त्रिपुरारी पौर्णिमा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

कार्तिक पौर्णिमेला त्रिपुरारी पौर्णिमा म्हणतात. याच दिवशी गुरुनानक जयंती असते. एकादशीपासून सुरू झालेले तुळशी विवाह करण्याचा हा शेवटचा दिवस असतॊ.

पौराणिक पार्श्वभूमी[संपादन]

त्रिपुरासुर नावाच्या राक्षसाने खडतर तप करून ब्रह्मदेवाकडून शत्रूंपासून भय राहणार नाही असा वर मागून घेतला या वरामुळे उन्मत्त होऊन तो सर्व लोकांना व देवांनासुद्धा खूप त्रास द्यायला लागला. त्रिपुरासुराची तीन नगरे असून त्याला अभेद्य तट होता. त्यामुळे देवांनाही त्याचा पराभव करता येईना. देवांनी भगवान शंकराची अखेर प्रार्थना केली. तेव्हा शंकरांनी त्याची तिन्ही नगरे जाळून त्याला ठार केले. कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी ही घटना घडल्यामुळे तिला त्रिपुरारी पौर्णिमा म्हटले जाऊ लागले. या दिवशी घरात, घराबाहेर व देवळातही दिव्याची आरास करून व नदीत दीपदान करून लोक आनंदोत्सव साजरा करतात.

उत्तर भारतात हा दिवस स्कंदजयंती म्हणून साजरी करतात व त्या दिवशी स्कंद मूर्तीची पूजा करतात. दक्षिणेत या दिवशी कृत्तिका महोत्सव असतो. त्यात शिव पूजन केले जाते.{१}

संदर्भ व नोंदी[संपादन]

१. भारतीय संस्कृती कोश खंड चौथा


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

बाह्यदुवे[संपादन]