स्वातंत्र्य दिन (भारत)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(भारतीय स्वातंत्र्यदिवस या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search
भारतीय स्वातंत्र्यदिवस 
India-0037 - Flickr - archer10 (Dennis).jpg
भारतात राष्ट्रीय सुट्टी
प्रकारभारतातील सण व उत्सव,
स्वातंत्र्यदिवस,
सार्वजनिक सुट्टी
स्थानभारत
कालबिंदूऑगस्ट १५, इ.स. १९४७
अधिकार नियंत्रण
विकिडाटा
Blue pencil.svg
दिल्लीतील लाल किल्ल्यावरील ध्वजारोहण

स्वातंत्र्य दिन हा भारताचा विशेष महत्वाचा दिवस आहे. ब्रिटिश साम्राज्यापासून दिनांक १५ ऑगस्ट इ.स. १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले.[१] त्यामुळे भारताचा स्वातंत्र्य दिन दरवर्षी १५ ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. हा भारतातील एक राष्ट्रीय सण आहे. या दिवशी दिल्लीतील लाल किल्ल्यावर भारताचा राष्ट्रध्वज फडकवला जातो. देशभरातही बहुतांश ठिकाणी ध्वजारोहण, मिरवणुका व सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे हा दिवस साजरा केला जातो.

भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यात योगदान असलेल्या सर्व ज्ञात-अज्ञात व्यक्तींचे कृतज्ञतापूर्वक स्मरण या दिवशी केले जाते.

इतिहास[संपादन]

इ.स. १७७० पासून भारतावर इंग्रजांचे राज्य होते. १९व्या शतकापासूनच सर्व राजांना इंग्रजांनी आपल्या सैन्यबळावर ताब्यात ठेवले होते. १८५७ च्या स्वातंत्र्य समरानंतर ब्रिटिशांनी त्यांची व्यवस्था अजूनच शिस्तीची केली. १८८५ साली भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली. २०व्या शतकात महात्मा गांधी ह्यांनी अहिंसेच्या मार्गाने चले जाओ आंदोलन व अशी अनेक आंदोलने केली. गांधींनी सविनय कायदेभंग चळवळीचे नेतृत्व केले. १९२९ साली लाहोर च्या सत्रात काँग्रेसने 'संपूर्ण स्वराज्या'ची घोषणा केली. त्यावेळी त्यांनी २६ जानेवारी ही तारीख भारताचा स्वातंत्र्यदिन म्हणून घोषणा करायची योजना केली. १९३० साली काँग्रेसने निवडणुका जिंकल्या. त्यानंतर संपूर्ण स्वराज्यासाठी सर्व नेत्यांनी असहकार आंदोलन केले. १९४० साली मुस्लिम कार्यकर्ते हे मुख्य प्रवाहापासून वेगळे झाले व त्यांनी ऑल इंडिया मुस्लिम लीगची स्थापना केली.

दुसऱ्या महायुद्धानंतर ब्रिटिशांना लक्षात आले की, आपल्याला भारतावरचे राज्य व युद्ध हे सांभाळता येणार नाही आहे. तसेच दुसऱ्या बाजूला भारतीय क्रांतिकारकांचा जोर वाढत होता. ही गोष्ट कळल्यानंतर ब्रिटनच्या पंतप्रधानांनी जून १९४८ पर्यंत भारत पूर्णपणे स्वतंत्र करण्याची हमी दिली. अखेर दिनांक १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत स्वतंत्र झाला. पण त्यावेळी भारताचे पाकिस्तान आणि भारत असे दोन तुकडेही पडले. पाकिस्तानी भागात राहणाऱ्या अनेक पंजाब्यांना व सिंधीना त्यांचे घरदार, पैसा सोडून यावे लागले. अनेक लोक ह्यामध्ये मारलेही गेले. पुढे ह्या विभाजनामुळे काश्मीरचा प्रश्नही पुढे आला.

स्वतंत्र भारत[संपादन]

स्वतंत्र भारत २६ जानेवारी १९५० रोजी प्रजासत्ताक झाला.[२] भारताची राज्यघटना तयार करण्यात बाबासाहेब अांबेडकर ह्यांचा मोलाचा वाटा होता. प्रजासत्ताक भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू[३] व पहिले राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद होते.[४] रविंद्रनाथ टागोर ह्यांनी लिहिलेले जन गण मन हे भारताचे राष्ट्रगीत[५] तर बंकिमचंद्र चट्टोपाध्याय ह्यांनी लिहिलेले वन्दे मातरम् हे राष्ट्रीय गीत म्हणून ठरवले गेले.[६]

स्वातंत्र्य दिनाचा उत्सव[संपादन]

भारतीय स्वातंत्र्यदिनी आनंद व्यक्त करणारी मुले.

भारतात सर्व ठिकाणी स्वातंत्र्य दिनाची सार्वजनिक सुट्टी दिली जाते. सर्व शाळा, महाविद्यालये-कार्यालयांमध्ये ध्वजारोहण व ध्वजवंदन असते. राजधानी दिल्लीमध्ये राजपथावर सैन्यदले परेड करतात. भारताचे पंतप्रधान हे दरवर्षी भाषण देतात.[७] त्यादिवशी बहुतांश रेडिओ केंद्रावर तसेच दूरदर्शनवर देशभक्तिपर गाणी, कार्यक्रम, चित्रपट लागतात.

संदर्भ[संपादन]

  1. "भारत स्वतंत्र झाला". historympsc.blogspot.com (मराठी मजकूर). ११ ऑगस्ट २०१८ रोजी पाहिले. 
  2. "Happy Republic Day 2018 : प्रजासत्ताक दिनानिमित्त गुगलचं हे विशेष डुडल पाहिलंत का?". लोकसत्ता (मराठी मजकूर). २६ जानेवारी २०१८. ११ ऑगस्ट २०१८ रोजी पाहिले. 
  3. "जाणून घ्या आतापर्यंतच्या १४ पंतप्रधानांचे शिक्षण". लोकसत्ता (मराठी मजकूर). २८ ऑगस्ट २०१७. ११ ऑगस्ट २०१८ रोजी पाहिले. 
  4. "Dr Rajendra Prasad: Remembering the Man, and the President". The Quint (इंग्लिश मजकूर). ११ ऑगस्ट २०१८ रोजी पाहिले. 
  5. "107th year of Jana -Gana-Mana | The Arunachal Times". arunachaltimes.in. ११ ऑगस्ट २०१८ रोजी पाहिले. 
  6. हिंदी, टीम बीबीसी (२७ जून २०१८). "'वंदे मातरम' लिखने वाले बंकिम चंद्र को कितना जानते हैं आप". BBC News हिंदी. ११ ऑगस्ट २०१८ रोजी पाहिले. 
  7. "स्वतंत्रता दिवस: पीएम मोदी के 57 मिनट के भाषण में कश्मीर से लेकर महिलाओं का जिक्र, देखें वीडियो". https://www.livehindustan.com (हिंदी मजकूर). ११ ऑगस्ट २०१८ रोजी पाहिले.