पाम संडे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
पाम संडे
Entry into Jerusalem - William Brassey Hole.jpg
यरुशलेममध्ये येशूचा प्रवेश[१][२]
साजरा करणारे ख्रिस्ती
दिनांक ईस्टर च्या एक हफ्ते पूर्वी

पाम संडे हा ख्रिश्चन लोकांचा सण आहे. हा सण ईस्टर संडेच्या एक आठवड्या पूर्वी साजरा केला जातो. येरुश्लेम नगरीत येशुचा प्रवेश आणि त्या नंतरची मेजवानी तसेच येशूचे बलिदान याची सुरुवात झावळ्यांच्या रविवार ने होते . याची उल्लेख नवा करारतील चारही शुभवर्तमानांमध्ये केला गेलेला आहे .

बायबलमधील घटना[संपादन]

पाम संडेची तारिक
२०११–२०२५
In Gregorian dates
Year Western Eastern
2011 एप्रिल १७
2012 एप्रिल १एप्रिल ८
2013 मार्च २४एप्रिल २८
2014 एप्रिल १३
2015 मार्च २९एप्रिल ५
2016 मार्च २०एप्रिल २४
2017 एप्रिल ९
2018 मार्च २५एप्रिल १
2019 एप्रिल १४एप्रिल २१
2020 एप्रिल ५एप्रिल १२
2021 मार्च २८एप्रिल २५
2022 एप्रिल १०एप्रिल १७
2023 एप्रिल २एप्रिल ९
2024 मार्च २४एप्रिल २८
2025 एप्रिल १३
यरुशलेममध्ये येशूच्या प्रवेश

चारही शुभवर्तमानांमध्ये येशूच्या यरुशलेममध्ये येशूच्या प्रवेशाची नोंद त्याचे पुनरुत्थान होण्याच्या एक आठवडा आधीची आहे.

ख्रिश्चन वेदान्तकरते याची विशिष्ट जुना करारमध्ये संदेष्टा मिळविले आहे, असा विश्वास.सियोन, आनंदोत्सव कर! यरुशलेमवासीयांनो, आनंदाने जल्लोश करा! पहा! तुमचा राजा तुमच्याकडे येत आहे. तो विजयी व चांगला राजा आहे. पण तो विनम्र आहे. एका गाढवीच्या शिंगरावर, तो स्वार झाला आहे. - जखऱ्या ९:९ [३] हे येशू इस्राएलचा राजा होता जाहीर होते असे सूचित करतो.

चारही शुभवर्तमानांमध्ये येशू ख्रिस्त यरुशलेममध्ये एका गाढवावर बसून प्रवेश करता झाला आनंदी झालेले त्याचे भक्तांनी त्याच्या समोर आपले झगे आणि पाम वृक्षाच्या झावळ्या जमिनीवर अंथरून स्वागत केले आणि गीते गायली “परमेश्वराची स्तुती करा. परमेश्वराने आपला उध्दार केला.“परमेश्वराच्या घरी आम्ही तुझे स्वागत करतो.” स्तोत्रसंहिता ११८:२५-२६ [४]

भारतात पाम संडे[संपादन]

These are small crosses made up of palm on occasion of palm sunday.

भारतात जास्ते ख्रिश्चन चर्चमध्ये सकाळी पवित्र मिसाबलिदानात पाम आशीर्वाद ताकते व लोकांना देतात. ही पानाची पतीला क्रॉसचे आकारात बनवन्याची प्रता आहे. दक्षिण भारतात गोस्पेल वाच्याच्या वेळी फुले टाकतात यांनी येसूची यरुशलेमात प्रवेशाचे प्रतिबिंब आहे. यावेळी सर्वे लोक होझाना बोलून येशूची स्तुति करतात

पाम संडे दिवशी सुवार्ता वाचन[संपादन]

मत्तय २७:११-५४[५]

 • ११ राज्यपाल पिलातापुढे येशू उभा राहिला तेव्हा पिलाताने त्याला प्रश्न विचारले. तो म्हणाला, “तू यहूद्यांचा राजा आहेस काय?” येशूने उत्तर दिले, “होय, मी आहे, जसे तुम्ही म्हणता.”
 • १२ पण जेव्हा मुख्य याजकांनी व वडिलांनी त्याच्यावर दोषारोप केले, तेव्हा तो गप्प बसला.
 • १३ म्हणून पिलात येशूला म्हणाला, “हे लोक तुझ्यावर जो दोषारोप ठेवीत आहेत तो तू ऐकत आहेस ना? तर मग तू का उत्तर देत नाहीस?”
 • १४ परंतु येशूने पिलाताला काहीही उत्तर दिले नाही. आणि पिलात आश्चर्यचकित झाला.
 • १५ वल्हांडण सणानिमित्त दरवर्षी लोकसमुदायासाठी तुरूंगातून एकाला सोडण्याची प्रथा होती.
 • १६ त्या विशिष्ट वेळेला तेथे एक कुप्रसिद्ध कैदी होता. त्याचे नाव बरब्बाहोते.
 • १७ म्हणून जेव्हा लोक जमले, तेव्हा पिलाताने त्यांना विचारले, “तुमच्यासाठी मी कोणाला सोडावे अशी तुमची इच्छा आहे? कुविख्यात बरब्बाला की ज्याला ख्रिस्त म्हणतात त्या येशूला?”
 • १८ लोकांनी इर्षेला पेटून येशूला पिलाताच्या हाती दिले होते हे पिलाताच्या ध्यानी आले.
 • १९ न्यायासनावर बसला असता पिलात हे बोलला. तो तेथे बसलेला असतानाच त्याच्या पत्नीने त्याला एक निरोप पाठविला. तो निरोप असा होता: “या मनुष्याविषयी सावध राहा; कारण तो दोषी नाही. त्याच्याविषयी स्वप्न पडल्यामुळे मला आज दिवसभर फार दु:ख सहन करावे लागेले आहे.”
 • २० पण पिलाताने बरब्बाला सोडून द्यावे व येशूला जिवे मारावे अशी मागणी लोकांनी करावी म्हणून मुख्य याजकांनी व वडील जनांनी लो कसमुदायाचे मन वळविले.
 • २१ पिलात म्हणाला, “माझ्यासमोर बराब्बा व येशू दोघेही आहेत. मी तुमच्यासाठी कोणाला सोडून द्यावे अशी तुमची इच्छा आहे?” लोकांनी उत्तर दिले. ‘बरब्बा.’
 • २२ पिलाताने विचारले, “मग ज्याला ख्रिस्त म्हणतात त्या येशूचे मी काय करावे?” सर्व लोक ओरडून म्हणाले, “त्याला वधस्तंभावर खिळून मारून टाका!”
 • २३ पिलाताने विचारले, “का? मी त्याला जिवे मारावे असे तुम्ही का म्हणता? त्याने काय अपराध केला आहे?”परंतु सर्व लोक मोठ्याने ओरडून म्हणू लागले, “त्याला वधस्तंभावर खिळा!”
 • २४ लोकांच्या पुढे आपले काही चालणार नाही हे पिलाताने पाहिले. उलट लोक अधिक अशांत होऊ लागले होते म्हणून पिलाताने थोडे पाणी घेतले आणि लोकांच्या समोर आपले हात धुतले. मग पिलात म्हणाला, “या मनुष्याच्या मरणाची जबाबदारी माझ्यावर नाही, तुम्हीच त्यासाठी जबाबदार आहात.”
 • २५ सर्व लोक ओरडून म्हणू लागले, “याच्या मरणाची जबाबदारी आमच्यावर असो. त्याच्यासाठी व्हायची शिक्षा आम्ही व आमची मुले भोगायला तयार आहोत.”
 • २६ मग पिलाताने बरब्बाला सोडून दिले. येशूला चाबकाचे फटके मारावे असे पिलाताने आपल्या काही सैनिकांना सांगितले. नंतर येशूला वधस्तंभावर खिळून मारावे म्हणून पिलाताने शिपायांच्या हाती दिले.
 • २७ नंतर पिलाताचे शिपाई येशूला राज्यापालाच्या वाड्यात घेऊन आले. ते सर्व घोळक्याने येशूभोवती जमले.
 • २८ त्यांनी येशूचे कपडे काढले व त्याला लाल किरमिजी झगा घातला.
 • २९ काटेरी झाडाच्या फांद्यांचा एक मुकुट तयार करून तो येशूच्या डोक्यावर ठेवला. तसेच त्यांनी त्याच्या उजव्या हातात एक काठी दिली. मग शिपाई येशूपुढे गुडघे टेकून त्याची थट्टा करु लागले. ते म्हणू लागले, “यहूद्याचा राजा चिरायू होवो!”
 • ३० नंतर शिपाई येशूवर थुंकले. त्याच्या हातातील काठी त्यांनी घेतली आणि त्या काठीने त्याच्या डोक्यावर मारत राहिले.
 • ३१ येशूची थट्टा करण्याचे संपविल्यावर त्यांनी त्याचा झगा काढून घेतला आणि त्याचे कपडे त्याला घातले. मग ते त्याला वधस्तंभावर खिळून मारण्यासाठी घेऊन गेले.
 • ३२ शिपाई येशूला शहराबाहेर घेऊन चालले होते. तेव्हा त्यांनी एका मनुष्याला वेठीला धरून येशूचा वधस्तंभ वाहायला लावले. तो कुरेने या गावचा असून त्याचे नाव शिमोन होते.
 • ३३ जेव्हा ते ‘गुलगुथा’ (म्हणजे कवटीची जागा) नावाच्या ठिकाणी येऊन पोहोचले.
 • ३४ तेव्हा त्यांनी येशूला पित्तमिश्रित द्राक्षारस प्यायला दिला. त्याने तो चाखला. पण पिण्यास नकार दिला.
 • ३५ त्यांनी त्याला वधस्तंभावर खिळले. नंतर त्यांनी चिठ्ठ्या टाकून येशूचे कपडे आपसात वाटून घेतले.
 • ३६ शिपाई तेथे बसून येशूवर पहारा देऊ लागले.
 • ३७ येशूच्या डोक्याच्या वरच्या बाजूला त्याच्यावर ठेवण्यात आलेला दोषारोप लिहिलेला लेख शिपायांनी लावला. त्यावर मजकूर होता, “येशू - यहूद्यांचा राजा.”
 • ३८ येशूच्या दोन्ही बाजूंना दोन लुटारु खिळण्यात आले होते.
 • ३९ जवळून जाणारे लोक येशूची निंदा करु लागले. ते डोकी हलवू लागले.
 • ४० आणि म्हणू लागले, “तू म्हणालास की, ‘हे मंदिर मोडून तीन दिवसात परत उभे करीन.’ आता स्वत:चा बचाव कर, जर तू खरोखरच देवाचा पूत्र असलास तर वधस्तंभारून खाली ये.”
 • ४१ तसेच मुख्य याजक, नियमशास्त्राचे शिक्षक, वडील हेही तेथे होते. तेही इतरांसारखी येशूची निंदा करू लागले.
 • ४२ ते म्हणू लागले, “याने दुसऱ्यांना वाचविले, परंतु तो स्वत:चा बचाव करू शकत नाही. लोक म्हणतात की, हा इस्राएल (यहूदी) लोकांचा राजा आहे. जर तो राजा असेल, तर त्याने वधस्तंभावरून खाली यावे. म्हणजे आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवू!
 • ४३ याचा देवावर विश्वास आहे, जर देवाला तो खरोखर पाहिजे असेल तर त्याने त्याला वाचवावे. तो स्वत: असे म्हणत असे, ‘मी देवाचा पुत्र आहे.”‘
 • ४४ तसेच त्याच्याबरोबर वधस्तंभावर खिळलेले चोर देखील येशूविषयी वाईट गोष्टी बोलू लागले.
 • ४५ दुपारनंतर लगेच सुमारे तीन तास सर्व भूमीवर अंधार पसरला.
 • ४६ सुमारे तीन वाजता येशू मोठ्याने ओरडून म्हणाला, “एलोई, एलोई, लमा सबकत्नी?” याचा अर्थ “माझ्या देवा, माझ्या देवा, तू माझा त्याग का केलास?”
 • ४७ जे लोक तेथे उभे होते त्यांनी हे एकले. ते म्हणू लागले, “तो एलीयाला हाक मारीत आहे!”
 • ४८ एक जण लगेच धावत गेला आणि बोळा घेऊन आला. त्या मनुष्याने तो बोळा आंबेत बुडविला आणि तो वेताच्या टोकावर ठेवून येशूला प्यायला दिला.
 • ४९ परंतु दुसरे काही लोक म्हणु लागले, “थांबा, एलीया येऊन त्याला वाचवितो काय, हे आम्हांला पहायचे आहे.”
 • ५० पुन्हा एकदा येशूने मोठ्याने आरोळी मारली आणि तो मरण पावला.
 • ५१ त्याचवेळी, येशू मेल्याबरोबर मंदिरातील पडदा वरपासून खालपर्यंत दुभागला गेला, भूकंप झाला, खडक फुटले.
 • ५२ कबरी उघडल्या, आणि देवाचे बरेच लोक जे मरण पावले होते, ते उठविले गेले.
 • ५३ ते लोक कबरींतून बाहेर पडले, येशू मरणातून पुन्हा उठल्यावर ते लोक पवित्र नगर अर्थात यरूशलेमामध्ये गेले आणि अनेक लोकांनी त्यांना पाहिले.
 • ५४ सेनाधिकारी व त्याच्याबरोबर येशूवर जे शिपाई पहारा देत होते त्यांनी भूकंप व जे काही घडले ते पाहिले. आणि ते फार भ्याले. ते म्हणाले, “हा मनुष्य खरोखर देवाचा पुत्र होता.”

संदर्भ[संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत
 1. Matthew 19–28 by William David Davies, Dale C. Allison 2004 ISBN 0-567-08375-6 page 120
 2. John 12–21 by John MacArthur 2008 ISBN 978-0-8024-0824-2 pages 17–18
 3. "जखऱ्या - मराठी बायबल" (मराठी मजकूर). 
 4. "स्तोत्रसंहिता - मराठी बायबल" (मराठी मजकूर). 
 5. "मराठी बायबल (मत्त्य)" (मराठी मजकूर).