मार्गशीर्ष पौर्णिमा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मार्गशीर्ष पौर्णिमा ही हिंदू पंचांगातील मार्गशीर्ष महिन्याच्या शुद्ध पक्षातील पंधरावी तिथी आहे.

हिंदू धर्म[संपादन]

या दिवशी दत्त जयंती असते. याच दिवशी अन्नपूर्णा जयंतीही असते.

बौद्ध धर्म[संपादन]

मार्गर्शीष पौर्णिमा हा एक बौद्ध धर्मीयांचा सण आहे. या दिवशीच मार्गर्शीषातल्या पौर्णिमेला गौतम बुद्ध राजगृहाला गेले होते. तेव्हा श्रेणीय बिंबिसार राजाने यष्टिवन दान दिले. तथागत बुद्ध आल्याचे समजल्यावर त्यांच्या स्वागतासाठी व दर्शनासाठी राजा व प्रजा गेली. सर्वांनी भिक्खू संघासह बुद्धांना अभिवादन केले. त्यानंतर राजाने बुद्ध व भिक्खू संघाला दुसऱ्या दिवशी भोजनदान स्वीकारण्याची नम्र विनंती केली. दुसऱ्या दिवशी बुद्ध आपल्या शिष्यांसमवेत भोजनासाठी गेले, तिथे त्यांचा आदरसत्कार केला गेला. भोजनदान संपल्यावर धम्म उपदेश श्रवण करून राजाने बुद्ध आणि त्यांच्या भिक्खू संघाला वेळूवन दान दिले.

हे ही पहा[संपादन]