वसंत पंचमी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
विशेष लेख
हा लेख मराठी विकिपिडीयावरील १[१]वा लेख आहे.
वसंत ऋतूत पळसाला आलेला बहर.
वसंत ऋतूत बहरलेली सांवरीची फुले.

वसंत पंचमी ही शिशिर ऋतूमध्ये येणारी माघ शुद्ध पंचमी होय. भारतात साधारणतः मकर संक्रांतीनंतर सूर्याचे उत्तरायण सुरू होतानाच्या काळात येणारा हा सण आहे. भारतात वेगवेगळ्या प्रदेशात वेगवेगळ्या पद्धतीने साजरा होत असला तरी खास करून या दिवशी, नृत्यादि कला शिकवणाऱ्या संस्थांत, विद्येची देवता - सरस्वतीची पूजा करण्याची प्रथा आहे. हा दिवस सरस्वतीचा जन्मदिवस आहे. वसंत पंचमी ही कामदेवाच्या पूजेसाठीही ओळखली जात असे. सूफी परंपरेतील चिश्ती संप्रदायात हजरत निजामुद्दीन अवलियाचे शागीर्द मोहरीच्या पिवळ्या फुलांच्या रंगात बुडविलेली वस्त्रे नेसून हा सण साजरा करतात.

माघ शुद्ध पंचमी या दिवसाला वसंत पंचमी असे म्हटले जाते.कृषी संस्कृतीशी याचा संबंध दिसून येतो. या दिवशी नवान्न इष्टी असा एक छोटा यज्ञ करतात.शेतात तयार झालेल्या नवीन पिकाच्या लोंब्या घरात आणून त्या देवाला अर्पण करतात. हा दिवस देवी सरस्वतीचा जन्मदिवस म्हणूनही साजरा केला जातो. मथुरा, वृंदावन, राजस्थान या भागात या दिवशी विशेष उत्सव साजरा केला जातो. या दिवशी गणपती, इंद्र, शिव आणि सूर्य यांची प्रार्थनाही केली जाते.बंगाल प्रांतात या दिवशी भक्तिगीते म्हणत प्रभातफेरी काढली जाते.[२][३]

पेशवेकालीन उत्सव[संपादन]

पेशव्यांंच्या काळात हा उत्सव महाराष्टात उत्साहाने साजरा होत असे असा उल्लेख ब्राॅॅटन याने केले आहे.या दिवशी स्री-पुरुष आपल्या नातेवाईकांंना फुलांंचा अथवा हिरव्या देठाच्या धान्याच्या कणसांंचा गुच्छ भेट म्हणून देत.डोक्यावरील पागोट्यात तो कणसाचा तुरा रोवत असत.याच दिवशी पिवळ्या रंंगाचे वस्र परिधान करण्याचीही पद्धती होती.फुले,फळे,मिठाई यांंचीही देवाणघेवाण होत असे.वसंंत ॠतूची सन्मानपूर्वक पूजा हा मुख्य भाग असे.[४]

बाजीराव पेशवे यांंच्या काळात सरदारांंसोबत हा उत्सव साजरा केला जाई.केशरी रंंगाची उधळण केली जात असे.ब्राह्मण,शास्री आणि अन्य सन्माननीय व्यक्तींंना भोजन,कलावंंतीणींंचे नृृत्य असे उत्सवाचे स्वरूप असे. [५]

बंगालमधील वसंत पंचमी[संपादन]

पश्चिम बंगाल मध्ये या दिवशी सर्वजण पिवळी वस्त्रे परीधान करून सरस्वती पूजन करतात. देवीच्या पायाशी पुस्तके, लेखण्या ठेवून देवीचा आशीर्वाद घेतला जातो. काही लोक उपासही करतात. सरस्वतीला फुले वाहिली जातात. त्याला 'पुष्पांजली' असे म्हणतात. यादिवशी लहान मुलांच्या पाटीवर पहिली मुळाक्षरे काढून देऊन त्यांच्या शिक्षणाची सुरूवात केली जाते.

पतंग उत्सव[संपादन]

भारतातीलच नव्हे तर फाळणीनंतर पाकिस्तानात गेलेल्या पश्चिम पंजाबात सुद्धा वसंतपंचमी ही पतंगोत्सवाच्या स्वरूपात साजरी केली जाते. शेतातील सरसों(मोहरी)ची फुले पिवळी जर्द झाल्यावर नदीकाठी पंजाबात हा दिवस साजरा केला जातो.या दिवशी केशर घातलेला गोड भात खाण्याची पद्धती आहे.[६]

बाह्यदुवे[संपादन]

  1. या लेखाचा इतिहास पहा.
  2. भारतीय संस्कृती कोश खंड आठ 
  3. शक्ती गुप्ता , Festivals fairs and fasts of India
  4. डाॅॅ.कर्णिक शशिकांंत,पेशवेकालीन महाराट्रातील सामाजिक व आर्थिक जीवन,इतिहास आणि संंस्कृृती,१९८६,पृृष्ठ ७४—७५
  5. डाॅॅ.पाटील रत्नप्रभा,पेशवे आणि मराठे सरदार घराण्यातील स्रियांंचे धार्मिक जीवन,२००७,श्वेता पब्लिकेशन्स,पृृष्ठ ७२
  6. शक्ती गुप्ता festivals fairs and fasts of India


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

संदर्भ आणि नोंदी[संपादन]


Broom icon.svg
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.

नवीन सदस्यांना मार्गदर्शन
हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली आढळल्यास वापरला जातो. कृपया या संबंधीची चर्चा चर्चापानावर पहावी.Broom icon.svg
या लेखाचे शुद्धलेखन किंवा/आणि मराठी व्याकरण मराठी विकिपीडियासाठी अनुकूल नाही. कृपया लेख तपासून शुद्धलेखन करावे. हा साचा अशुद्धलेखन किंवा/आणि मराठी व्याकरणविषयक चुका आढळल्यास वापरला जातो. नेहमी होणाऱ्या चुकांबद्दल या पानावर माहिती आहे. या संबंधी अधिक चर्चा करायची असल्यास अथवा काही शंका/ प्रश्न असल्यास कृपया चर्चापान वापरावे.