गणेश चतुर्थी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
गणेश चतुर्थी पूजा

श्री गणेश चतुर्थी हे भाद्रपद शुक्ल चतुर्थीला केले जाणारे एक धार्मिक व्रत आहे.[१][२]गणेशाच्या अवतारांपैकी गणेश याचा जन्म भाद्रपद शुक्ल चतुर्थीला झाला असे मानले जाते.[३] गणेश चतुर्थी या दिवसाला महासिद्धीविनायकी चतुथी किंवा "शिवा" असेही म्हटले जाते.[३]

गणेश चतुर्थी व्रत[संपादन]

गोव्यातील गणेश चतुर्थी

गाणपत्य संप्रदायाचे हे एक व्रत आहे. श्रावण शुक्ल चतुर्थी ते भाद्रपद शुक्ल चतुर्थी असे महिनाभर करायचे हे व्रत आहे. नदीकिनारी जाऊन, स्नान करून आपल्या हाताच्या अंगठ्याएवढी मातीची गणेशमूर्ती हातावरच तयार करावी. तिचे सोळा उपचारांनी पूजन करून .तिचा 1 मित्र आहे एक चुहा नदीतच विसर्जन करावी असे हे व्रत आहे. याला पार्थिव गणेश व्रत म्हणतात. महिनाभर जमले नाही तर किमान शेवटच्या दिवशी तरी पार्थिव मूर्तीची पूजा करावी अशी यामागे धारणा आहे[३].

प्रतिष्ठापना पूजा[संपादन]

गणेश चतुर्थीला गणेशाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाते.[१] श्री गणेशाच्या प्रतिष्ठापना विधीमध्ये पार्थिव मूर्तीची आवाहन,स्नान,अभिषेक,वस्त्र,चंदन,फुले,पत्री, नैवेद्य इ.सोळा उपचारांनी पूजा केली जाते.[४] यामध्ये त्याला विविध २१ पत्री अर्पण केल्या जातात. पावसाळ्यात या सर्व पत्री सामान्यत: उपलब्ध असतात आणि त्या प्रत्येक वनस्पतीला काही औषधी गुणधर्मही आहेत.[५]मूर्तीचे विसर्जन करण्यापूर्वी तिची उत्तरपूजा करतात. मूर्तीचे विसर्जन करण्यापूर्वी पुढील मंत्र म्हणतात. ’यान्तु देवगणा: सर्वे पूजामादाय पार्थिवीम् ।इष्टकामप्रसिद्ध्यर्थं पुनरागमनाय च’ ।। श्री महागणपतिपूजन केलेल्या नारळावर, तसेच उमामहेश्‍वर आणि श्री सिद्धिविनायक यांच्यावर अक्षता वाहून मूर्ती स्थानापासून थोडी हलवतात. त्यानंतर जलाशयात तिचे विसर्जन करतात.[६] काळाच्या ओघात हे व्रत कुटुंबाच्या पद्धतीनुसार दीड, पाच,सात, दहा दिवस केले जाते.[७][८] काही कुटुंबात २१ दिवस हे व्रत करतात तर काही ठिकाणी हे व्रत वार्षिक स्वरूपाचे असते.

गणेशोत्सव[संपादन]

गणपती ही संघटनेची देवता आहे.ऋग्वेदात ब्रहमणस्पती देवतेची स्तुती केलेली आहे. तो सर्व गणांचा अधिपती आहे असे त्यात म्हटले आहे. या देवतेचा विकास होऊन पुराणकाळात तिला गणपती हे रूप प्राप्त झाले असे मानले जाते.[३] भाद्रपद शुक्ल चतुर्थीपासून अनंत चतुर्दशीपर्यंत महाराष्ट्रात गणेशोत्सव साजरा होत असतो.सार्वजनिक गणेश उत्सवाची सुरुवात लोकमान्य टिळकांनी १८९४ साली केली. [९][२] या काळात गणेशाच्या उपस्थितीत अनेक धार्मिक व सामाजिक सार्वजनिक कार्यक्रम केले जातात.[१०]

हेही पहा[संपादन]

विकिस्रोत
गणेश चतुर्थी हा शब्द/शब्दसमूह
विकिस्रोत, या ऑनलाईन मुक्त मराठी ग्रंथालयात पाहा.

संदर्भ[संपादन]

  1. a b Gupta, Shobhna (2002). Festivals of India (इंग्रजी भाषेत). Har-Anand Publications. ISBN 9788124108697.
  2. a b Shandilya, Rajeshwari (2009-01-01). Bharatiya Parva Evam Tyohar (हिंदी भाषेत). Prabhat Prakashan. ISBN 9788173156175.
  3. a b c d गाडगीळ, अमरेंद्र (२०११ (चौथी आवृत्ती)). श्रीगणेश कोश. पुणे: गोकुळ मासिक प्रकाशन. |year= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  4. ^ "श्री गणेश प्रतिष्ठापना पूजा विधी (मराठीत)".
  5. ^ आयुर्वेद औषधी संशोधिका, ज्ञान प्रबोधिनी. गणेश पत्री. पुणे: कार्यवाह, ज्ञान प्रबोधिनी संशोधन संस्था. pp. १-४.
  6. ^ Siṃha, Māheśvarī (1982). Hamāre sāṃskṛtika parva-tyohāra (हिंदी भाषेत). Pārijāta-prakāśana.
  7. ^ Babar, Sarojini Krishnarao (1985). Śrāvaṇa, Bhādrapada. Mahārāshṭra Rājya Lokasāhitya Samitīcyāvatīne Mahārāshṭra Śānācyā Śikshaṇa Vibhāgā.
  8. ^ Kheḍekara, Vināyaka Vishṇu (1992). Lokasaritā, Gomantakīya janajīvanācā samagra abhyāsa. Kalā Akadamī Governmentā.
  9. ^ Bahri, Hardev (1988). Prācīna Bhāratīya saṃskr̥ti kośa: Vaidika kāla se 12 vīṃ śatābdī taka (हिंदी भाषेत). Vidyā Prakāśana Mandira.
  10. ^ Shirsat, K. R. (1991). Lo. Ṭiḷaka āṇi Bêpṭisṭā. Insṭiṭyūṭa ôpha Pôliṭiks êṇḍa Ikônômiksa.