पूजा या रात्री केली जाते.[४] श्री लक्ष्मीपूजनाच्या वेळी अक्षतांनी बनवलेले अष्टदल कमल किंवा स्वस्तिक यांवरच श्री लक्ष्मीची स्थापना केली जाते. त्यानंतर लक्ष्म्यादी देवतांना लवंग, वेलची आणि साखर घालून तयार केलेल्या गायीच्या दुधाच्या खव्याचा नैवेद्य दाखवतात. धने, गूळ, साळीच्या लाह्या, बत्तासे इत्यादी पदार्थ लक्ष्मीला वाहून नंतर ते आप्तेष्टांना वाटतात.[५] याखेरीज चलनी नोटा, नाणी, सोन्याचे अलंकार यांचीही पूजा यावेळी केली जाते. व्यापारी वर्गात यापूजेच्या वेळी फटाके उडवून आनंद साजरा केला जातो.

दिवाळीतील लक्ष्मी पूजन
भेंड-बत्तासे

कथा[संपादन]

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी श्रीविष्णूने लक्ष्मीसह सर्व देवांना बळीच्या कारागृहातून मुक्त केले अशी कथा आहे.[६] पौराणिक साहित्यात लक्ष्मी ही विष्णूची पत्नी मानली गेली आहे.[७]

हे ही पहा[संपादन]

दिवाळी

संदर्भ[संपादन]

  1. ^ hBhalla, Kartar Sing (2005-02). Let's Know Festivals of India (इंग्रजी भाषेत). Star Publications. ISBN 9788176501651. |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  2. ^ Sr.Bimcy; Sr.Sisily; Charlotte. Spotlight Social Studies 3 (इंग्रजी भाषेत). Scholar Publishing House. ISBN 9788171725151.
  3. ^ "लक्ष्मीपूजनाला केरसुणीची पूजा का केली जाते? काय आहे महत्त्व? वाचा..." Loksatta. 2023-11-12. 2023-11-15 रोजी पाहिले.
  4. ^ Deepak (2016-03-09). Mango Tree Tales (इंग्रजी भाषेत). Partridge Publishing. ISBN 9781482869927.
  5. ^ "…असे करा लक्ष्मीपूजन!". १९. १०. २०१७. |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  6. ^ Vāgha, Nirmalā Ha (1991). Amola ṭhevā, Hindū saṇa va sãskāra. Morayā Prakāśana.
  7. ^ Cole, Owen; Kanit, V. P. Hermant (2010-06-25). Hinduism - An Introduction (इंग्रजी भाषेत). John Murray Press. ISBN 9781444131000.

बाह्य दुवे[संपादन]