ईस्टर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Rafael - ressureicaocristo01

ईस्टर हा ख्रिश्चन लोकांचा सण आहे. त्यांच्या मान्यतेनुसार या दिवशी येशू ख्रिस्तने पुनर्जन्म घेतला होता. नव्या करारानुसार येशू गुड फ्रायडेच्या दिवशी क्रुसावर मरण पावले व तीन दिवसानी रविवारी पुन्हा जिवंत झाले. या दिवशी ४० दिवसांच्या त्यागाचा लेन्ट हा काळ संपतो.

ईस्टरचा आठवडा पवित्र आठवडा म्हणून ओळखला जातो. यातील शेवटचे तीन दिवस म्हणजते मौंडी थर्सडे, गुड फ्रायडे व होली सॅटर्डे होत. त्यानंतरचा रविवार हा ईस्टर असतो.

ईस्टर दिवशी सुवार्ता वाचन[संपादन]

योहान २०:१-९[१]

  • १ मग रविवारी सकाळी अगदी पहाटे मरीया मग्दलिया थडग्याकडे आली आणि थडग्यावरून धोंड काढलेली आहे असे तिला आढळले.
  • २ म्हणून तिने शिमोन पेत्र व ज्याच्यावर येशूची प्रीति होती तो दुसरा शिष्य यांच्याकडे धावत येऊन म्हटले, “त्यांनी प्रभुला थडग्यातून काढून नेऊन कोठे ठेवले हे आम्हांला माहीत नाही.”
  • ३ मग पेत्र व दुसरा शिष्य हे निघाले व थडग्याकडे गेले.
  • ४ तेव्हा ते दोघे बरोबर पळत गेले. आणि तो दुसरा शिष्य पेत्रापेक्षा लवकर पुढे जाऊन त्याच्या आधी थडग्याजवळ पोहोचला.
  • ५ आणि त्याने वाकून आत डोकावले. तेव्हा त्याने तागाची वस्त्रे पडलेली पाहिली, पण तो आत गेला नाही.
  • ६ मग शिमोन पेत्रही त्याच्यामागून आला व थडग्यात आत गेला.
  • ७ तेव्हा तागाची वस्त्रे पडलेली आणि जो रुमाल त्याच्या डोक्याला होता, तो तागाच्या वस्त्राबरोबर नाही, तर निराळा एकीकडे गुंडाळलेला पडलेला त्याने पाहिला.
  • ८ शेवटी तो दुसरा शिष्य जो थडग्याकडे पहिल्यांदा पोहोचला होता, तोसुद्वा आत गेला, त्याने पाहिले आणि विश्वास ठेवला.
  • ९ येशूने मरणातून पुन्हा उठणे आवश्यक आहे, हे त्यांना अजूनसुद्धा समजले नव्हते.

हे पण पहा[संपादन]

संदर्भ[संपादन]

  1. मराठी बायबल (योहान). (मराठी मजकूर)