Jump to content

पतेती

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

पतेती हा पारश्यांचा नववर्ष दिवस होय. मुळात पतेती म्हणजे "पश्चात्तापाचा दिवस" (पेटेटचा अर्थ "कबुलीजबाब" असा आहे). हा खरोखर आत्मनिरीक्षणाचा दिवस आहे आणि मूलतः पारसी वर्षाच्या शेवटच्या दिवशी (किंवा शेवटच्या 5 दिवसांवर) पतेती साजरा केला जात असे. कालांतराने नवीन वर्षाचा दिवस म्हणून (पहिल्या दिवशी) साजरा केला जाऊ लागला. नाव कायम ठेवले असले तरी आता पटेटी हा आत्मपरीक्षणाचा दिवस राहिलेला नाही. पारशी नववर्षाचा पहिला दिवस हा नवरोज किंवा जमशेदी नवरोज असे म्हणून ओळखला जातो. पारशी समाज हा भारतातील एक लहान समाजगट आहे. मुळातुन पर्शिया म्हणजे इराणमधूनहा समाजगट भारतात येऊन स्थिरावला आहे पती हा फारशी धर्मीयांचा महत्त्वाचा सण मानला जातो धार्मिक प्रथा व परंपरेनुसार पारशी धर्मीय हा सण साजरा करतात.[] दिनदर्शिकेनुसार पारशी वर्षाच्या ह्या पहिल्या दिवसाला नवरोज (नवी सृष्टी) म्हणले जाते. या दिवशी पारशी लोक अग्यारीत जाऊन प्रार्थना करतात आणि पारशी भोजन घेतात.

उपासना पंथ

[संपादन]

झरतुष्ट हा पारशी धर्माचा संस्थापक मानला जातो. अहुर मज्द ही या धर्म संप्रदायाची प्रमुख पूजनीय देवता मानली जाते.[] अवेस्ता हा पारशी धर्माचा ग्रंथ असून "पैतीता" या अवेस्तामधील शब्दाचे अपभ्रंशित रूप म्हणजे "पतेती" होय.

स्वरूप

[संपादन]

पतेतीच्या दिवशी पारशी बंधु भगिनी सकाळी लवकर उठतात. या दिवशी सणानिमित्त विशेष स्नान केले जाते त्याला "नहान" असे म्हणतात. त्यानंतर नवीन कपडे परिधान करून सर्वजण अग्यारीत प्रार्थनेला जातात.अग्यारी हे पारशी समाजाचे धर्मस्थळ आहे.अग्नी ही त्यांना पूजनीय देवता असून अग्यारीमधे सतत अग्नी प्रज्वलित ठेवलेला असतो. पतेतीच्या दिवशी धर्मोपदेशक विशेष प्रार्थना करून आशीर्वाद देतात.नंतर सर्वजण परस्परांना नूतन वर्षाच्या शुभेच्छा देतात.[] पतेतीच्या दिवशी गरिबांना दान करण्याचे महत्त्व विशेष आहे.ज्याप्रमाणे परस्परांना भेटवस्तू आणि मिठाई देऊन शुभेच्छा दिल्या जातात त्याप्रमाणे गरजूंना अन्नदान केले जाते. या दिवशीचे खास भोजन म्हणून सालीबोटी,मावा निबोई,पत्र निमाच्ची आणि रवा फालुदा हे पदार्थ केले जातात.[]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ a b Festivals Of The World (इंग्रजी भाषेत). Sterling Publishers Pvt. Ltd. ISBN 978-1-84557-574-8.
  2. ^ Sharma, Usha (2008-01-01). Festivals In Indian Society (2 Vols. Set) (इंग्रजी भाषेत). Mittal Publications. ISBN 978-81-8324-113-7.
  3. ^ Gupta, Shobhna (2002). Festivals of India (इंग्रजी भाषेत). Har-Anand Publications. ISBN 978-81-241-0869-7.