रंगपंचमी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
कृष्ण गोपिकांसमवेत रंग खेळताना
रंंगांंची उधळण

फाल्गुन कृष्ण पंचमी या तिथीला रंगपंचमी हा सण साजरा केला जातो. धुलिवंदनापासून सुरू होणाऱ्या वसंतोत्सवाला रंगपंचमीच्या दिवशी पाच दिवस पूर्ण होतात. रंग पंचमी म्हणजे रंगांचा सण. या दिवशी एकमेकांंना रंंग लावून आनंंदोत्सव साजरा केला जातो. सर्वजण रंगांत न्हाऊन निघतात. परस्परांंवर पाणीही उडवले जाते.

अलीकडील काळात रासायनिक रंंगांंचे दुष्परिणाम पाहता नैसर्गिक रंंग वापरून हा दिवस साजरा करण्याचे प्रमाणही वाढलेले दिसून येते. या दिवशी लोक भरपूर रंग खेळून आनंद अनुभवतात. रंगपंचमीचा सण देशभरात मोठा उत्साहात साजरा केला जातो. या निमित्ताने बाजारात रंगांची दुकाने सजतात. पूर्वी होळी म्हटले, की फुलांच्या पाकळ्या, मेंदी, गुलमोहराची पाने, टोमॅटो, हळद, डाळीचे पीठ अशा हर्बल पदार्थांपासून रंग तयार केले जायचे. या रंगांमुळे रंगपंचमीचा आनंद द्विगुणित होई.

पौराणिक पार्श्वभूमी[संपादन]

द्वापरयुगात गोकुळात बाल/कुमार कृष्ण आपल्या गोपाळसवंगड्यांवर पिचकारीने रंगीत पाणी उडवीत असे व उन्हाची तलखी कमी करीत असे. तीच प्रथा आजही रंगपंचमीच्या रूपाने चालू आहे.

चित्रदालन[संपादन]

बाह्यदुवे[संपादन]

संदर्भ[संपादन]

http://marathi.webdunia.com/article/holi/holi-112030500016_1.html

http://m4marathi.com/v2/rangpanchami-holi-information-in-marathi/