कर्नाळा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
कर्नाळा
Karnala Fort.jpg
कर्नाळा किल्ला चा सुळका
नाव कर्नाळा
उंची
प्रकार गिरिदुर्ग
चढाईची श्रेणी सोपा
ठिकाण पनवेल तालुकारायगड जिल्हा, महाराष्ट्र, भारत
जवळचे गाव शिरढोण
डोंगररांग सह्याद्री
सध्याची अवस्था बऱ्यापैकी
स्थापना {{{स्थापना}}}


कर्नाळा हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे.ह्या किल्ल्यालगतचा परिसर कर्नाळा अभयारण्य म्हणून ओळखला जातो रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुकातील हा किल्ला आहे. कर्नाळा किल्ला पनवेलपासून सुमारे १२ किमी अंतरावर आहे.

इतिहास[संपादन]

स्वातंत्र्य सैनिक वासुदेव बळवंत फडके यांचे आजोबा या किल्ल्याचे किल्लेदार होते. पूर्वी बोरघाट द्वारे होणाऱ्या वाहतुकी वर लक्ष ठेवण्यासाठी या किल्ल्याचा वापर होत असे.

गडावरील ठिकाणे[संपादन]

कर्नाळा किल्ला हा कर्नाळा पक्षी अभयारण्यात येतो. कर्नाळा किल्ल्याचा सुळका विशेष लक्षवेधी आहे, हा सुळका अंगठ्यासारखा दिसतो. किल्ल्याची तटबंदी ढासाळलेल्या अवस्थेत आहे. किल्ल्यावर प्रवेश केल्यावर एक मोठा वाडा लागतो. परंतु तो सुस्थितीत नाही. कर्नाळा किल्ल्यावर करणाई देवीचे मंदिर, तटबंदी, जुने बांधकाम व थंड पाण्याच्या टाक्या आहेत.

गडावर जाण्याच्या वाटा[संपादन]

पनवेल वरून पेण अलिबाग रोहा साई केलवणे कोणतीही एस.टी. (मरामापमं)ची बस कर्नाळ्याला जाते. पनवेल-पळस्पे-शिरढोण-चिंचवण नंतर पुढील थांबा कर्नाळा अभयारण्य आहे. एस.टी. बल कर्नाळा अभयारण्याच्या प्रवेशद्वाराजवळच थांबते. प्रवेशद्वारापासून किल्ल्यावर जाण्यास जवळपास दोन तास लागतात.

छायाचित्रे[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]

रानवाटा

संदर्भ[संपादन]

हे सुद्धा पहा[संपादन]