ईद-उल-फित्र

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


Broom icon.svg
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.

नवीन सदस्यांना मार्गदर्शन
हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली आढळल्यास वापरला जातो. कृपया या संबंधीची चर्चा चर्चापानावर पहावी.


ईद-ए-मिलाद म्हणजे ‘ अल्लाह ‘ चे प्रेषित हजरत महंमद पैगंबर यांचा जन्मदिवस. जगभर ‘ ईद-ए-मिलादुन्नबी ‘ हा सण इस्लामी वर्ष हिजरी रब्बीअवल महिन्याच्या बारा तारखेला मोठया उत्साहात साजरा केला जातो. ईद-ए-मिलादच्या दिवशी खुलताबादचे महत्त्वअनन्यसाधारण असे आहे. खुलताबाद येथील हजरत बावीस ख्वाजा सय्यद जैनोद्दीन चिश्ती यांच्या दर्ग्यात १४०० वर्षांपूर्वीचा हजरत मोहम्मद पैगंबर यांचा पवित्र पोशाख ‘ पैराहन-ए-मुबारक ‘ गेल्या ७०० वर्षांपासून जतन करून ठेवण्यात आलेला आहे. येथे दर्शनासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून मुस्लीम भाविक मोठया श्रद्धेने लाखोंच्या संख्येने गर्दी करतात.

येथील समोरच असलेल्या हजरत ख्वाजा बु-हानोद्दिन यांच्या दर्ग्यात ‘ मुँ-ए-मुबारक ‘ ( मिशीचा केस ) व पैराहन-ए-मुबारक (पवित्र पोशाख )) ईद-ए-मिलादच्या दिवशी दर्शनासाठी खुला केला जातो. या पवित्र पोशाखाच्या दर्शनाला जगभरातील लाखो मुस्लीम भाविक मोठया भक्तिभावाने खुलताबाद येथे येत असतात. ईद-ए-मिलादुन्नबी निमित्त ‘ मुबारक ‘ या पर्वकाळात हा पोशाख व मिशीचा केस दर्शनासाठी काचेच्या पेटीत खुला ठेवण्यात येतो. मुस्लीम भाविक मोठया श्रद्धेने लाखोंच्या संख्येने गर्दी करतात. यावेळी गोडभात प्रसाद म्हणून वाटला जातो.

हजरत महंमद पैगंबर यांच्या पोशाखामुळे खुलताबाद येथील हजरत ख्वाजा जैनोद्दीन चिश्ती यांच्या दर्ग्याला काश्मीरमध्ये असलेल्या हजरतबल दर्ग्याच्या बरोबरीचे महत्त्व आहे. इस्लाम धर्माचे संस्थापक प्रेषित हजरत महंमद पैगंबर यांचा जन्म ई.स. ५७१ मध्ये सौदी अरेबियाच्या मक्का या गावी झाला. जन्माअगोदरच त्यांचे पितृछत्र हरपून गेले होते.

वयाच्या सहाव्या वर्षी त्यांच्या मातोश्रीना पण देवाज्ञा झाली. लहानपणीच माता-पित्याचे छत्र हरपलेल्या अशा या एकाकी पडलेल्या बालकाचे त्याच्या चुलत्याने संगोपन केले. लहानपणापासूनच शिक्षणापासून वंचित राहिलेला हा बालक धर्माचा संस्थापक बनला. आपल्या जीवनकाळात हजरत मोहमद यांनी समस्त मानवजातीला उदारता , समता , विश्वबंधुत्व , सामाजिक न्याय आणि समरसतेची शिकवण दिली. त्यांची शिकवण केवळ काही विशिष्ट जातीधर्मापूरती मर्यादित नव्हती , तर संपूर्ण मानव जातीच्या कल्याणासाठी होती.

स्लिम धर्माचे दोन महत्त्वपूर्ण सण म्हणजे ईद उल फितर व दुसरी ईदुज्जुह. ईद उल फितर ईद ही आनंद साजरा करण्याची ईद मानली जाते. आपापसात बंधुत्वाचे संबंध प्रस्थापित करून प्रेम व आनंदाने साजरा केला जाणारा सण अशी त्याची ओळख आहे. याउलट ईदुज्जुहा म्हणजे कुर्बानी व त्यागाचे पर्व मानले जाते.

ईद उलल फितर हा अरबी भाषेतील शब्द आहे. ईद या शब्दाचा अर्थ आनंद असा आहे. तर फितर म्हणजे दान करणे. अन्नाच्या स्वरूपात दान केले जाते. फितर हा मुस्लिम शरियत कायद्यातील मापदंड आहे. रमजान महिन्यातील रोजे संपल्यानंतर ईद येते. ईद हा आनंदाचा सण असल्याने ईदच्या दिवसांमध्ये मुस्लिम बांधवांच्या चेहर्‍यावर आनंद खुललेला दिसतो. ईदला नवीन वस्त्र परिधान करून मुस्लिम बांधव ईदगाह किंवा मशिदीत नमाज अदा करायला जातात. अल्लाच्या प्रती नमाज अदा केल्यानंतर मुस्लिम बांधव एकमेकांना आलिंगन घेऊन ईदच्या शुभेच्छा देतात. या दिवशी मित्र असो वा शत्रू ते दोघांची गळाभेट घेऊन शुभेच्छा देतात.

idd ND ईदच्या दिवशी मुस्लिम धर्मातील महिलावर्गात मोठा उत्साह दिसून येतो. पहिल्या दुसर्‍या रोजापासून घरात त्या शेवया तयार करायला सुरवात करतात. मात्र, हे चित्र आता केवळ ग्रामीण भागातच दिसते, शहरी भागात सगळ्याच गोष्टी रेडीमेड मिळायला लागल्या आहेत. ईदला आपल्या घराला रंगरंगोटी करून आप्तजनांना आपल्याकडे शिरखुर्मा खाण्यासाठी आमंत्रित केले जाते.

ईदच्या शुभ पर्वाला गरीब, अनाथ मुस्लिम बांधव आनंदापासून वंचित राहत असेल तर ती ईद मुस्लिम धर्मासाठी आनंदाची नाही, असे मानले जाते. मुस्लिम धर्मातील तळागाळातील व्यक्तीला ईदच्या पावन पर्वाचा आनंद घेता यावा, यासाठी जकात व फितराची तरतूद मुस्लिम शरियत कायदामध्ये करण्यात आली आहे. जकात हे ईदच्या आधी दिले जाते. कारण त्यांनी ही या वर्षांतून एकदा येणार्‍या महान पर्व- ईदचा आनंद तुटता यावा. मुस्लीम समाज ईद साजरी करतात. त्यातला रमजान ईद व बकरी ईद साजरी करून आनंद मिळवतात. रमजान ईद हा क्षण जरा निराळा आहे. दिवसभर कडकडीत उपवास करून पाण्याचा एक घोटही न घेता उपवास म्हणजे रोजा संपल्यानंतर रात्री फराळ करायचा, जेवण घ्यायचे. असे काही मुस्लीम बांधवांनी रमजान ईदच्यासणाची थोडी बहुत माहिती दिली. रोजे संपल्यावर येणारा शेवटचा दिवस रमजान ईदसणाचा असतो. पाणी न पिता खडतर उपवास का करायचा तर अल्लाहचे स्मरण करून जपात विंैवा पवित्र कुराण वाचण्यात अल्लाहच्या स्मरणातच संपुर्ण दिवस घालवणे.

मी कर्नाटक सार्वजनीक बांधकाम खात्यात नोकरीला असताना एस. एम. मुल्ला साहेब इंजिनीयर म्हणुन काम करत होते. ते अत्यंत इस्लाम धर्माचे साधक होते. इतर हिंदू धर्म कर्मचायांशी ते अत्यंत प्रेमाने वागायचे. एवढेच नव्हे तर मराठी भाषेवर त्यांचे प्रभुत्व होते. कुणाचे काही चुकत असेल तर गोडीने चुक समजुन देऊन ते चुक सुधारायला सांगायचे. आपल्यापेक्षा गरीब माणसांना दान करण्याची त्यांची प्रवृत्ती होती. नमाज पठणाच्या वेळी साहेबांची रूम खाली असेल तर साहेबांच्या खोलीचा दरवाजा बंद करून बैठकीचे छोटे आसन घालुन ते नमाज पढायचे. नमाज पढायला मशीद असतो. पण सरकारी काम करतेवेळी ते आहे त्या ठिकाणी निवांत अशा एकांत ठिकाणी नमाज पढायचे. आता मी सेवानिवृत्ती घेऊन अकरा वर्षे झाली. त्याअगोदर दोन तीन वर्ष त्यांनी सेवानिवृत्ती घेतली. माझे वय वर्षे त्याचे असावे. त्याची माझी गेली दहा वर्षे भेट नाही. आपल्या ईदच्या सणाला मला त्यांनी काही रकमेची बक्षिसी दिली. बकरी ईद असो, रमजान असो, ते गरिबांना दान द्यायचे. हे दान मीपण घेतले. त्यांनी मुस्लीम हिंदू असा भेदभाव दान देण्यात केला नाही. या मुल्ला साहेबांची मला फार आठवण येते. मी असेसमजतो निरपेक्ष उदात्त प्रेमातच अल्लाहच्या प्रेमाची प्रचिती आदरणीय मुल्ला साहेबांच्या माध्यमातुनच अनुभवली आहे.

गरिबांना दान करणे, यतिमांना आधार देणे, शेजारी पाजारी उपाशी असेल तर त्यांना जेवणाचे ताट देणे, अशी काही इस्लामची शिकवण आहे असे म्हणतात. म्हणुन माणसा-माणसाला जोडणे, एकमेकांनी अत्यंत प्रेमाने राहणे हाच इस्लामचा धर्म आहे. हीच अमन आणि शांती असे एका मुस्लीम बांधवाने मला सांगीतले.

रमजान ईद का साजरी करायची असते, तर सुरुवात आनंदात दिवस जावेत म्हणून अल्लाहचा स्वर्ग कसा आनंदरसात डुंबवणारा आहे आणि नरक कसा यातना देणारा आणि दु:खाच्या खाईत लोटणारा आहे, हे शोधनमधून पवित्र कुराणाच्या काही भागात वाचले. रमजानमधला खडतर उपवास बारा-तेरा वर्षांच्या मुलीही करतात व मुलेही करतात आणि परवरदिगार-ए-आलमच्या सहायात रहाण्याचा तळमळीने प्रयत्न करतात. मग अल्लाह त्यांच्यावर का उपकार करणार नाही!

खरं म्हणजे सर्व धर्मांतला समाज जोगरीब आहे तो अत्यंत कष्टात दिवस घालवत आहे. नरकयातनाच सध्या सर्व धर्मांतील समाजातील गरीब वर्ग भोगत आहे. पहाटेच्यावेळी दिवस उजाडण्याच्या आधी मशीदीमधून मौलवीची स्पीकरमधून प्रार्थना कानी पडते आणि त्याच परमेश्वर अल्लाहची आठवण होते. वीस वर्षांपुर्वी बेळगावला जोहरे गुफ्तार या नावाचे ऊर्दु साप्ताहिक निघत होते. त्यात मी एक हिंदी लेख मशिदीत होणाया प्रार्थनेवर लिहीला होता. तो लेख संपादकांनी ऊर्दु भाषेत प्रसिद्ध केला होता.

आमचे काही जवळचे मुस्लिम बांधव मत्र आहेत. रमजान बकरी ईदला गोड तिखट जेवण आमच्या घरी आणुन देतात. आम्हीपण दिवाळीला गोड तिखट पदार्थांची ताटे मुस्लीम बांधव मित्रांच्या घरी जाऊन देतो. या देण्याघेण्याच्या पाठीमागे एकमेकांवरचं प्रेम व्यक्त करण्याचे साधन असते. मत्सर, द्वेष, अहंकार, श्रेष्ठता, कनिष्ठता, प्रेमामध्ेय-मुहब्बतमध्ये नसते. प्रेमाचे धागे माणसामाणसाला जोडतात. जो प्रेम तोडतो तो सैतान असतो. आजदेखील सैतान अनेक देशात (अफगानीस्तान, इराक, पॅलेस्टीनमध्ये) हाहाकार माजवून राष्ट्रीय संपत्तीची होळी करून माणसांची हत्या करून रक्ताचे पाट वहावत आहेत. या सैतानाला अल्लाह ठेचत राहो ही रमजानच्या सणादिवशी प्रार्थना.

बाह्यदुवे[संपादन]